Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अदानी, हिंडेनबर्ग गदारोळातच …आता मुकेश अंबानींबाबत उपस्थित होतोय ‘हा’ मुद्दा!

गेल्या दोन दिवसांपासून उद्योगविश्वात हिंडेनबर्ग रिसर्चमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. अशातच आज (ता.११) सकाळी हिंडेनबर्गने अदानी समूह प्रकरणात सेबीच्या अध्यक्ष माधवी बूच यांचे नाव गोवले. अशातच आता प्रसिद्ध उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल देखील एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 11, 2024 | 07:11 PM
अदानी, हिंडेनबर्ग गदारोळातच ...आता मुकेश अंबानींबाबत उपस्थित होतोय 'हा' मुद्दा!

अदानी, हिंडेनबर्ग गदारोळातच ...आता मुकेश अंबानींबाबत उपस्थित होतोय 'हा' मुद्दा!

Follow Us
Close
Follow Us:

हिंडेनबर्ग रिसर्चने आपला नवीन अहवाल जारी करत, सेबीच्या अध्यक्ष माधवी बूच यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अदानी समूह प्रकरणात हिंडेनबर्गने माधवी बूच यांचे देखील नाव गोवले आहे. अशातच आता अदानी, हिंडेनबर्ग गदारोळात … मुकेश अंबानींबाबत देखील एक मुद्दा उपस्थित होतो आहे. उद्योजक आणि गुंतवणूकदार असलेल्या अनुपम मित्तल यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल हा मुद्दा उपस्थित केला आहे.

काय आहे नेमका हा मुद्दा?

‘इंडियन टेक अँड इन्फ्रा’ या एक्स हॅन्डलने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून तब्बल ४२ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असल्याचे म्हटले आहे. प्रामुख्याने खर्च कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच नोकरभरतीचा वेग कमी करण्यावर देखील कंपनीकडून लक्ष केंद्रीत केले जात आहे.

हेही वाचा : …हा तर चिखल फेकण्याचा प्रयत्न, आरोपांमध्ये नाही दम; हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालावर तज्ज्ञांची प्रतिक्रिया!

असे कारण देत ही ४२ हजार कर्मचाऱ्यांची कपात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून केली जाणार आहे. याच मुद्द्यावरून उद्योजक आणि गुंतवणूकदार असलेल्या अनुपम मित्तल यांनी ‘इंडियन टेक अँड इन्फ्रा’ या एक्स हॅन्डलचे हे ट्विट रिट्विट करत, या मुद्द्यावर इतकी शांतता का आहे? असे म्हटले आहे.

नेमकं काय म्हटलंय अनुपम मित्तल यांनी?

शादी डॉटकॉमचे संस्थापक आणि शार्क टॅंक इंडियाचे जज अनुपम मित्तल यांनी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून होणाऱ्या ४२ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, 42 हजार? या बातमीबाबत इतकी शांतता का आहे? या बातमीमुळे आर्थिक आणि राजकीय पटलावर प्रश्न उपस्थित व्हायला हवे होते. हा गंभीर धोका मानला गेला पाहिजे.

 

42k? Why is this ‘quiet news’? Should be raising serious alarm bells across the economic & political circles 🤷🏻 https://t.co/L0XP0nnzHu

— Anupam Mittal (@AnupamMittal) August 10, 2024

हेही वाचा : हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालावर अदानी समूहाची मोठी प्रतिक्रिया; म्हटले… हा तर नफा कमावण्याचा धंदा!

काय आहे नेमकं कर्मचारी कपातीचे कारण?

‘इंडियन टेक अँड इन्फ्रा’ या एक्स हॅन्डलने जारी केलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 42 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. खर्चात कपात करणे आणि नोकरभरतीचा वेग कमी करण्यासाठी ही कपात कंपनीकडून केली जाणार आहे.

Web Title: Reliance industries cuts its workforce by 42000 in fiscal year 2024 anupam mittal says this is serious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 07:09 PM

Topics:  

  • Reliance Industries

संबंधित बातम्या

अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; कर्ज घोटाळ्याप्रकरणी आता बँक अधिकाऱ्यांची चौकशी सुरु, शेअर्स कोसळले
1

अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; कर्ज घोटाळ्याप्रकरणी आता बँक अधिकाऱ्यांची चौकशी सुरु, शेअर्स कोसळले

RIL Share Price: रिलायन्सच्या 48 लाख शेअरहोल्डर्ससाठी ‘अच्छे दिन’, ब्रोकरेज म्हणतात, ‘लूट लो शेअर…’
2

RIL Share Price: रिलायन्सच्या 48 लाख शेअरहोल्डर्ससाठी ‘अच्छे दिन’, ब्रोकरेज म्हणतात, ‘लूट लो शेअर…’

QR1: अंबानींची कंपनी RIL करणार 18 जुलै रोजी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, इतका नफा अपेक्षित
3

QR1: अंबानींची कंपनी RIL करणार 18 जुलै रोजी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, इतका नफा अपेक्षित

रिलायन्स इंडस्ट्रीजने पुन्हा इतिहास रचला, मार्केट कॅप २० लाख कोटी रुपये; शेअर्समध्ये येऊ शकते तेजी
4

रिलायन्स इंडस्ट्रीजने पुन्हा इतिहास रचला, मार्केट कॅप २० लाख कोटी रुपये; शेअर्समध्ये येऊ शकते तेजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.