फोटो सौजन्य - Social Media
प्राइम फोकस ही भारतातील आघाडीची कंटेंट निर्मिती पॉवरहाऊस असून, ती जनरेटिव्ह एआयच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवून आणत आहे. नमित मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने अनेक धोरणात्मक संपादनांच्या माध्यमातून भारतीय आर्टिस्ट्सना जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. या प्रयत्नांमुळे डीएनईजीला व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी सात अकॅडमी अवॉर्ड्स आणि अनेक प्रतिष्ठित मान्यताही मिळाल्या आहेत. आता, ब्रँड डीएनईजी अंतर्गत नवीन संपादनाद्वारे कंपनीने जनरेटिव्ह एआयच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. डीएनईजी ग्रुपने त्यांच्या ब्रह्मा या ग्लोबल एआय आणि कंटेंट तंत्रज्ञान कंपनीच्या माध्यमातून मेटाफिजिकच्या संपादनाची घोषणा केली आहे. मेटाफिजिक हे एआय कंटेंट निर्मिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक आघाडीचे डेव्हलपर आहे. हे संपादन एआय-पॉवर्ड उत्पादनांच्या विकासाला गती देईल, ज्यामुळे कंटेंट क्रिएटर्सना उच्च दर्जाचे कंटेंट मोठ्या प्रमाणात निर्माण करता येईल.
ब्रह्माच्या या व्यवहारानंतर त्याचे मूल्यांकन १.४३ अब्ज अमेरिकी डॉलर्स झाले आहे. अबु धाबी-स्थित गुंतवणूकदार United AI Software Group (UASG) डीएनईजीसोबत भागीदारीत ब्रह्मामध्ये २५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे. याआधी २०२४ मध्ये UASG ने डीएनईजीमध्ये २०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. ब्रह्मा व्हिडिओ, इमेज आणि ऑडिओ फॉरमॅट्समध्ये युजर-कस्टमाइज्ड कंटेंट निर्माण करण्यासाठी एआय-नेटिव्ह उत्पादनांची विस्तृत श्रेणी विकसित करत आहे. हे तंत्रज्ञान डिजिटल ह्युमन्स आणि कॅरेक्टर सिम्युलेशन्सच्या निर्मितीस चालना देईल, ज्यामुळे हॉलिवूड स्तरावरील अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अॅनिमेशन भारतीय आणि आंतरराष्ट्रीय निर्मात्यांसाठी सहज उपलब्ध होतील. या संपादनानंतर ब्रह्माची जागतिक टीम आणखी मजबूत होणार असून, ८० हून अधिक अनुभवी इंजिनिअर्स आणि क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजिस्ट्स त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधन आणि विकास क्षमतेत भर टाकतील.
या संपादनाच्या घोषणेनंतर ब्रह्मा आणि मेटाफिजिकच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाचा डिजिटल कंटेंट निर्मितीला मोठा फायदा होणार आहे. डीएनईजी ग्रुपच्या झिवा तंत्रज्ञानाच्या समावेशाने, मेटाफिजिकच्या अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानासह एकत्रितरीत्या डिजिटल डबल्स आणि अल्ट्रा-रिअॅलिस्टिक कंटेंट निर्मिती शक्य होणार आहे. हे तंत्रज्ञान केवळ चित्रपट आणि अॅनिमेशनसाठीच नाही तर गेमिंग, जाहिरात, शिक्षण, आरोग्यसेवा आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरेल.
प्राइम फोकसचे संस्थापक आणि डीएनईजीचे ग्लोबल सीईओ नमित मल्होत्रा यांनी सांगितले की, “प्राइम फोकसचे ध्येय नेहमीच भारतीय टॅलेंटला जागतिक स्तरावरील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करणे हे राहिले आहे. आमची विश्वास आहे की, भारतीय आर्टिस्ट्स आणि कंटेंट क्रिएटर्सकडे अपार कौशल्य आहे, ज्याला योग्य साधने आणि संधी मिळाल्यास ते जागतिक स्तरावर अग्रस्थानी पोहोचू शकतात. मेटाफिजिकच्या संपादनामुळे आम्ही कंटेंट निर्मितीमध्ये क्रांती घडवणार असून, अल्ट्रा-रिअॅलिस्टिक आणि अत्याधुनिक एआय-आधारित कंटेंट निर्माण करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ब्रह्मा हा केवळ एक कंटेंट निर्मिती प्लॅटफॉर्म नसून, तो कंटेंटच्या भविष्यासाठी आधारस्तंभ ठरेल आणि नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कथानकांना नवी उंची मिळवून देईल.”