iPhone Price Dropped: Apple चा 'हा' iPhone 25 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, इथे मिळतेय बेस्ट डिल
लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Apple ने 2023 मध्ये iPhone 15 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये अनेक अपडेट्स आणि अपग्रेड देण्यात आले आहेत. 2023 मध्ये कंपनीने आयफोन 15 हा 79,900 रुपयांना लाँच केला होता. आता तुम्ही हा आयफोन काही डिल्स आणि ऑफर्ससह 25 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. होय, 79,900 रुपयांना लाँच करण्यात आलेला आयफोन 15 आता तुम्ही केवळ 23,949 रुपयांना खरेदी करू शकता. ही उत्तम ऑफर Amazon तुमच्यासाठी घेऊन आला आहे.
‘iPhone 16e’ खरंच बजेट फ्रेंडली आहे? सोशल मिडियावर युजर्सनी घातला धुमाकूळ; ‘हे’ मीम्स तुफान व्हायरल
Amazon त्यांच्या ग्राहकांना आयफोन 15 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी देत आहे. खरं तर Amazon ग्राहकांना आयफोन 15 बजेट फ्रेंडली किंमतीत खरेदी करण्याची संधी देत आहे. काही डिल्स आणि ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही केवळ 23,949 रुपयांना आयफोन 15 खरेदी करू शकता. चला तर Amazon वर सुरु असलेल्या डिल्स आणि ऑफर्सबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple iPhone 15 तुम्ही Amazon वरून कमी किंमतीत खरेदी करू शकता. Apple iPhone 15 च्या खरेदीवर तुम्हाला महाबचत करण्यााची संधी मिळणार आहे. या ऑफर्स पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. Amazon ने iPhone 15 (128GB, ब्लॅक) ची किंमत कमी केली आहे. यामुळे आता खरेदीदारांना iPhone 15 परवडणाऱ्या दरात खरेदी करण्याची एक उत्तम संधी आहे.
Apple iPhone 15 (128GB, ब्लॅक) 79,900 रुपयांना लाँच करण्यात आला होता. हा आयफोन सध्या Amazon वर 24 टक्के डिस्काऊंटसह, किंमत 60,999 रुपयांना उपलब्ध आहे. आणखी बचत करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी, एक्सचेंज ऑफर्स देखील आहेत. तुम्ही तुमचा जुना आयफोन एक्सचेंज करून 34,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या ट्रेड-इन ऑफरमुळे iPhone 15 ची किंमत फक्त 26,999 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.
याव्यतिरिक्त, Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 3,050 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. ट्रेड-इन व्हॅल्यू एकत्रित केल्यास, iPhone 15 ची अविश्वसनीयपणे परवडणारी किंमत 23,949 रुपयांपर्यंत खाली येते, ज्यामुळे संभाव्य खरेदीदारांसाठी ही एक आकर्षक डील बनते.
Apple iPhone 15 मध्ये 6.1 -इंचाचा डिस्प्ले आहे. या मॉडेलमध्ये पारंपारिक नॉचऐवजी डायनॅमिक आयलंड नॉच देण्यात आहे. या मॉडेलमध्ये 48-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. Apple चा दावा आहे की Apple iPhone 15 मध्ये “संपूर्ण दिवस बॅटरी लाइफ” आहे. iPhone 15 मध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे, जो मागील मॉडेल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या लाइटनिंग पोर्टची जागा घेतो.