Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

आता शेतीमध्ये एआयचा वापर केला जाणार आहे. शेतकरी अचूक हवामानाबाबत माहिती मिळवण्यासाठी एआयच वापर करू शकणार आहेत. यामुळे शेतीतील उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 05, 2026 | 01:33 PM
आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Follow Us
Close
Follow Us:
  • बदलत्या हवामानाची मिळणार अचूक माहिती
  • शेतकऱ्यांचा खर्च होणार कमी
  • शेतीत AI वापरल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा
सध्या प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर केला जात आहे. अगदी शाळा, कॉलेज, ऑफीसपासून मोठ्या कंपन्यांमध्ये देखील एआय वापरला जात आहे. एवढंच नाही तर रोजच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी देखील एआयचा वापर केला जातो. एआयने आपलं जीवन पूर्णपणे बदललं आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये देखील एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सर्वांसोबतच आता शेतीच्या कामांमध्ये देखील एआयचा वापर केला जाणार आहे. हवामानाचा अंदाज मिळवण्यासाठी शेतकरी एआयचा वापर करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आणि पिकांचे नुकसान देखील होणार नाही.

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

बदलत्या हवामानाचा शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. यामुळे शेतीतील अनिश्चितता वाढली असून शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान देखील होत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अचूक व वेळेवर हवामान माहिती मिळणं गरजेचं झालं आहे. शेतकऱ्यांना अचूक व वेळेवर हवामानाबाबत माहिती मिळावी यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यात उभारण्यात येत असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांपैकी आतापर्यंत २ हजार ५८४ महसूल मंडळापैकी २ हजार ३२१ मंडळांमध्ये ही केंद्रे कार्यान्वित झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

केंद्र सरकारच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेली ही स्वयंचलित हवामान केंद्रे ‘महावेध’ प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांमुळे शेतक-यांची शेती अधिक स्मार्ट आणि सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात एकूण २७ हजार ८५७ ग्रामपंचायती असून, केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विंडस (WINDS) प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरही स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या टप्प्यात २५ हजार ५२२ ग्रामपंचायतीमध्ये हवामान केंद्रे उभारली जाणार असून, त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

महावेध प्रकल्पांतर्गत हवामानाचा अचूक अंदाज मिळावा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स तसेच पूर्वानुमान विश्लेषण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, पावसाचे प्रमाण, तापमान, आद्रता, वाऱ्याचा वेग यासारखी माहिती वेळेत उपलब्ध होणार आहे. या माहितीचा उपयोग अ‍ॅग्रीस्टॅक, महा-अ‍ॅग्रीटेक, क्रॉपसॅप अंगमार्कनेट डिजिटल शेतीशाळा आणि महा-डीबीटी यांसारखे महत्त्वाचे कृषी प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी केला जाणार आहे.

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

शेतीतील जोखीम कमी होणार

अकोला जिल्ह्यात सध्या ५२ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यरत आहेत, ५३४ ग्रामपंचायतींपैकी ४८३ ठिकाणी नवीन केंद्रांच्या स्थापनेसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना पेरणी, फवारणी, कापणी यासारख्या महत्त्वाच्या शेती कामांचे नियोजन अचूकपणे करण्यासाठी मदत होणार आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर या केंद्रांमधून मिळणाऱ्या अचूक हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कृषी सल्ला मिळेल. यामुळे पिकाचे नुकसान कमी होणार आहे आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Farmers can use ai for getting accurate forecast of changing weather tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • farmer
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी
1

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस
2

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी
3

Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी

टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर
4

टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.