
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Free Recharge… एक फोटो पाठवा आणि FASTag वर मिळवा 1000 रुपये! कसा मिळणार लाभ? NHAI ने केला खुलासा
SBI ने त्याच्या अकाऊंट होल्डरवर म्हणजेच बचत खातेधारक आणि पगार खातेधारक या दोघांनाही चार्जेस लावले आहेत. यामध्ये रोख रक्कम काढण्यासाठी जास्त शुल्क भरावे लागेल. बँकेने या बदलाबाबत आपली वेबसाइट अद्ययावत केली आहे.
SBI च्या म्हणण्यानुसार, १ ऑक्टोबरपासून शाखांमार्फत उघडलेल्या बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यांवर नवीन शुल्क लागू होणार आहे. या बदलांनुसार, ग्राहकांना आता दरमहा चार मोफत पैसे काढण्याची सुविधा मिळेल, पण त्यानंतर प्रत्येक एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला ₹१५ अधिक जीएसटी आकारला जाईल.
हे नवीन शुल्क केवळ तेव्हाच लागू होईल जेव्हा एका महिन्यात चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढले जातील. याचा अर्थ असा की, जे ग्राहक नियमितपणे एटीएममधून पैसे काढतात, त्यांना काढल्या जाणाऱ्या रकमेबाबत विशेष काळजी घेणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही चार एटीएम व्यवहार पूर्ण केले, तर पाचव्या व्यवहारावर ₹१५ जीएसटी लागेल आणि त्यानंतरच्या सर्व व्यवहारांवर लागू असलेले शुल्क आकारले जाईल.
१ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या SBI पगार खाते नियमांमधील बदलांनुसार बँकेने कर्मचाऱ्यांसाठी मोफत व्यवहारांची मर्यादा कमी केली आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून, स्टेट बँक ऑफ इंडियामधील पगार खातेधारक इतर बँकांच्या एटीएम आणि ऑटोमेटेड डिपॉझिट अँड विथड्रॉवल मशीन्स (ADWMS) वर त्यांच्या डेबिट कार्डचा वापर करून दरमहा फक्त पाच व्यवहार करू शकतील. यापूर्वी ही मर्यादा १० मोफत व्यवहारांची होती.
SBI एटीएम नियमांमधील बदलाचा विचार करता, स्टेट बँकेने पगार खातेधारकांसाठी एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कमी केली आहे. पण त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की पाच-मोफत व्यवहारांच्या मर्यादेमध्ये आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांचा समावेश असणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, यामध्ये केवळ रोख रक्कम काढणेच नाही, तर एटीएमद्वारे तुमच्या खात्यातील शिल्लक तपासणे आणि मिनी-स्टेटमेंट मिळवणे यासारख्या गैर-आर्थिक सेवांचाही समावेश आहे.
बँकेने दिलेल्या मोफत एटीएम पैसे काढण्याच्या मर्यादेनंतर पैसे काढल्यास, महिन्यातील सहाव्या व्यवहारावर तुम्हाला प्रत्येक पैसे काढण्याच्या व्यवहारासाठी २३ रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. गैर-आर्थिक व्यवहारांसाठी, मोफत मर्यादेनंतर तुम्हाला ११ रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल.