Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना, संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय, तुमच्यावर काय होणार परिणाम?

जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांनी २५ आणि २६ मे रोजी पुकारला होता. त्याच संदर्भातील ही महत्त्वाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी हा संप पुकारला गेला होता.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 25, 2026 | 01:19 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

State Bank of India Strike : जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांनी २५ आणि २६ मे रोजी पुकारला होता. त्याच संदर्भातील ही महत्त्वाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी हा संप पुकारला गेला होता. पण आता हा संप होणार नाही आहे. कर्मचारी संघटना आणि बँक व्यवस्थापन यांच्यात झालेल्या यशस्वी वाटाघाटींनंतर, संपाचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. परिणामी, आज सोमवारपासून बँकेच्या सर्व शाखांमध्ये कामकाज पुन्हा सुरळीतपणे सुरू झाले आहे.

Petrol-Diesel Price Hike: कधी थांबणार? पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, 10 दिवसांत 7 रुपयांपेक्षा अधिक वाढ

बँकिंग सेवांमध्ये व्यत्यय येण्याची भीती

संपाची बातमी समोर आल्यानंतर, अनेक ग्राहकांना बँकिंग सेवांमध्ये व्यत्यय येण्याची भीती वाटत होती. याच कारणामुळे, बँकेने यापूर्वीच ग्राहकांना इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसारख्या सुविधांचा अधिकाधिक वापर करण्याचा सल्ला दिला होता. पण आता परिस्थिती पूर्ववत झाली असल्यामुळे शाखांमधील कामकाज एखाद्या सामान्य दिवसाप्रमाणेच सुरळीतपणे सुरू झालं आहे.

बँकेकडून कामकाज पूर्ववत झाल्याच्या वृत्ताला दुजोरा

SBI ने जारी केलेल्या एका निवेदनात, बँकेच्या सर्व शाखा आता त्यांच्या नियोजित वेळेनुसार उघडत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रोख रक्कम जमा करणे, काढणे, पासबुक अद्ययावत करणे किंवा इतर कोणत्याही बँकिंग सेवेबाबत ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही.

कर्मचाऱ्यांची कोणत्या मुद्द्यावर नाराजी?

बँक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी विविध मुद्द्यांवर आधारित होत्या. पुरेसे सुरक्षा रक्षक उपलब्ध नसल्यामुळे बँकेच्या अनेक शाखांमधील सुरक्षा व्यवस्था कमकुवत झाली आहे, असा दावा कर्मचारी संघटनेने केला. कर्मचाऱ्यांच्या मते, या परिस्थितीमुळे बँक कर्मचारी आणि ग्राहक या दोघांच्याही सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

आउटसोर्सिंग’बाबत उपस्थित केलेले प्रश्न

बँकेमध्ये वाढत असलेल्या ‘आउटसोर्सिंग’च्या प्रवृत्तीविरोधातही कर्मचारी संघटना आंदोलन करत होत्या. या पद्धतीमुळे कायमस्वरूपी भरतीमध्ये घट होत असून, तरुणांसाठीच्या रोजगाराच्या संधी कमी होत आहेत, असा युक्तिवाद त्यांनी केला. या परिणामाची झळ विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवारांना आणि आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींना बसत आहे.

पेन्शन पद्धतीबाबतच्या मागण्या

संपामागील आणखी एक प्रमुख कारण म्हणजे निवृत्तीवेतनाच्या संदर्भातील मुद्दा. आपल्या NPS निधी व्यवस्थापकांना बदलण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. इतर संस्थांमधील कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध असताना, SBI कर्मचाऱ्यांना मात्र त्यापासून वंचित ठेवले जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे वातावरण; नफा मिळवण्यासाठी ‘या’ स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Web Title: Sbi bank strike employees union decision impact on customers see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Business News
  • Employees Strike
  • Marathi News
  • SBI
  • SBI Bank
  • Sbi Job

संबंधित बातम्या

September Financial Deadlines : सप्टेंबर महिन्यात ‘या’ 4 मोठ्या डेडलाईन्स चुकवू नका! नाहीतर बसू शकतो मोठा आर्थिक फटका
1

September Financial Deadlines : सप्टेंबर महिन्यात ‘या’ 4 मोठ्या डेडलाईन्स चुकवू नका! नाहीतर बसू शकतो मोठा आर्थिक फटका

Chandrapur News: रक्षाबंधनासाठी बहिणींची माहेरच्या दिशेने धाव; सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूर बसस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी
2

Chandrapur News: रक्षाबंधनासाठी बहिणींची माहेरच्या दिशेने धाव; सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूर बसस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची  AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच
3

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान!  या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी
4

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.