Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे वातावरण; नफा मिळवण्यासाठी 'या' स्टॉक्सवर ठेवा लक्ष
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित घसरण; चांदीच्या भावातही झाली घट, वाचा सविस्तर
शुक्रवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी ५० २३,७०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स २३१.९९ अंकांनी, म्हणजेच ०.३१ टक्क्यांनी वाढून ७५,४१५.३५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ६४.६० अंकांनी, म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी वाढून २३,७१९.३० वर स्थिरावला. बँक निफ्टी निर्देशांक शुक्रवारी ६१५.९५ अंकांनी, म्हणजेच १.१५ टक्क्यांनी वाढून ५४,०५५.३५ अंकांवर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक, जिगर एस. पटेल यांनी पुढील 1 ते 2 आठवड्यांसाठी तीन स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये डिक्सन टेक्नॉलॉजीज (इंडिया), आरती इंडस्ट्रीज, रामको सिमेंट्स यांचा समावेश आहे. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज शेअर बाजारातील गुंतवणूकदार शीला फोम लिमिटेड, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, पॉली मेडिक्युअर लिमिटेड, मीशो लिमिटेड आणि डायनॅमॅटिक टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे शेअर्स खरेदी करण्यावर लक्ष केंद्रीत करू शकतात.
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदांराना खरेदी आणि विक्री करण्यासाठी मीशो, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस आणि जीआयपीसीएल या तीन शेअर्सची निवड केली आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल, बँक ऑफ महाराष्ट्र आणि ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी या तीन शेअर्सची शिफारस केली आहे.






