Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SEBI New Rules : Mutual Fund गुंतवणुकीचे नियम बदलले! सेबीच्या एका निर्णयामुळे वाचणार तुमचे हजारो रुपये; नेमका कसा होणार फायदा?

SEBI New Rules : भारतीय प्रतिभूति आणि विनिमय बोर्ड SEBI ने गुंतवणूकदारांच्या हिताचा एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये आता 'डायरेक्ट प्लान' हा डीफॉल्ट पर्याय म्हणून लागू करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 30, 2026 | 05:16 PM
Mutual Fund गुंतवणुकीचे नियम बदलले! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Mutual Fund गुंतवणुकीचे नियम बदलले! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Mutual Fund गुंतवणुकीचे नियम बदलले!
  • सेबीच्या एका निर्णयामुळे वाचणार तुमचे हजारो रुपये
  • नेमका कसा होणार फायदा?
SEBI New Rules : जर तुम्हीही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. 1 नोव्हेंबर 2026 पासून म्युच्युअल फंडसंबंधित नियमांमध्ये काही महत्त्वाचे आणि मोठे बदल होणार आहे. सेबीचे चीफ तुहीन कांत पांडे यांनी एका कार्यक्रमात याबाबत स्पष्ट केलं. नेमका काय आहे हा नियम आणि त्याचा गुंतवणूकदारांना कसा होणार फायदा? ( SEBI New Rules ) 

Milk Price Hike : मोठा फटका…1 नोव्हेंबरपासून दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

आता म्युच्युअल फंड कंपन्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘डायरेक्ट प्लॅन’ हा डीफॉल्ट पर्याय म्हणून उपलब्ध केला जाईल. याता थेट अर्थ असा होतो की, आता जेव्हाही तुम्ही ॲप किंवा वेबसाइटवर गुंतवणूक करायला जाल, तेव्हा तुम्हाला सगळ्यात अगोदर डायरेक्ट प्लॅन दिसतील. त्याच वेळी, जर तुम्ही रेग्युलर प्लॅन निवडला, तर तो डायरेक्ट प्लॅनपेक्षा अधिक महाग आहे का यासंबंधित तुम्हाला थेट सांगण्यात येईल.

डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅनमध्ये नेमका काय फरक ?

जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये  गुंतवणूक करता, तेव्हा तुम्ही डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅन यापैकी एक निवडू शकता. डायरेक्ट प्लॅनमध्ये, तुम्ही थेट म्युच्युअल फंड कंपनीकडे गुंतवणूक करता. यामध्ये तुम्हाला कोणताही एजंट किंवा वितरकचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणतेही कमिशन द्यावे लागत नाही. तुमचे कमीशनचे पैसे वाचतात. रेग्युलर प्लॅनमध्ये, तुम्ही एजंट किंवा वितरकामार्फत गुंतवणूक करता. एजंटच्या कमिशनमुळे, त्याचा एक्सपेंस रेशो थोडा जास्त असतो.

एक्सपेंस रेशो वाचल्यामुळे किती फरक पडेल?

एक्सपेन्स रेशो म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्या तुमच्या पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी आकारत असलेली रक्कम किंवा चार्ज असतो. त्यामुळे, त्याचा तुमच्या फंडाच्या परताव्यावर थेट परिणाम होतो. डायरेक्ट प्लॅन निवडल्यास तुम्हाला गुंतवणुकीचे निर्णय स्वतः घ्यायचे असतात, तर रेग्युलर प्लॅनसाठी तुम्हाला एजंट किंवा वितरकाचा सल्ला घ्यावा लागतो. गुंतवणूकदारांना खर्चाच्या संपूर्ण तपशिलाची स्पष्ट माहिती मिळावी आणि ते माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील, हे सुनिश्चित करण्यासाठी सेबीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे त्याचा आता गुंतवणूकदारांना नेमका कसा फायदा होतो हे पाहावं लागेल.

( Desclaimer : बाजारातील परिस्थिती सतत बदलत असते, त्यामुळे कोणताही मोठा गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

PM Kisan Yojana 24th Installment : खुशखबर! आला रे… PM Kisan Yojana चा 24 वा हफ्ता आला! तब्बल 9.34 कोटी शेतकऱ्यांना मिळाला लाभ

💡

Frequently Asked Questions

  • Que: सेबीने म्युच्युअल फंड संदर्भात नुकताच कोणता मोठा निर्णय घेतला?

    Ans: सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये 'डायरेक्ट प्लान' हा पर्याय डीफॉल्ट म्हणून लागू केला आहे.

  • Que: रेग्युलर प्लॅनच्या तुलनेत डायरेक्ट प्लानमध्ये गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत?

    Ans: डायरेक्ट प्लानमध्ये मध्यस्थ किंवा एजंटचे कमिशन द्यावे लागत नाही, त्यामुळे एक्सपेन्स रेशो कमी होतो आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.

  • Que: नव्या नियमाचा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कसा फायदा होईल?

    Ans: गुंतवणूकदारांना नकळत जाणाऱ्या कमिशनची बचत होईल आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत त्यांचा नफा वाढण्यास मदत होईल.

Web Title: Sebi makes direct plan default in mutual funds investor benefits marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Mutual Fund
  • new rules
  • sebi

संबंधित बातम्या

SEBI Mutual Fund Rules 2026: Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! 1 नोव्हेंबरपासून SEBI चा नवा नियम लागू
1

SEBI Mutual Fund Rules 2026: Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! 1 नोव्हेंबरपासून SEBI चा नवा नियम लागू

Avadhut Sathe : Trading च्या नावाखाली फसवणूक? विना नोंदणी क्लास; अवधुत साठेंना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश
2

Avadhut Sathe : Trading च्या नावाखाली फसवणूक? विना नोंदणी क्लास; अवधुत साठेंना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.