Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Finfluencers ची आता खैर नाही… SEBI ॲक्शन मोडवर! Share Market बाबत चुकीच्या टिप्स देणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

SEBI Action On Finfluencers : सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्सवर शेअर बाजारात भरघोस परताव्याचे आमिष दाखवून चुकीच्या टिप्स देणाऱ्या अनधिकृत 'फिनफ्लुएंसर्स'वर भांडवली बाजार नियंत्रक 'सेबी'ने आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 06, 2026 | 05:44 PM
Finfluencers ची आता खैर नाही... ( सौजन्य - सोशल मीडिया )

Finfluencers ची आता खैर नाही... ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Finfluencers ची आता खैर नाही…
  • SEBI ॲक्शन मोडवर!
  • चुकीच्या टिप्स देणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई
SEBI Action On Finfluencers : शेअर मार्केटमध्ये तुम्हीही गुंतवणूक करता का? मग तुम्ही युट्युब, इंस्टाग्राम किंवा टेलिग्राम यांच्यावरील शेअर बाजाराच्या टिप्स वाचून पैसे गुंतवता का ? तसं असेल तर सावध व्हा! कारण आता बाजार नियामक सेबी तथाकथित फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सवर बारीक लक्ष्य ठेवून आहेत. जे परवान्याशिवाय चुकीचा सल्ला देऊन निष्पाप गुंतवणूकदारांचे नुकसान करत आहेत. नेमकं काय आहे प्रकरण? ( SEBI Action On Finfluencers )

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन

सेबीचे अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांनी सांगितले की, नियामक दर महिन्याला सोशल मीडियावरून अशा अंदाजे ६,००० ते ७,००० दिशाभूल करणाऱ्या पोस्ट काढून टाकले आहे.

‘पंप अँड डंप’वरचा फास आवळला

सेबीच्या अध्यक्षा कांता पांडे यांनी एका कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य केलं. त्यांनी आपला महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ‘प्रोजेक्ट जागृत’ सुरू केला, ज्याचा उद्देश गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना फसवणूक टाळण्यास मदत करणे हा आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अनेक प्रभावशाली व्यक्ती प्रवर्तकांच्या संगनमताने ‘पंप अँड डंप’ शेअरची किंमत जाणूनबुजून वाढवून नंतर तो विकणे यांसारखे घोटाळे करत आहेत आणि सेबी या व्यक्तींवर सतत लक्ष ठेवून आहे.

परवान्याशिवाय सल्ला देणं धोकादायक

सेबी प्रमुखांनी स्पष्टपणे सांगितले की, जेव्हा हे आर्थिक सल्लागार त्यांच्या मर्यादा ओलांडतात, तेव्हा खरी समस्या सुरू होते. जर कोणी परवाना किंवा नियामक नोंदणीशिवाय, एखादा विशिष्ट स्टॉक खरेदी करण्याबद्दल किंवा विशिष्ट गुंतवणूक धोरण अवलंबण्याबद्दल ठाम सल्ला देत असेल, तर हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे आणि यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान होऊ शकते. सेबी प्रमुखांनी सांगितले की, हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि आम्ही अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवतो.

कोणावर कारवाई केली जातेय?

पांडे यांच्या मते, फिन-इन्फ्लुएन्सर्सचे तीन मुख्य प्रकार आहेत:

जे सेबीकडे नोंदणीकृत आहेत आणि नियमांच्या चौकटीत राहून काम करतात.
जे नोंदणीकृत नाहीत, परंतु केवळ त्यांची मते किंवा ज्ञान शेअर करतात.
जे नियमांचे उल्लंघन करतात आणि परवान्याशिवाय अप्रमाणित टिप्स देतात.

या संदर्भात, सेबी या तिसऱ्या प्रकारच्या व्यक्तींवर कारवाई करत आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून, केवळ त्यांची सामग्री हटवली जात नाही, तर पुराव्यांच्या आधारे त्यांनी बेकायदेशीरपणे कमावलेला नफाही जप्त केला जात आहे. अनेक प्रकरणांमध्ये, सेबी अशा व्यक्तींवर शेअर बाजारातून बंदी घालत आहे.

तरुण गुंतवणूकदारांनी काय करायचं?

नवीन आणि तरुण गुंतवणूकदारांना सल्ला देताना, सेबीचे अध्यक्ष म्हणाले की, जर तुम्हाला संकल्पना समजल्या तर गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. पण, काहीही न समजता कोणत्याही शेअरमध्ये आंधळेपणाने गुंतवणूक करणे हा पूर्णपणे चुकीचा दृष्टिकोन आहे. आम्हाला सर्वांना हा संदेश द्यायचा आहे: आधी शिका, मग गुंतवणूक करा.

भारतीय अर्थव्यवस्था World Bank चा विश्वास; नवा अहवाल केला जाहीर, GDP वाढीचा अंदाज थेट 7.1 टक्क्यांवर

Web Title: Sebi strict action against unregistered finfluencers giving stock tips marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Influencers
  • sebi

संबंधित बातम्या

धक्कादायक प्रकार; भररस्त्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या; हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट व्हायरल
1

धक्कादायक प्रकार; भररस्त्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या; हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.