
Share Market Today: शेअर बाजारात अस्थिरतेचे संकेत; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीच्या मार्गावर, 'या' शेअर्सवर नजर ठेवा
शुक्रवारी, सर्व क्षेत्रांमधील व्यापक तेजीसह भारतीय शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २४,२०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स ८२७.५७ अंकांनी, म्हणजेच १.०८ टक्क्यांनी वाढून ७७,५६९.३९ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० २४४.१० अंकांनी, म्हणजेच १.०२ टक्क्यांनी वाढून २४,२०६.९० अंकांवर स्थिरावला. निफ्टी ५० गेल्या आठवड्यात ०.२६% घसरणीसह बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी ७९३.४५ अंकांनी, म्हणजेच १.३९ टक्क्यांनी वाढून ५८,०४५.९० वर बंद झाला. (फोटो सौजन्य: Pinterest)
आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार एचसीएल टेक्नॉलॉजीज, आयसीआयसीआय प्रुडेंशियल असेट मॅनेजमेंट कंपनी, बजाज कंझ्युमर केअर, डीमार्ट, एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू एनर्जी, एनएमडीसी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एनटीपीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडिगो, पेस डिजिटेक, पॉवरिका या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया यांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये राजरतन ग्लोबल वायर, जिंदाल पॉली फिल्म्स, डेटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि गोदरेज प्रॉपर्टीज यांचा समावेश आहे.
आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक, जिगर एस. पटेल यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार पुढील १-२ आठवड्यांसाठी स्विगी, टाटा पॉवर कंपनी आणि मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स (एमआरपीएल) या शेअर्सवर लक्ष ठेऊ शकतात.