Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Crash : तब्बल 6000000000000 स्वाहा… शेअर मार्केट कोसळलं! सेन्सेक्स 700 अंकांनी लुढकला

शेअर बाजारात आज झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाले आहेत. यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. नेमकी कोणती कारणं आहेत ज्यामुळे एवढी मोठी घसरण झाली?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 23, 2026 | 04:01 PM
(फोटो सौजन्य:Chatgpt)

(फोटो सौजन्य:Chatgpt)

Follow Us
Follow Us:

Share Market Crash : शेअर बाजारात कधी कोणत्या कारणामुळे उलथापालथ होईल हे सांगता येत नाही. आजचंच बघा ना… वॉल स्ट्रीटवरील टेक स्टॉक्सची झालेली विक्री आणि त्यामुळे दक्षिण कोरियाच्या बाजारात झालेली मोठी घसरण, याचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होताना दिसून आला. बाजारात इतकी मोठी विक्री झाली की, बीएसई सेन्सेक्स अंदाजे ६००-७०० अंकांनी घसरला. एनएसई निफ्टी ५० सुद्धा २३,९०० च्या पातळीखाली घसरला. पण नेमकी कारणं काय आहेत? समजून घेऊयात

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PFRDA ने आणला ‘पेन्शन सहायक’ डिजिटल प्लॅटफॉर्म; जाणून घ्या कसं काम करतो?

आशियाई बाजार कोसळला

दक्षिण कोरियाच्या बाजारातील घसरणीमुळे आज भारतीय शेअर बाजारालाही फटका बसला. मुख्य निर्देशांक असलेल्या KOSPI मध्ये जवळपास १०% ची घसरण झाली आहे. या मोठ्या घसरणीमुळे शेअर बाजारातील व्यवहार २० मिनिटांसाठी थांबवावे लागले.
खरं तर, वॉल स्ट्रीटवरील अल्फाबेट आणि स्पेसएक्स सारख्या प्रमुख टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला त्यामुळे आज जागतिक बाजारातील वातावरण बिघडले आहे. या घसरणीमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि टेक कंपन्यांच्या उच्च मूल्यांकनाबद्दल गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे.
त्यात आज दक्षिण कोरियाच्या बाजारात SK Hynix शेअर्स ११% पेक्षा जास्त घसरले आणि Samsung Electronics शेअर्सही ८% पेक्षा जास्त घसरले. या दोन प्रमुख सेमीकंडक्टर कंपन्यांच्या शेअर्समधील घसरणीमुळे बाजाराचे एकूण संतुलन बिघडले.

दक्षिण कोरियाच्या मार्केटमध्ये अनेक विक्रम

इराण युद्ध आणि जागतिक अनिश्चितता असूनही, AI आणि चिप्सच्या जोरदार मागणीमुळे दक्षिण कोरियाचा बाजार यावर्षी विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत होता. यामुळे निर्देशांकात ८०-९०% ची वाढ झाली होती. अशा उच्च पातळीवर, कंपन्यांचे मूल्यांकन खूप महाग झाले होते. परिणामी, आज अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या घसरणीनंतर, परदेशी गुंतवणूकदारांनी येथेही शेअर्सची विक्री सुरू केली आणि १.३ अब्ज डॉलर्स (अंदाजे २ ट्रिलियन वॉन) पेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकून नफा कमावला.

देशांतर्गत शेअर बाजाराचं काय गणित?

आशियाई बाजारांचे संतुलन बिघडल्याने भारतातील गुंतवणूकदारांना फटका बसला. भारतातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या, इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक आणि विप्रो यांना आज सर्वात मोठे नुकसान झाले. परिणामी, निफ्टी आयटी निर्देशांक आज सर्वात मोठा तोटा सहन करणारा ठरला. शेअर बाजारातील या लक्षणीय घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे अंदाजे ४.५७ लाख कोटी ते ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

अरे देवा, हे काय? SpaceX च्या शेअर्सना कोणाची लागली नजर? 3 दिवसांत तब्बल 600 अब्ज डॉलर्सचा दणका

Web Title: Share market crash today sensex drops 700 points investors loss see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • ai
  • Artificial intelligence
  • Business News
  • Marathi News
  • share market
  • Share Market Closing
  • share market news

संबंधित बातम्या

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
1

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
2

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
3

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
4

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.