
Share Market मध्ये हाहाःकार! ( सौजन्य - सोशल मीडिया )
बाजार उघडताच, सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी केवळ दोन शेअर्समध्ये वाढ दिसून आली. पण उर्वरित २८ शेअर्समध्ये घसरण झाली. यापैकी, टीसीएसमध्ये ०.३३ टक्क्यांची सर्वाधिक वाढ झाली, तर बजाज फायनान्समध्ये १.११ टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली. पश्चिम आशियातील वाढता तणाव, अमेरिका-इराण संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ यामुळे देशांतर्गत शेअर बाजाराला मोठा फटका बसत असल्याचं बोललं जात आहे.
देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांना ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. BSE या शेअर बाजाराच्या अधिकृत आकडेवारीनुसार, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल अंदाजे ६ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. ते आता अंदाजे ४७६ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.
पश्चिम आशियामध्ये संघर्ष वाढत आहे
तेलाच्या किमतीत मोठी वाढ
अमेरिकन बाँड यील्डमध्ये मोठी वाढ
भारतीय चलन घसरले
परदेशी गुंतवणूकदार विक्री करत आहेत
Ans: आज सेन्सेक्स ७३,७३४.८३ वर उघडला.
Ans: आज निफ्टी २३,०६४.९० वर उघडला.
Ans: कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०७ डॉलर आहे. त्याच्या किमतीत २% वाढ झाली आहे.
Ans: अमेरिकन बाँड यील्ड म्हणजे गुंतवणूकदारांना बाँड्सवर मिळणारा परतावा.
Ans: जेव्हा अमेरिकन बाँड यील्ड वाढतो, तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून अमेरिकन बाँड्समध्ये गुंतवतात. यामुळे शेअर बाजारात घसरण होते.