फोटो सौजन्य: iStock
आज देशात अनेक असे लोकं आहे जे रोज शेअर मार्केटमध्ये आपले नशीब आजमावत असतात. यात काही जणांना पैश्यांची लॉटरी लागते तर काही जण अक्षरशः कर्जबाजरी देखील होतात. हल्ली तरुण मंडळी सुद्धा शेअर मार्केटकडे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी एक उत्तम पर्याय म्हणून बघत आहे.
याच शेअर मार्केटने अनेकांना अच्छे दिन सुद्धा बघायला लावले आहे. नववर्षात शेअर मार्केट नवीन उंची गाठेल असा विश्वास अनेक जण व्यक्त करताना दिसत आहे. हे 2024 चं वर्ष संपून आता 2025 चं वर्ष येण्यासाठी आता फक्त 15 दिवसांचाच अवधी उरला आहे. अशावेळी अनेक जण बँक हॉलीडे पासून Long Weekend पर्यंत सगळ्या तारीख नीट शोधून पाहतात.
जर तुम्हाला गुंतवणुकीत रस असेल, तर तुम्हाला पुढील वर्षी शेअर बाजारातील आगामी सुट्ट्या जाणून घेणे महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया, पुढील वर्षी शेअर बाजार कोणत्या सण, वर्धापनदिन आणि राष्ट्रीय सुट्ट्यांवर बंद होणार आहे.
‘ही’ LIC Scheme महिलांना देईल आर्थिक बळ, प्रत्येक महिन्याला मिळेल पैसे
प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला देशात नॅशनल हॉलिडे असून हा दिवस रविवार असणार आहे. जानेवारीत शेअर बाजाराला एकच सुट्टी असते आणि तीही रविवारी येते.
फेब्रुवारीमध्ये, महाशिवरात्रीच्या सुट्टीनिमित्त बुधवार 26 फेब्रुवारी रोजी शेअर बाजार बंद राहील.
बुधवार 14 मार्च रोजी होळीच्या सणानिमित्त शेअर बाजाराला सुट्टी असेल. तर ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त सोमवारी 31 मार्च रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे.
श्री महावीर जयंतीनिमित्त गुरुवार 10 एप्रिल रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सोमवार 14 एप्रिल रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे.
शेअर्सने अवघ्या 5 दिवसात दिला 100 टक्के नफा, गाठला 52 आठवड्यांचा नवा उच्चांक!
महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी 1 मे रोजी शेअर बाजाराला सुट्टी असणार आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. बुधवार 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.
2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त शेअर बाजारात सुट्टी असेल. मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शेअर बाजारात सुट्टी असेल. 22 ऑक्टोबर, बुधवार, दिवाळी-बळी प्रतिपदेच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार आहे.
बुधवार 5 नोव्हेंबर रोजी श्री गुरु नानक देव निमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.
डिसेंबरमध्ये शेअर बाजाराची सुट्टी 25 डिसेंबर म्हणजेच नाताळाच्या दिवशी असेल आणि हा दिवस गुरुवारी येतो.