'ही' LIC Scheme महिलांना देईल आर्थिक बळ, प्रत्येक महिन्याला मिळेल पैसे
भारतात जेवढे लोकं म्युचल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट लोकं आपल्या आयुष्याचे इंश्युरन्स काढत असतात. आणि जेव्हा विषय लाइफ इंश्युरन्सचा निघतो तेव्हा आपसूकच आपल्या डोळ्यांसमोर एकच कंपनी उभी राहते ती म्हणजे LIC.
आजही अनेक जण आपल्या प्रिया जणांचे लाइफ इंश्युरन्स LIC कडूनच काढताना दिसतात. एवढा ग्राहकांचा विश्वास कंपनीने मिळवला आहे. काही वर्षांपूर्वी कंपनीचा जेव्हा आयपीओ मार्केटमध्ये आला होता तेव्हा सुद्धा कित्येक जणांनी या आयपीओसाठी अप्लाय केले होते. आता कंपनीने महिलांसाठी एक स्पेशल स्कीम चालू केली आहे. ही स्कीम नक्कीच महिलांना आर्थिक बळ देणार आहे. चला
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने प्रत्येक व्यक्तीसाठी उत्तम विमा पॉलिसी आणल्या आहेत. आता AEIC ने महिलांसाठी विशेष योजना आणली आहे. या योजनेची खास बाब म्हणजे महिलांना दर महिन्याला पैसे मिळणार आहे. वास्तविक ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सुरू केली आहे. विमा सखी योजना असे या योजनेचे नाव आहे. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. चला या योजनेबद्दल जाणून घेऊया.
पुढील आठवडा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा; ‘हे’ IPO होणार लाँच
विमा सखी योजनेत वर्षभरात 100,000 विमा सखींचा समावेश करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिला विमा एजंट बनतील. एकीकडे एलआयसीची विमा सखी योजना महिलांना कमाईची संधी देत आहे. दुसरीकडे, विम्याबाबत जागरूकता वाढवण्यास मदत देखील होत आहे. या योजनेमुळे भारतातील वंचित भागातही विमा उपलब्ध होईल.
एलआयसीच्या या योजनेचा उद्देश महिलांना सक्षम करणे व त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. यामध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील आणि किमान 10वी उत्तीर्ण महिलांचा समावेश आहे. LIC ने एका वर्षात 100,000 विमा सखी आणि तीन वर्षात 200,000 विमा सखींची यादी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 1 जानेवारीपासून कोणत्याही तारणशिवाय मिळणार 2 लाखांचे कृषी कर्ज
या योजनेत समाविष्ट असलेल्या सखींना पॉलिसी विकताना कमिशन मिळणार आहे. याशिवाय पहिल्या तीन वर्षांत निश्चित स्टायपेंड दिला जाईल. पहिल्या वर्षी महिलांना दरमहा 7,000 रुपये मिळतील, त्यानंतर दुसऱ्या वर्षी ही रक्कम वाढून 6,000 रुपये होईल. त्याचप्रमाणे तिसऱ्या वर्षी ही रक्कम 5,000 रुपये होईल. जर एखाद्या महिलेने टार्गेट पूर्ण केले तर तिला अतिरिक्त कमिशन देखील मिळेल. योजनेच्या सुरुवातीला महिलांना तीन वर्षांसाठी विशेष प्रशिक्षण आणि आर्थिक शिक्षणही मिळणार आहे.