शेअर्सने अवघ्या 5 दिवसात दिला 100 टक्के नफा, गाठला 52 आठवड्यांचा नवा उच्चांक!
शेअर बाजारातील माेठ्या चढ-उतारात शु्क्रवारी महालक्ष्मी रबटेक (Mahalaxmi Rubtech) च्या शेअर्समध्ये माेठी तेजी हेती. बीएसईवर कंपनीचा शेअर्स 10 टक्के वाढून 311.10 रुपयांवर पोहोचला. सलग पाच दिवसांपासून महालक्ष्मी रबटेकच्या शेअर्समध्ये माेठी वाढ झाली आहे.
52 आठवड्यांचा नवा उच्चांक
महालक्ष्मी रबटेक शेअर्सने 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांना 100 टक्के नफा दिला आहे. कंपनीचे शेअर्स 6 डिसेंबर 2024 रोजी 155.60 रुपयांच्या पातळीवर होते. तर 13 डिसेंबर 2024 रोजी शेअर्स 311.10 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 140 रुपये आहे.
(फोटो सौजन्य – istock)
मोफत आधार कार्ड अपडेट करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ; 14 जून 2025 पर्यंत असेल संधी!
किती आहे कंपनीचे मार्केट कॅप
महालक्ष्मी रुबटेकचे शेअर्स 17 डिसेंबर 2004 रोजी 3.32 रुपयांवर होते. आता शेअर्स 311.10 रुपयांवर बंद झाले. गेल्या 20 वर्षात शेअर्समध्ये 9268 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. महालक्ष्मी राबटेक लिमिटेड पारंपारिक कापड, पॉलिमर आधारित तांत्रिक कापड आणि रबर उत्पादनांचे उत्पादन आणि विपणन करण्याच्या व्यवसायात आहे. महालक्ष्मी राबटेकचे मार्केट कॅप 330 कोटींच्या पुढे गेले आहे.
डिसेंबरच्या शेवटी 11 दिवस बँका बंद राहणार; वाचा…तुमच्या भागातील बँकेला कधी सुट्टी असणार?
5 वर्षांत 820 टक्के परतावा
महालक्ष्मी रुबटेकच्या शेअर्सने 5 वर्षात 820 टक्के परतावा दिला आहे. शेअर्स 13 डिसेंबर 2019 रोजी 33.80 रुपयांवर होते. गेल्या 4 वर्षात शेअर्समध्ये 643 टक्के वाढ झाली आहे. 18 डिसेंबर 2020 रोजी महालक्ष्मी राबटेकचे शेअर्स 41.85 रुपयांवर होते. मागील 3 वर्षांत शेअर्समध्ये 422 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 59.60 रुपयांवरून 311.10 रुपयांवर बंद झाले आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर, वाचा… मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर?
काय करते ही कंपनी
महालक्ष्मी राबटेक लिमिटेड पारंपारिक कापड, पॉलिमर आधारित तांत्रिक कापड आणि रबर उत्पादनांचे उत्पादन आणि विपणन करण्याच्या व्यवसायात आहे. महालक्ष्मी राबटेकचे मार्केट कॅप 330 कोटींच्या पुढे गेले आहे. महालक्ष्मी रुबटेकच्या शेअर्सने 5 वर्षात 820 टक्के परतावा दिला आहे. शेअर्स 13 डिसेंबर 2019 रोजी 33.80 रुपयांवर होते.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)