
Share Market Today: शेअर बाजारात कोणते स्टॉक्स ठरणार गेमचेंजर? तज्ज्ञ काय म्हणाले? जाणून घ्या
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण; आजचा 22, 24 आणि 18 कॅरेटचा भाव किती? जाणून घ्या
सोमवारी, भारतीय शेअर बाजार सपाट पातळीवर बंद झाला, आणि बेंचमार्क निफ्टी ५० २४,६०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स ४३.२७ अंकांनी, म्हणजेच ०.०६ टक्क्यांनी वाढून ७८,५४२.४४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १३.१५ अंकांनी, म्हणजेच ०.०५ टक्क्यांनी वाढून २४,५८३.८० वर स्थिरावला. (फोटो सौजन्य: Pinterest)
आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार रेल विकास निगम, एमआरएफ, झायडस लाइफसायन्सेस, एनबीसीसी (इंडिया), सेंको गोल्ड, व्होडाफोन आयडिया, विप्रो, बीएसई, भारती एअरटेल, ओएनजीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ग्रंथी फार्मा, ल्युपिन, झेन टेक्नॉलॉजीज, केईसी इंटरनॅशनल या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये सुवेन लाईफ सायन्सेस, पॉली मेडिक्युअर, राघव प्रोडक्टिव्हिटी एनहान्सर्स, स्टील स्ट्रिप्स व्हील्स आणि ब्रिगेड एंटरप्रायझेस यांचा समावेश आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज आणि टेक्निकल विभागाचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी टीव्हीएस मोटर कंपनी, श्रीराम फायनान्स आणि ग्रासिम इंडस्ट्रीज या शेअर्सची शिफारस केली आहे.
चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, गणेश डोंगरे आणि आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक यांनी इंट्राडे ट्रेडिंगसाठी खरेदी-विक्री करण्याकरिता आज गुंतवणूकदारांना आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये पिरामल फार्मा लिमिटेड, टायटन कंपनी लिमिटेड, पिरामल फायनान्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड, बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स लिमिटेड (ग्रोव), सेमिंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड यांचा समावेश आहे.