Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
प्रभुदास लिलाधरच्या टेक्निकल रिसर्च विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांसाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये इटरनल, अर्बन कंपनी आणि रेन इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार पाइन लॅब्स, वारी एनर्जीज, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस, जीके एनर्जी, ट्रान्सरेल लायटिंग, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (जीआरएसई), यूफ्लेक्स, रिलायबल डेटा सर्व्हिसेस, निओजेन केमिकल्स, पर्पल स्टाइल लॅब्स, पेस डिजिटेक, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी, ऑनवर्ड टेक्नॉलॉजीज या शेअर्सवर आज लक्ष केंद्रित करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी केन्स टेक्नॉलॉजी, ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी , एनटीपीसी ग्रीन एनर्जी , इटरनल आणि आवास फायनान्सर्स या पाच शेअर्सची निवड केली आहे.






