Samruddhi Mahamarg Security ( समृद्धी महामार्ग सुरक्षा )
समृद्धी महामार्गावरील सावंगी इंटरचेंज येथील नियंत्रण कक्षाला अतुलकर यांनी भेट देऊन एमएसआरडीसी, महामार्ग सुरक्षा यंत्रणा आणि टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अडचणी जाणून घेतल्या. महामार्गावरील काही भागांत मोबाइल नेटवर्क नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता येत नाही. अशा ठिकाणी मोबाइल कंपन्यांचे टॉवर उभारण्यासह एसओएस लैंडलाइन सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
महामार्गाच्या काही ठिकाणी संरक्षण भिंती तोडल्याने गुन्हेगारांना आत बाहेर जाण्यास मार्ग मिळत आहे. त्यामुळे अशा ठिकाणांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला जाणार आहे. याशिवाय टोलनाक्यावरील फास्टंगवर नोंद असलेला वाहन क्रमांक आणि प्रत्यक्ष वाहनाचा क्रमांक जुळत नसतानाही वाहन सोडले जात असल्याची त्रुटी समोर आली आहे. सॉफ्टवेअरमधील हा दोष दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाणार आहेत. विविध यंत्रणांमध्ये संपर्कासाठी समान प्रोटोकॉल नसल्याने वायरलेस यंत्रणेतही सुधारणा करण्यावर भर राहणार आहे.
महामार्गावरील घटनांनंतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीवरून वाद होऊ नये, यासाठी पीडितांनी प्रथम जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. त्यानंतर संबंधित हद्द निश्चित करून गुन्हा वर्ग केला जाईल, असे अतुलकर यांनी स्पष्ट केले.
समृद्धी महामार्गावर अपघात, लुटमार, संशयास्पद हालचाली किया वाहनातील इंधन संपल्याने कोणी अडचणीत असल्याचे दिसल्यास तातडीने ११२ वर संपर्क साधावा. जवळचे पोलिस वाहन मदतीसाठी पोहोचेल. प्रवासादरम्यान आपले लोकेशन कुटुंबीयांना पाठवून ठेवावे, असे आवाहन अतुलकर यांनी केले.
Amravati News: रुग्णसेवेवर राजकीय सावट! रुग्णांची परवड; आमदार निधीतील रुग्णवाहिकेला ‘ब्रेक’






