Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: कोणते स्टॉक्स देणार गुंतवणूकदारांना कमाईची संधी? टाटा पॉवर, भारती एअरटेलसह तज्ज्ञांनी केली या शेअर्सची निवड

Share Market Update: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांदरम्यान आज भारतीय शेअर बाजार वाढीसह सुरू होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी आजच्या व्यवहारासाठी टाटा पॉवर, भारती एअरटेलसह अनेक शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 13, 2026 | 09:03 AM
Share Market Today: कोणते स्टॉक्स देणार गुंतवणूकदारांना कमाईची संधी? टाटा पॉवर, भारती एअरटेलसह तज्ज्ञांनी केली या शेअर्सची निवड

Share Market Today: कोणते स्टॉक्स देणार गुंतवणूकदारांना कमाईची संधी? टाटा पॉवर, भारती एअरटेलसह तज्ज्ञांनी केली या शेअर्सची निवड

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टीमधील तेजीमुळे आज सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक सुरुवात करू शकतात.
  • तज्ज्ञांनी टाटा पॉवर, भारती एअरटेल, केपीआयटी टेक्नॉलॉजीज आणि मॅक्स हेल्थकेअर यांसारख्या शेअर्सची निवड केली आहे.
  • बाजारातील चढ-उतारात गुंतवणूकदारांसाठी काही स्टॉक्स कमाईची संधी देऊ शकतात.
India Share Market Update: जागतिक बाजारांमधील संमिश्र संकेतांचा विचार करता आज १३ मे रोजी, बुधवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, वाढीसह उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ३० पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,४५४ च्या पातळीवर व्यवहार करत होता. आजच्या व्यवहारात गुंतवणूकादारांसाठी कोणते शेअर्स जास्त फायद्याचे ठरू शकतात, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

Todays Gold-Silver Price: ग्राहकांना मोठा धक्का! मुंबई-पुण्यासह देशभरात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, चांदीही झाली महाग

मंगळवारी, भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम राहिला, ज्यामुळे बेंचमार्क निफ्टी ५० २३,४०० च्या पातळीखाली घसरला. सेन्सेक्स १,४५६.०४ अंकांनी, म्हणजेच १.९२ टक्क्यांनी घसरून ७४,५५९.२४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४३६.३० अंकांनी, म्हणजेच १.८३ टक्क्यांनी घसरून २३,३७९.५५ वर स्थिरावला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक ८८४.७० अंकांनी, म्हणजेच १.६३ टक्क्यांनी घसरून ५३,५५५.२० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि डेरिव्हेटिव्हज व क्वांट रिसर्च प्रमुख जय ठक्कर यांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी केपीआयटी टेक्नॉलॉजीज फ्युचर्स, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट फ्युचर्स आणि इटरनल फ्युचर्स या शेअर्सची शिफारस केली आहे. तसेच तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, आज शेअर बाजारातील गुंतवणूकदार भारती एअरटेल, टाटा मोटर्स, टीव्हीएस मोटर कंपनी, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, ऑइल इंडिया, सिप्ला, व्होडाफोन आयडिया, टाटा पॉवर, टॉरेंट पॉवर, नझारा टेक्नॉलॉजीज, डॉ. रेड्डीज, डिक्सन टेक्नॉलॉजीज, रेल विकास निगम, पीएनसी इन्फ्राटेक, युनायटेड ब्रुअरीज या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

जागतिक संकट गडद; भारताचा आर्थिक लवचिकता आणि ऊर्जा स्थिरतेवर भर

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज शेअर बाजारातील गुंतवणूकदार आरआर केबल, व्ही२ रिटेल, बजाज कंझ्युमर केअर, वनसोर्स स्पेशालिटी फार्मा आणि ब्लिस जीव्हीएस फार्मा हे शेअर्स खरेदी करण्याला प्राधान्य देऊ शकतात. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये ॲक्सिस बँक, डीएलएफ आणि पीएनबी यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market today experts pick tata power bharti airtel and other stocks for potential gains share market news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Trent Return: Noel Tata जाण्यापूर्वी ट्रेंट शेअरची कमाल, 1 लाख रुपयांचे केले 47 लाख; Zudio आणि Westside ने पालटला खेळ!
1

Trent Return: Noel Tata जाण्यापूर्वी ट्रेंट शेअरची कमाल, 1 लाख रुपयांचे केले 47 लाख; Zudio आणि Westside ने पालटला खेळ!

Market Crash: फक्त ‘या’ दोघांनी नोकरी बदलली अन् जगभरातील शेअर बाजार पत्त्यांसारखे कोसळले; टेक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्स पाण्यात
2

Market Crash: फक्त ‘या’ दोघांनी नोकरी बदलली अन् जगभरातील शेअर बाजार पत्त्यांसारखे कोसळले; टेक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्स पाण्यात

Market Fall: भारतात Share Market बंद पण South Korea मार्केटमध्ये हाहाःकार! ट्रेडिंग थांबवण्याची आली वेळ
3

Market Fall: भारतात Share Market बंद पण South Korea मार्केटमध्ये हाहाःकार! ट्रेडिंग थांबवण्याची आली वेळ

Stock Market News: तेलाच्या किमती घसरल्या, सेन्सेक्स उसळला; एका दिवसात गुंतवणूकदारांना ₹2 लाख कोटींचा फायदा
4

Stock Market News: तेलाच्या किमती घसरल्या, सेन्सेक्स उसळला; एका दिवसात गुंतवणूकदारांना ₹2 लाख कोटींचा फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.