Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कितीही पैसे कमावले, तरीही ‘या’ राज्यात नाही भरावा लागत आयकर! वाचा… कोणते आहे हे करमुक्त राज्य!

आपण जेवढे कमावतो त्यापैकी काही टक्के कर आपल्याला सरकारला द्यावा लागतो. मात्र, सिक्कीम हे राज्य केंद्र सरकारच्या आयकर कायद्यापासून मुक्त असून, तेथील नागरिकांना एक रुपयांचाही आयकर द्यावा लागत नाही.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 08, 2024 | 06:19 PM
कितीही पैसे कमावले, तरीही 'या' राज्यात नाही भरावा लागत आयकर! वाचा... कोणते आहे हे करमुक्त राज्य!

कितीही पैसे कमावले, तरीही 'या' राज्यात नाही भरावा लागत आयकर! वाचा... कोणते आहे हे करमुक्त राज्य!

Follow Us
Close
Follow Us:

आपण जेवढे कमावतो त्यापैकी काही टक्के कर आपल्याला सरकारला द्यावा लागतो. आयकर या नावाने असलेल्या करामुळे मध्यमवर्गीय चांगलेच त्रस्त आहेत. पण भारतातील असेही एक राज्य आहे जिथे हा त्रासदायक कर लागू नाही. त्या राज्यातील एकाही व्यक्तीला तिच्या कमाईवर सरकारला आयकर द्यावा लागत नाही. सिक्कीम हे राज्य केंद्र सरकारच्या आयकर कायद्यापासून मुक्त असून सिक्कीम वासियांना एक रुपयांचाही आयकर द्यावा लागत नाही.

सिक्कीमला आयकरातून सूट का?

भारतीय आयकर कायद्याच्या कलम 10 (26AAA) अंतर्गत देण्यात आलेल्या विशेष सूटमुळे सिक्कीममधील लोकांना आयकर द्यावा लागत नाही. 1975 मध्ये भारतात विलीन झाल्यापासून सिक्कीमला आयकरातून सूट देण्यात आली आहे.

सिक्कीम भारतात सामील होण्यापूर्वी त्याची स्वतंत्र कर प्रणाली होती आणि भारतीय आयकर कायदे तेथील रहिवाशांना लागू नव्हते. ही व्यवस्था कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सिक्कीमला आयकरातून सूट दिली. 2008 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पांतर्गत सिक्कीम टॅक्स अ‍ॅक्ट रद्द करण्यात आला आणि आयकर कायद्याच्या कलम 10(26AAA) द्वारे ही सूट लागू करण्यात आली. घटनेच्या कलम 371 (एफ) अंतर्गत सिक्कीमचा विशेष दर्जा राखण्यासाठी ही विशेष सूट देण्यात आली आहे.

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून ‘या’ नियमात मोठा बदल!

कायदेशीर आव्हान आणि वाद

असोसिएशन ऑफ ओल्ड सेटलर्स ऑफ सिक्कीम या संस्थेने 2013 साली कलम 10 (26AAA) च्या घटनात्मकतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांनी असा युक्तिवाद केला की दोन गटांना ‘सिक्किमी’च्या व्याख्येतून चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आले आहे. सर्वप्रथम जे भारतीय 26 एप्रिल 1975 पूर्वी सिक्कीममध्ये स्थायिक झाले होते परंतु ज्यांची नावे सिक्कीम सब्जेक्ट्स रजिस्टर मध्ये नाहीत. दुसरे म्हणजे 1 एप्रिल 2008 नंतर बिगर सिक्कीम पुरुषांशी लग्न करणाऱ्या सिक्कीम स्त्रिया, त्यांनाही या व्याख्येतून वगळण्यात आले आहे.

कलम 10 (26AAA) अंतर्गत ‘सिक्किमी’च्या व्याख्येमध्ये 26 एप्रिल 1975 पूर्वी ‘सिक्कीम सब्जेक्ट्स रजिस्टर’ मध्ये नोंदणी केलेल्या किंवा ज्यांचे जवळचे नातेवाईक या रजिस्टरमध्ये नोंदणीकृत होते. अशा व्यक्तींचा समावेश होतो. तथापि या व्याख्येने सिक्कीममध्ये स्थायिक झालेल्या सुमारे 1 टक्के लोकांना सूटच्या कक्षेतून वगळले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाला, 1 एप्रिल 2008 नंतर सिक्कीमी नसलेल्या पुरुषांशी विवाह केलेल्या सिक्कीमी महिलांना आयकर सवलतीपासून वगळण्याचा नियम भेदभावपूर्ण असल्याचं आढळलं. न्यायालयाने हे समानतेच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. ही गोष्ट असमान तर आहेच, पण सिक्कीमच्या महिलांच्या अधिकारांवरही घाला घालते असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायालयाने ही गोष्ट अवैध ठरवली. या ऐतिहासिक निर्णयामुळे सिक्कीममधील रहिवाशांचे हक्क आणि समानतेचे तत्व अधिक दृढ झाले आहे.

 

Web Title: Sikkim income tax free state in india sikkimese women tax rights tax exemption section 10 26aaa income slabs budget 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 06:19 PM

Topics:  

  • Budget
  • Business News
  • income tax

संबंधित बातम्या

मुंबईतील ‘एसएमबी’ उद्योगांना एआयचा आधार; प्रत्येक १० पैकी ९ व्यवसाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देत आहेत प्राधान्य
1

मुंबईतील ‘एसएमबी’ उद्योगांना एआयचा आधार; प्रत्येक १० पैकी ९ व्यवसाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देत आहेत प्राधान्य

Quick Heal कडून टोटल सिक्युरिटी Version 26 लाँच, AI Technology मुळे सुरक्षित अजूनच दृढ होणार
2

Quick Heal कडून टोटल सिक्युरिटी Version 26 लाँच, AI Technology मुळे सुरक्षित अजूनच दृढ होणार

Budget 2026-27: २०२६-२७ अर्थसंकल्प पूर्वी BFSI उद्योगाने मांडल्या मागण्या; ठेवी वाढवण्यासाठी FD वरील करप्रणालीत बदलाची मागणी
3

Budget 2026-27: २०२६-२७ अर्थसंकल्प पूर्वी BFSI उद्योगाने मांडल्या मागण्या; ठेवी वाढवण्यासाठी FD वरील करप्रणालीत बदलाची मागणी

FD सोडा! RBI च्या फ्लोटिंग रेट्स बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने मिळेल ‘जबरदस्त’ रिटर्न
4

FD सोडा! RBI च्या फ्लोटिंग रेट्स बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने मिळेल ‘जबरदस्त’ रिटर्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.