
घरच्या घरी सुरु करा 'हे' 5 हटके बिझनेस, होईल बक्कळ कमाई; वाचा... कशी कराल सुरुवात!
सध्याच्या घडीला पैसा हा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. त्यातूनही कर्ज, ईएमआय, भाडे, खर्च, वैद्यकीय खर्च यांचा भारही आपल्यावर कुठे ना कुठेतरी असतो. होम लोन, कार लोन, एज्युकेशन लोन घेतल्यानंतर ते परत फेडणेही महत्त्वाचे असते. त्यातून महत्त्वाचे असते ते म्हणजे उत्पन्न. उत्पन्न जितके जास्त असेल तर मग आपणही खर्च, बचत, गुंतवणूक याचे व्यवस्थापन करू शकतो.
घरच्या घरी बसून तुम्ही अनेक छोटे-मोठे उद्योग करू शकतात. त्यातून आपल्याला असे काही उद्योग शोधावे लागतात. जे आपल्यासाठी सोयीस्करही असतील आणि आपण त्यातून बक्कळ पैसाही कमावू शकतो. त्यामुळे आपल्याला योग्य व्यवस्थापन आणि युक्ती चालवावी लागते. आजकाल अनेक लोक हे नोकरी, उरलेल्या वेळातही आपला बिझनेस उभा करतात.
(फोटो सौजन्य – istock)
तुम्हीही साईड बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल. तर तुम्ही योग्य बजेट, प्रोफिट-लॉसच्या आराखड्यात बसवून हुशारीने आपला बिझनेस सुरू करू शकतात. याच पार्श्वभुमीवर आज आपण असे काही सहज सोपे बिझनेस जे तुम्ही घरच्या घरी देखील सुरू करू शकतात. ज्यातून तुम्हाला महिन्याला 20-25 हजार रूपये कमाई होऊ शकते. त्याबद्दल जाणून घेणार आहोत…
हे देखील वाचा – 1 लाखाचे झाले 1 कोटी रुपये; ‘या’ पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल!
डिस्पोजल पॅकिंग : डिस्पोजल मेकिंग मशीन बसवून तुम्ही डिस्पोजल पॅकिंगचा व्यवसाय घरी सुरू करू शकता. हे काम करून तुम्ही दरमहा 20 हजार ते 25 हजार रुपये कमवू शकता.
पेन्सिल पॅकिंग : पेन्सिल पॅकिंगचे काम तुम्ही घरी बसूनही सुरू करू शकता. पेन्सिल पॅकिंगसाठी तुम्हाला जवळच्या कंपनीशी बोलावे लागेल. कंपनीकडून पेन्सिल तुमच्या घरी पोहोचवली जाईल आणि तुम्हाला पेन्सिल पॅक करावी लागेल.
ज्वेलरीचा व्यवसाय : होलसेलमधून फॅन्सी बांगड्या, नेकलेस, कानातले, अंगठ्या आणि इतर स्टायलिश ज्वेलरी विकून तुम्ही दरमहा 10 हजारापर्यंत पैसे कमावू शकता. त्यातून वेडिंग, फेस्टिवल सिझनमध्ये तुम्ही योग्य असं मार्केटिंग करून त्याहून जास्त पैसे कमावू शकता.
साबण पॅकिंग : तुमच्या घराजवळील साबण कारखान्यातून पॅकिंगची ऑर्डर घेऊन तुम्ही हे काम करू शकता. यातूनही तुम्ही घरबसल्या चांगले पैसे कमावू शकता.
हँडमेड प्रोडक्ट्सची विक्री : तुम्ही घरी बसून मेणबत्त्या, पेंटिंग्ज, कलाकुसर, खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू तयार करून विकू शकता. यातूनही तुम्ही घसघशीत पैसे कमावू शकता.