Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Group: भारतीय सेमीकंडक्टर स्वप्नाला इंटेलची साथ! टाटासोबत केली मोठी भागीदारी..; गुजरात–आसाममध्ये उभारणार सेमीकंडक्टर हब

अमेरिकन चिप उत्पादक इंटेलने स्थानिक बाजारपेठेसाठी भारतात सेमीकंडक्टर्सचे उत्पादन आणि असेंबल करण्यासाठी टाटा समूहासोबत करार केला आहे. या करारामुळे एआय पीसी क्रांतीला मोठा हातभार लागणार आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 10, 2025 | 09:56 AM
भारतीय सेमीकंडक्टर स्वप्नाला इंटेलची साथ! टाटासोबत केली मोठी भागीदारी

भारतीय सेमीकंडक्टर स्वप्नाला इंटेलची साथ! टाटासोबत केली मोठी भागीदारी

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात सेमीकंडक्टर्सचे उत्पादन लवकरच
  • इंटेल आणि टाटा यांच्यात करार
  • एकूण गुंतवणूक अंदाजे १.१८ लाख कोटी रुपये

Tata Group: अमेरिकन चिप उत्पादक इंटेलने स्थानिक बाजारपेठेसाठी भारतात सेमीकंडक्टर्सचे उत्पादन आणि असेंबल करण्यासाठी टाटा समूहासोबत करार केला आहे. या करारामुळे एआय पीसी क्रांतीला मोठा हातभार लागणार आहे. भारताला टॉप-5 पीसी बाजार बनवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. या करारमुळे ‘मेक इन इंडिया’ला मोठी चालना मिळणार आहे. भारतात सेमीकंडक्टर निर्मितीला नवी गती मिळणार आहे.

टाटा समूहाने सोमवारी याची घोषणा केली. या करारांतर्गत, इंटेल आणि टाटा संयुक्तपणे भारतातील ग्राहक आणि व्यावसायिक बाजारपेठांसाठी विशेषतः डिझाइन केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पीसी सोल्यूशन्सच्या विकासाचा आणि जलद विस्ताराचा शोध घेतील. २०३० पर्यंत भारत जगातील शीर्ष पाच बाजारपेठांपैकी एक होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : Stock Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची ओपनिंग, कोणत्या शेअर्समध्ये कराल गुंतवणूक? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

टाटा समूहाच्या निवेदनात म्हटले आहे की, इंटेल आणि टाटा समूहाचे असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या आगामी कारखाने आणि ओएसएटी (आउटसोर्स्ट सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट) सुविधांमध्ये भारतातील स्थानिक बाजारपेठेसाठी इंटेल उत्पादने तयार आणि पॅकेज करण्याची शक्यता शोधण्याचा तसेच भारतातील प्रगत पॅकेजिंगच्या क्षेत्रात सहकार्य करण्याचा मानस ठेवतात.

टाटा समूह गुजरातमधील धोलेरा येथे एक चिप उत्पादन प्रकल्प आणि आसाममध्ये एक सेमीकंडक्टर असेंब्ली अँड पैकेजिंग प्रकल्प उभारत आहे, ज्याची एकूण गुंतवणूक अंदाजे १.१८ लाख कोटी आहे. इंटेल कॉपॅर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लिप-बू टॅन म्हणाले, “भारतात पीसीची वाढती मागणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा जलद अवलंब यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या संगणक बाजारपेठांपैकी एकामध्ये टाटासोबत सहयोग करण्याची ही एक उत्तम संधी आहे असे आम्हाला वाटते.

हेही वाचा : Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर अचानक कोसळले, चांदीची किंमत झपाट्याने वाढली! जाणून घ्या सविस्तर

टाटाच्या सेमीकंडक्टर प्रकल्पांना जेव्हा केंद्र सरकारने मंजुरी दिली, तेव्हा टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. जी मोठी वाढ दिसून आली ती काही दिवसांत सुमारे २१% पर्यंत गेली होती. हा परिणाम मुख्यतः बाजारातील सकारात्मक भावनेमुळे झाला असून कंपनी डिझाइन आणि तंत्रज्ञान सेवांमध्ये आघाडीवर आहे आणि सेमीकंडक्टर डिझाइन व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये सेवा पुरवते. टाटाच्या सेमीकंडक्टर उद्योगाच्या वाढीचा टाटा एलक्सीला दीर्घकालीन फायदा होऊ शकतो.

Web Title: Tata and intel enter into a major partnership for the ai pc revolution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Business News
  • Tata Group

संबंधित बातम्या

Mehul Choksi ला बेल्जियम न्यायालयाचा मोठा झटका! प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका फेटाळली, भारतात आणण्याचा रस्ता मोकळा
1

Mehul Choksi ला बेल्जियम न्यायालयाचा मोठा झटका! प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका फेटाळली, भारतात आणण्याचा रस्ता मोकळा

भारत बनणार AI हब! मायक्रोसॉफ्टची $१७.५ अब्ज गुंतवणुकीची घोषणा; सत्य नडेलांच्या मोदी भेटीनंतर मोठा निर्णय
2

भारत बनणार AI हब! मायक्रोसॉफ्टची $१७.५ अब्ज गुंतवणुकीची घोषणा; सत्य नडेलांच्या मोदी भेटीनंतर मोठा निर्णय

Global Humanitarian Award: अनंत अंबानी ‘ग्लोबल ह्यूमैनिटेरियन अवॉर्ड’ने सन्मानित; सर्वात तरुण आणि पहिले आशियाई मानकरी!
3

Global Humanitarian Award: अनंत अंबानी ‘ग्लोबल ह्यूमैनिटेरियन अवॉर्ड’ने सन्मानित; सर्वात तरुण आणि पहिले आशियाई मानकरी!

8th Pay Commission: 1 जानेवारीपासून लागू होणार 8 वा वेतन आयोग? सरकारने संसदेत दिली पूर्ण माहिती, कुठपर्यंत पोहलची मजल
4

8th Pay Commission: 1 जानेवारीपासून लागू होणार 8 वा वेतन आयोग? सरकारने संसदेत दिली पूर्ण माहिती, कुठपर्यंत पोहलची मजल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.