Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साऊथ आफ्रिकन टूरिझमचा इंडिया रोडशो २०२५: अधिक मोठा, लक्षवेधक, ४० प्रदर्शक आणि ६ नवीन उत्‍पादनांसह परतला

South African Tourism’s India Roadshow 2025: भारत साऊथ आफ्रिकन टूरिझमसाठी महत्त्वपूर्ण स्रोत बाजारपेठ आहे, तसेच दीर्घकालीन द्विपक्षीय प्रवास आणि व्यापार सहयोगांमध्‍ये महत्त्वाचा भागीदार देखील आहे. भारतातील बाजारपेठेप्रती

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Mar 05, 2025 | 01:21 PM
साऊथ आफ्रिकन टूरिझमचा इंडिया रोडशो २०२५: अधिक मोठा, लक्षवेधक, ४० प्रदर्शक आणि ६ नवीन उत्‍पादनांसह परतला (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

साऊथ आफ्रिकन टूरिझमचा इंडिया रोडशो २०२५: अधिक मोठा, लक्षवेधक, ४० प्रदर्शक आणि ६ नवीन उत्‍पादनांसह परतला (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

South African Tourism’s India Roadshow 2025 Marathi News: भारतातील बाजारपेठेप्रती आपली कटिबद्धता दृढ करत साऊथ आफ्रिकन टूरिझमने आपला वार्षिक इंडिया रोडशोच्‍या २०२५ एडिशनला लाँच केले आहे, ज्‍याचा रेनबो नेशनमध्‍ये प्रवास व पर्यटनाला चालना देण्‍याचा मनसुबा आहे. हा उपक्रम भारतातील ट्रेड सहयोगींसोबत संलग्‍न होण्‍यासाठी आणि दोन देशांमधील पर्यटन सहयोगाला अधिक दृढ करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण प्‍लॅटफॉर्म म्‍हणून सेवा देत आहे. १८ ते २० मार्चपर्यंत हा इव्‍हेण्‍ट भारतातील दिल्‍ली, चेन्‍नई व मुंबई या तीन प्रमुख शहरांमध्‍ये आयेाजित करण्‍यात येईल.

दक्षिण आफ्रिकेसाठी अव्‍वल प्राधान्‍य बाजारपेठ म्‍हणून भारत पर्यटन विकासासाठी प्रमुख असल्‍याने या वर्षीचा रोड शो भागधारकांना बहुमूल्‍य व्यवसाय संधी, लुभावणारे अनुभव आणि देशाच्या पर्यटन उद्योगातील प्रमुखांसोबत‍ प्रत्‍यक्ष सहयोग प्रदान करेल. २१ व्‍या एडिशनमध्‍ये हा इव्‍हेण्‍ट भारतातील बाजारपेठेसाठी उत्‍साहवर्धक धोरणात्मक दृष्टीकोन सादर करेल, जो प्रमुख ट्रेंड आणि उदयोन्मुख संधींना प्रकाशझोतात आणेल. साऊथ आफ्रिकन टूरिझमचे आशिया, ऑस्ट्रेलिया आणि मिडल ईस्‍टसाठी प्रादेशिक महाव्यवस्थापक श्री. गकोबानी मॅन्कोटीवा यांच्या नेतृत्वाखाली या रोड शोचे उद्दिष्ट मागील यशांना अधिक दृढ करण्‍याचा आणि भारतीय पर्यटकांच्या आगमनाला आणखी गती देण्‍याचा मनसुबा आहे. भारतीय व्यापार खरेदीदारांसोबत संबंध अधिक दृढ करत या इव्‍हेण्‍टमध्‍ये रेनबो नेशनमधील ४० हून अधिक प्रमुख प्रदर्शक सहभागी होतील, ज्यात ०९ एसएमएमईंचा समावेश आहे, ज्‍यामधून सर्वसमावेशकता आणि व्यवसाय विविधतेप्रती कटिबद्धता दिसून येते. उल्लेखनीय बाब म्हणजे १५ टक्‍क्‍यांहून जास्त प्रदर्शक नवीन उत्पादने आणि ऑफरिंग्‍ज प्रदर्शित करतील, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या आकर्षणात नवीन भर होईल.”

Shreenath Paper IPO:  लिस्टिंग होताच लोअर सर्किट, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

याप्रंसगी मत व्‍यक्‍त करत श्री. मॅन्कोटीवा म्‍हणाले, “भारतामधील आमचा प्रवास अपवादात्मक राहिला आहे. २०२४ च्या आमच्या रोड शोमध्ये १२,००० हून अधिक व्यापार बैठका झाल्या, ज्यामुळे १,६०,००० हून अधिक लीड्स निर्माण झाले, यामधून दक्षिण आफ्रिकेसाठी प्रबळ मागणी दिसून येते. २०२४ मध्ये, भारतामधून दक्षिण आफ्रिकेत ७५,५४१ पर्यटकांचे आगमन झाले, ज्‍यामध्‍ये कोविड-पूर्व पातळीच्‍या तुलनेत ७९ टक्‍के वाढ दिसून आली. प्रबळ गतीसह आमचे २०२५ मध्ये आगमनात १६ टक्‍के वाढ करण्‍याचे लक्ष्य आहे. या रोड शोच्‍या माध्‍यमातून आमचा भारतातील प्रवासी व्यापार भागीदारांसोबत संबंध अधिक दृढ करण्याचा, त्यांना पर्यटन वाढीला गती देण्यासाठी आवश्यक असलेली माहिती आणि साधनांसह सुसज्ज करण्याचा मनसुबा आहे.”

भारत साऊथ आफ्रिकन टूरिझमसाठी महत्त्वपूर्ण स्रोत बाजारपेठ आहे, तसेच दीर्घकालीन द्विपक्षीय प्रवास आणि व्यापार सहयोगांमध्‍ये महत्त्वाचा भागीदार देखील आहे. उपलब्‍धतेबाबत सांगताना पर्यटन मंत्री पॅट्रिशिया डी लिल यांनी नुकतेच इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन (ईटीए) सिस्‍टम सुरू करण्याची घोषणा केली, जी भारतीय प्रवाशांसाठी व्हिसा अर्ज प्रक्रिया सोपी करण्यासाठी सज्ज आहे. याव्यतिरिक्‍त, आता कार्यरत असलेल्‍या ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम (टीटीओएस) पोर्टलमुळे ग्रुप व्हिसा अर्ज प्रक्रियेला गती मिळेल, ज्यामुळे प्रवास प्रक्रिया सुरळीत होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान प्रत्‍यक्ष उड्डाण मार्ग स्थापित करण्यासाठी, कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि इनबाउंड पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील चर्चा सुरू आहेत.

२०२५ कडे वाटचाल करत साऊथ आफ्रिकन टूरिझम प्रमुख ग्राहक विभागांवर लक्ष केंद्रित करत आहे, ज्यात साहसी पर्यटनाचा आनंद घेणारे, लक्झरी प्रवासी, कुटुंबातील पर्यटक आणि माईस (MICE) समूह यांचा समावेश आहे. भारतातील प्रवासी लोकसंख्येमध्‍ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे, २०२४ मध्ये ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे आणि दक्षिण आफ्रिकेला कौटुंबिक प्रवास करणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. माइस विभाग प्रमुख प्राधान्‍य आहे, तसेच माइस आणि व्यावसायिक प्रवासी भारतामधून येणाऱ्या प्रवाशांमध्‍ये जवळपास ४९ टक्‍के योगदान देतात, त्यापैकी माइसमधून २०.२ टक्‍के भारतीय पर्यटक दक्षिण आफ्रिकेला येतात आणि २९.४ टक्‍के व्यावसायिक प्रवासी आहेत.

२०२५ मध्ये दक्षिण आफ्रिका जी२० अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत असताना जागतिक पर्यटन सहयोग मजबूत करण्यासाठी, शाश्‍वत प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सीमापार संधी वाढवण्यासाठी हा देश उत्सुक आहे. वाढती उपलब्‍धता, वाढता व्यापार सहभाग आणि ‘मोअर अँड मोअर’ ब्रँड उपक्रमासारख्या नाविन्यपूर्ण मोहिमांसह साऊथ आफ्रिकन टुरिझम भारतातील बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे.

Share Market Today: बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला, निफ्टी २२,२५० च्या वर

Web Title: South african tourisms india roadshow 2025 back bigger bolder with 40 exhibitors and 6 new products

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 01:21 PM

Topics:  

  • india
  • South Africa

संबंधित बातम्या

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर
1

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर

Maritime Dispute : जाफना समुद्रात तणाव; श्रीलंकेच्या नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना केली अटक आणि बोटही केली जप्त
2

Maritime Dispute : जाफना समुद्रात तणाव; श्रीलंकेच्या नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना केली अटक आणि बोटही केली जप्त

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?
3

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती
4

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.