Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!

AM/NS &  ICAR-IARI :  आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया AM/NS इंडिया आणि ICAR-IARI यांनी शेतीमध्ये लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांच्या शाश्वत वापरासाठी महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 01, 2026 | 06:02 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • AM/NS इंडिया आणि ICAR-IARI चा संयुक्त पुढाकार
  • शेतीत होणार लोह खनिज टाकाऊ घटकांचा वापर!
  • लोह खनिज टाकाऊ घटकांपासून महत्त्वपूर्ण संशोधन
AM/NS &  ICAR-IARI : आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (AM/NS इंडिया) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद – भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR-IARI) यांनी आज शेतीमध्ये लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांच्या (IOTs) शाश्वत वापराबाबत प्रगत संशोधन करण्यासाठी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली, भारतामध्ये चक्राकार अर्थव्यवस्था आणि साधनसंपत्तीच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. ( AM/NS &  ICAR-IARI ) 

Senior Citizens Bank FDs : एफडीवर छप्परफाड रिटर्न! ‘या’ बँकांचे दर नक्की पाहा, 2 वर्षांत 10 हजारांचे होतील तब्बल ‘इतके’

या सामंजस्य करारावर (MoU) AM/NS इंडियाचे संशोधन आणि विकास प्रमुख डॉ. विश्वनाथन एन. आणि ICAR-IARI चे सहसंचालक (संशोधन) डॉ. सी. विश्वनाथन यांनी स्वाक्षरी करून अदलाबदल केली, याप्रसंगी ICAR-IARI चे प्रमुख शास्त्रज्ञ आणि मुख्य संशोधक डॉ. भूपिंदर सिंग आणि दोन्ही संस्थांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतीमध्ये लोहाच्या टाकाऊ घटकांच्या योग्यतेचा शोध

हे सहकार्य 2024 मध्ये AM/NS इंडिया आणि ICAR-IARI यांच्यात शेतीमध्ये लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांच्या योग्यतेचा शोध घेण्यासाठी सुरू झालेल्या उत्साहवर्धक प्राथमिक अभ्यासावर आधारित आहे, कारण लोह खनिजाच्या शुद्धीकरणादरम्यान तयार होणाऱ्या या लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांमध्ये सिलिका, आयर्न ऑक्साईड, ॲल्युमिना, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी नैसर्गिक खनिजे आणि इतर सूक्ष्म व उपयुक्त पोषक तत्त्वे आढळली होती, ज्यांचा वापर पिकांच्या उत्पादनासाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो.

आशादायक निकाल समोर

ICAR-IARI, नवी दिल्ली आणि AM/NS इंडियाच्या किरंदुल, छत्तीसगड येथील शुद्धीकरण केंद्राजवळ घेतलेल्या प्राथमिक प्रयोगशाळा आणि शेतातील अभ्यासातून आशादायक निकाल समोर आले आहेत. या संशोधनातून असे दिसून आले आहे की धान, गहू आणि भाज्यांसह इतर पिकांसाठी आवश्यक आणि उपयुक्त खनिज पोषक तत्त्वांचा स्त्रोत म्हणून लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांचा वापर करण्याची क्षमता आहे.

उपउत्पादनाच्या दीर्घकालीन साठवणुकीची गरज कमी

हा सध्याचा सामंजस्य करार (MoU) पिकांचा प्रतिसाद, पोषक तत्त्वांची उपलब्धता, फायटो-टॉक्सिसिटी, पाझरण्याची वैशिष्ट्ये आणि एकूण पर्यावरणीय प्रभावाचे मूल्यमापन करण्यासाठी विविध ऋतूंमध्ये IARI, नवी दिल्ली आणि AM/NS इंडिया, किरंदुल येथे करण्यात येणाऱ्या दीर्घकालीन शास्त्रीय अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. या संशोधनाचा उद्देश भक्कम शास्त्रीय पुरावे तयार करणे हा आहे ज्यामुळे शेतीमध्ये लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांचा सुरक्षित आणि फायदेशीर वापर करणे शक्य होईल आणि त्याची खात्री मिळेल. यामुळे खाणकामातील या उपउत्पादनाच्या दीर्घकालीन साठवणुकीची गरज कमी होण्यास मदत होईल.

शाश्वत उपाय शोधण्याच्या उद्देश

हे पथदर्शक संशोधनात्मक सहकार्य खाण क्षेत्रातील एका महत्त्वाच्या उपउत्पादनावर शाश्वत उपाय शोधण्याच्या उद्देशाने केले आहे, ज्यामुळे कृषी उत्पादकता आणि पर्यावरण संरक्षणास मदत होईल. प्रगत शास्त्रीय प्रयोग आणि पडताळणीद्वारे हा प्रकल्प लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांचा सुरक्षित आणि फायदेशीर वापर वाढवणाऱ्या तांत्रिक नवकल्पना देण्याचा प्रयत्न करेल, तसेच नैसर्गिक संसाधनांचे जतन, टाकाऊ घटकांचे प्रमाण कमी करणे व त्यांचे पर्यावरणीय दृष्टीने शाश्वत व्यवस्थापन करणे, रासायनिक खतांची आयात कमी करणे आणि शेतीमध्ये सर्वसमावेशक आरोग्य दृष्टिकोनाला पाठबळ देण्यासोबतच ज्या घटकांना दीर्घकालीन साठवणुकीची गरज भासली असती त्यापासून मूल्य आणि संपत्ती निर्माण करण्याच्या शक्यता निर्माण करेल.

हा उपक्रम उपउत्पादनांच्या साठवणुकीशी संबंधित

AM/NS इंडियाच्या तंत्रज्ञान विभागाचे संचालक आणि उपाध्यक्ष हिरू इशिबाशी म्हणाले: “AM/NS इंडियामध्ये शाश्वतता आणि नाविन्यता सोबत चालतात. ICAR-IARI सोबतचे हे सहकार्य विज्ञान-आधारित संशोधनाद्वारे लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांची क्षमता पूर्णपणे वापर करण्याचा एक पथदर्शक प्रयत्न आहे. यशस्वी झाल्यास, हा उपक्रम उपउत्पादनांच्या साठवणुकीशी संबंधित पर्यावरणीय प्रभाव कमी करून शाश्वत शेती आणि साधनसंपत्तीच्या संरक्षणास पाठबळ देणारा एक फायदेशीर परिणाम साधू शकतो. उद्योग आणि समाज दोन्हीला फायदेशीर ठरणाऱ्या चक्राकार अर्थव्यवस्थेच्या उपायांना पुढे नेण्याची आमची बांधिलकी यातून दिसून येते.”

निकृष्ट दर्जाच्या जमिनींची लोहाची कमतरता

प्रकल्पाचे मुख्य संशोधक डॉ. भूपिंदर सिंग म्हणाले: “औद्योगिक उपउत्पादनांचे फायदेशीर उपयोग विकसित करण्यासाठी त्यांच्या पोषक घटकांचे शास्त्रीय मूल्यमापन करणे ही पहिली गरज आहे. वास्तविक, टाकाऊ घटकांचे मूल्यवर्धन करणे हे शाश्वत शेती आणि पर्यावरणासाठी संशोधनाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. आमच्या प्राथमिक अभ्यासाने कृषी व्यवस्थेत लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांच्या संभाव्य वापराबाबत उत्साहवर्धक संकेत दिले आहेत. AM/NS इंडिया सोबतच्या या दीर्घकालीन सहकार्यात्मक कार्यक्रमाद्वारे आमचे उद्दिष्ट कृषीविषयक कामगिरी, पर्यावरणीय सुरक्षितता आणि पोषक तत्त्वांची गतिशीलता यावर सर्वसमावेशक शास्त्रीय माहिती तयार करणे हे आहे, ज्यामुळे लोह खनिज प्रक्रिया टाकाऊ घटकांच्या जबाबदार वापरासाठी पुरावे-आधारित मार्ग विकसित करण्यात विशेषतः निकृष्ट दर्जाच्या जमिनींची लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पोषक समृद्धता (बायोफोर्टिफिकेशन) प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी शेतमालातील लोहाचे प्रमाण सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.”

ICAR-IARI सोबतचे हे सहकार्य औद्योगिक उपउत्पादनांचे मौल्यवान संसाधनांमध्ये रूपांतर करण्याच्या संभाव्य मार्गांचा अधिक विस्तार करते, ज्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक फायद्यासाठी योगदान मिळते.

AM/NS इंडियाच्या व्यापक शाश्वतता धोरणाशी सुसंगत

हा उपक्रम साधनसंपत्तीची कार्यक्षमता, टाकाऊ घटकांचे मूल्यवर्धन आणि चक्राकार अर्थव्यवस्थेच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या AM/NS इंडियाच्या व्यापक शाश्वतता धोरणाशी सुसंगत आहे. कंपनी साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टाकाऊ स्टीलचा पुनर्वापर, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी स्टील स्लॅगचे “आकार” नावाच्या ब्रँडेड गिट्टी उत्पादनात रूपांतर करणे, झिरो लिक्विड डिस्चार्ज सिस्टीमद्वारे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुनर्वापर आणि आपल्या कार्यामध्ये निर्माण होणाऱ्या 90% पेक्षा जास्त प्रक्रिया उपउत्पादनांचा पुनर्वापर किंवा रिसायकलिंग समाविष्ट आहे.

Aadhar Housing Finance : आधार हाउसिंग फायनान्सची मोठी भरारी! इंडिया रेटिंग्सकडून ‘IND AA+’ रेटिंग अपग्रेड

Web Title: Am ns india and icar iari sign mou for agricultural research details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Business News
  • india

संबंधित बातम्या

September Financial Deadlines : सप्टेंबर महिन्यात ‘या’ 4 मोठ्या डेडलाईन्स चुकवू नका! नाहीतर बसू शकतो मोठा आर्थिक फटका
1

September Financial Deadlines : सप्टेंबर महिन्यात ‘या’ 4 मोठ्या डेडलाईन्स चुकवू नका! नाहीतर बसू शकतो मोठा आर्थिक फटका

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची  AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच
2

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच

Subhash Chandra Case : सुभाष चंद्रा यांच्या अडचणीत वाढ! NCLT कडून कर्ज माफीच्या आदेशाला स्थगिती; मालमत्ता विकण्यावरही घातली बंदी
3

Subhash Chandra Case : सुभाष चंद्रा यांच्या अडचणीत वाढ! NCLT कडून कर्ज माफीच्या आदेशाला स्थगिती; मालमत्ता विकण्यावरही घातली बंदी

Weather: हरित व स्वच्छ तंत्रज्ञानासाठी आता सहज मिळणार कर्ज! एनबीएफसी कंपन्यांनी दूर केली अर्थपुरवठ्यातील दरी
4

Weather: हरित व स्वच्छ तंत्रज्ञानासाठी आता सहज मिळणार कर्ज! एनबीएफसी कंपन्यांनी दूर केली अर्थपुरवठ्यातील दरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.