(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
रॉबर्ट कियोसाकी त्यांच्या X वरील पोस्टमध्ये लिहिलंय की, “१५०० मध्ये नॉस्ट्राडॅमसने आणि १९४० मध्ये एडगर केसीने २०२६ मध्ये बाजार कोसळण्याची भविष्यवाणी केली होती. हे असं घडेल की नाही हे मला माहीत नाही… जर असे घडलं, तर माझा विश्वास आहे की आपण इतर लाखो लोकांसारखे गरीब न राहता नक्कीच श्रीमंत होऊ.”
रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, “मला अशा गोष्टीत गुंतवणूक करायला आवडेल, जी फेड, सरकार आणि वॉल स्ट्रीट छापू शकत नाहीत.” त्या पोस्टमध्ये कियोसाकी यांनी लिहिले आहे की, त्यांना तेल, रिअल इस्टेट, गोल्फ, चांदी, बिटकॉइन, इथेरियम आणि अन्न उत्पादनात गुंतवणूक करायला आवडते.
रॉबर्ट कियोसाकी त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात की ते पुस्तके विकून पैसे कमावतात. त्यांचे ‘कॅशफ्लो बोर्डगेम’ हे पुस्तक सध्या ५० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. ते पुढे हे देखील सांगतात की ते गुरे पाळतात आणि नंतर ती विकतात. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, “मी टेक्सास आणि उत्तरेकडील माझ्या तेल विहिरींमधून तेल विकतो. मी १,५०० मालमत्तांमधून महिना भाडे कमावतो. मी सोने, चांदी, बिटकॉइन आणि इथेरियम जमा केले आहेत.”
त्याच पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, तो फेडरल रिझर्व्ह, सरकार किंवा वॉल स्ट्रीटद्वारे छापल्या जाणाऱ्या ठिकाणी पैसे गुंतवत नाही. त्याने स्पष्ट केले की, त्याला शेअर बाजार, यूएस बॉण्ड्स, म्युच्युअल फंड, ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे किंवा रोख रक्कम वाचवणे आवडत नाही. रॉबर्ट कियोसाकी पुढे सांगतात की, वॉरन बफे यांनीही या काळात अब्जावधी डॉलर्स किमतीचे शेअर्स विकले. सध्या त्यांच्याकडे ३५ अब्ज डॉलर्स रोख रक्कम आहे. ते स्वस्त दरात मालमत्ता खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
(हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन असतो. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा.)






