
गेल्या आठवड्यात बाजारात मोठी हालचाल! एअरटेल, TCS तेजीत तर रिलायन्स आणि HDFC बँकची घसरण (फोटो सौजन्य - सोशल मिडिया)
Stock Market Update: सकारात्मक गुंतवणूकदारांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात गेल्या आठवड्यात टॉप १० पैकी पाच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ७२,२८४.७४ कोटींची वाढ झाली आहे. टाटा ग्रुपची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या मार्केट कॅपमध्ये सर्वात जास्त वाढ झाली. मागील आठवड्यातील टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, TCS, ICICI बँक, इन्फोसिस आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचा समावेश आहे. या दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, L&T आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC यांच्या मार्केट कॅपमध्ये प्रमाणात घट झाली आहे.
हेही वाचा : IndiGo Drop: शेअर बाजार लाल निशाणावर! इंडिगोला मोठा धक्का, निफ्टी-सेन्सेक्स घसरले
TCS च्या मार्केट कॅपमध्ये सर्वात जास्त वाढ झाली. TCS चे मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक ३५,९०९.५२ कोटी रुपयांनी वाढ होऊन ते ११,७१,८६२.३७ कोटी रुपये झाले. तसेच, इन्फोसिसचे बाजारमूल्य देखील २३,४०४.५५ कोटींनी वाढून सुमारे ६,७१,३६६.५३ कोटी रुपयांवर पोहोचले. बजाज फायनान्सचे बाजारमूल्य ६,७२०.२८ कोटींनी वाढून ६,५२,३९६.३९ कोटी रुपये झाले.
याउलट मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य घसरल्याचे दिसून आले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप ३५,११६.७६ कोटींनी घटून २०,८५,२१८.७१ कोटी रुपये झाले. भारती एअरटेलचे बाजारमूल्य देखील ३,७९१.९ कोटींनी वाढून १२,०१,८३२.७४ कोटी रुपये वाढले. ICIC बँकेचे बाजारमूल्य २,४५८.४९ कोटींनी वाढून ९,९५,१८४.४६ कोटी झाले.
हेही वाचा : Stock Market Today: सपाट पातळीवर होणार आठवड्याची सुरुवात, ‘या’ स्टॉक्सवर आहे गुंतवणूकदारांची नजर
एलआयसीचे बाजार भांडवल १५,५५९.४९ कोटींनी घसरून ५,५०,०२१.८० कोटी रुपये झाले, तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) बाजार भांडवल ७,५२२.९६ कोटींनी घसरून ८,९६,६६२.१९ कोटी रुपये झाले आणि एचडीएफसी बँकेचे देखील बाजार भांडवल ५,७२४.०३ कोटींनी घसरून १५,४३,०१९.६४ कोटी रुपये झाले.
पुढील आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण महागाई, म्युच्युअल फंड, एफआयआय आणि देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक डेटा बाजाराचे भाव निश्चित करतील. याव्यतिरिक्त, गुंतवणूकदार पुढील आठवड्यात भारत आणि रशियामधील संबंध मजबूत करण्यावर आणि अमेरिका-भारत संभाव्य व्यापार करारावर लक्ष ठेवतील.
टीपः गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते. जर तुम्हाला यामध्ये पैसे गुंतवायचे असतील तर प्रथम प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या नफ्यासाठी किंवा तोट्यासाठी Navarashtra.com जबाबदार राहणार नाही.