Stock Market Today: सपाट पातळीवर होणार आठवड्याची सुरुवात, 'या' स्टॉक्सवर आहे गुंतवणूकदारांची नजर
Todays Gold-Silver Price: आठवड्याच्या सुरुवातीला काय आहेत सोन्या – चांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर
शुक्रवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या धोरण घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आणि शुक्रवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाला, बेंचमार्क निफ्टी 50 26,100 च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ४४७.०५ अंकांनी म्हणजेच ०.५२% ने वाढून ८५,७१२.३७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १५२.७० अंकांनी म्हणजेच ०.५९% ने वाढून २६,१८६.४५ वर बंद झाला. गेल्या आठवड्यात निफ्टी ५० ०.०८% ने घसरला, ज्यामुळे त्याचा तीन आठवड्यांच्या वाढीला ब्रेक लागला. शुक्रवारी बँक निफ्टी निर्देशांक ४८८.५० अंकांनी किंवा ०.८२% ने वाढून ५९,७७७.२० वर बंद झाला. आठवड्यासाठी, निर्देशांक ०.८२% ने वाढला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार काही महत्त्वाच्या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. या शेअर्समध्ये सीएट, बायोकॉन, कोचीन शिपयार्ड, डायनामाइट टेक्नॉलॉजीज, भारतीय जीवन विमा महामंडळ, ओएनजीसी, लेन्सकार्ट, ओला इलेक्ट्रिक, रेलटेल, डाबर इंडिया यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी गुंतववणूकदारांसाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. सुमित बगडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज, नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फिन कंपनी आणि स्टायलम इंडस्ट्रीज या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) यांनी आज सहा इंट्राडे स्टॉकची शिफारस केली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना नफा मिळू शकतो. तज्ञांनी शिफारस केलेल्या सहा इंट्राडे स्टॉक्समध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड, एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड, एल अँड टी फायनान्स लिमिटेड, ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांचा समावेश आहे.






