
Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आजच्या व्यवहारात आयआरएफसी, टाटा ग्रुप स्टॉक्स, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, क्लीन मॅक्स एन्वायरो एनर्जी सोल्युशन्स, आयटीसी, एनसीसी, झायडस लाइफसायन्सेस, जेएसडब्ल्यू एनर्जी, पॉवर मेक प्रोजेक्ट्स, विक्रम सोलर, एलेनबॅरी इंडस्ट्रियल गॅसेस, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, भारतीय रेल्वे वित्त महामंडळ, एचईसी इन्फ्रा प्रोजेक्ट्स, एनसीसी या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन शेअर्सची शिफारस केली आहे. वैशाली पारेख यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये अपोलो मायक्रो सिस्टीम्स, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया आणि ब्लू डार्ट एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच स्टॉक्सची शिफारस केली आहे. संचालक सुमीत बागडिया यांनी केपीआय ग्रीन एनर्जी, क्रिसिल, वेदांत फॅशन्स, प्रुडेंट कॉर्पोरेट ॲडव्हायझरी सर्व्हिसेस आणि गो डिजिट जनरल इन्शुरन्स हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज आणि टेक्निकल विभागाचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी दोन स्टॉक्सची शिफारस केली आहे. तापारिया यांनी लॉरस लॅब्स आणि इंडस टॉवर्सचे फ्युचर्स शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.