
Share Market Today: शेअर बाजारात काय घडणार? गुंतवणूकदारांची चिंता वाढली, Jio Platforms IPO कडे सर्वांचे लक्ष!
गुंतवणूकदारांचे लक्ष आज जिओ प्लॅटफॉर्म्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी एंटरप्रायझेस, टीव्हीएस मोटर कंपनी, ह्युंदाई मोटर इंडिया, हीरो मोटोकॉर्प, मीशो, वेदांता, लार्सन अँड टुब्रो (L&T), मारुती सुझुकी इंडिया, इन्फोसिस, टाटा कॅपिटल, बजाज ऑटो, वारी एनर्जीज, वेदांता आयर्न अँड स्टील लिमिटेड (VISL), या शेअर्सवर असणार आहे. (फोटो सौजन्य: istock)
आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि डेरिव्हेटिव्हज व क्वांट रिसर्च प्रमुख जय ठक्कर यांनी बाजाराचा दृष्टिकोन स्पष्ट करताना नजीकच्या काळात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी काही स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ( सीडीएसएल ) फ्युचर्स, झायडस लाइफसायन्सेस फ्युचर्स आणि सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज फ्युचर्सचा समावेश आहे. तसेच बाजारातील इतर काही तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना बिर्ला केबल लि., युनियन बँक ऑफ इंडिया लि., क्वालिटी वॉल्स (इंडिया) लि., गंधार ऑइल रिफायनरी इंडिया लि., नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE), हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
रिलायन्सचा बहुप्रतिक्षित जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओ आज २८ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात पदार्पण करणार आहे. हा वर्षभरातील सर्वात मोठ्या पब्लिक इश्यूंपैकी एक असून सध्या याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचे शेअर्स बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजता एनएसई (NSE) आणि बीएसई (BSE) वर सूचीबद्ध होणार आहेत.