Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शुक्रवार ठरला ‘ब्लॅक फ्रायडे’, सेन्सेक्स, निफ्टी जोरदार घसरणीसह बंद; वाचा… शेअर बाजारात काय घडले?

आज (ता.२५) शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 663 अंकांनी घसरून 79,402 अंकांवर स्थिरावला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 218 अंकांनी घसरून, 24,180 अंकांवर बंद झाला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 25, 2024 | 06:15 PM
आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात काय घडले? कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले; वाचा... सविस्तर!

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात काय घडले? कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले; वाचा... सविस्तर!

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे ठरला आहे. ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग आणि वाहन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या व्यापार सत्रात मोठ्या घसरणीसह शेअर बाजार बंद झाला आहे. परिणामस्वरुप, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 80000 अंकांच्या खाली घसरला आहे. याशिवाय आज मिडकॅप समभाग आणि स्मॉल कॅप समभाग देखील घसरले आहेत.

काय घडले आज शेअर बाजारात?

आज (ता.२५) शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 663 अंकांनी घसरून 79,402 अंकांवर स्थिरावला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 218 अंकांनी घसरून, 24,180 अंकांवर बंद झाला आहे. आजच्या शेअर बाजारातील घसरणीमुळे आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे तब्बल 6 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

कोणत्या शेअरमध्ये तेजी, कोणते शेअर्स घसरले?

आज मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 10 शेअर्स वाढीसह बंद झाले आहे. तर 20 शेअर्स हे घसरणीसह बंद झाले आहेत. इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे. इंडसइंड बँकेचा शेअर हा 18.79 टक्क्यांनी घसरला आहे. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा ३.५६ टक्क्यांनी, एल अँड टी ३.०१ टक्क्यांनी, एनपीटीसी २.७३ टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स २.३३ टक्क्यांनी, मारुती २.१४ टक्क्यांनी घसरले आहेत.

तेजीत असलेल्या शेअर्समध्ये प्रामुख्याने आयटीसी 2.24 टक्क्यांच्या वाढीसह, ॲक्सिस बँक 1.85 टक्क्यांच्या वाढीसह, एचयूएल 0.96 टक्क्यांच्या वाढीसह, सन फार्मा 0.53 टक्क्यांच्या वाढीसह, आयसीआयसीआय बँक 0.53 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले आहेत.

हे देखील वाचा – दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार डबल फायदा!

गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटींचे नुकसान

आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 437.76 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे गेल्या सत्रात 444 लाख कोटी रुपयांजवळ होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे तब्बल 6 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

आज शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण बँकिंग, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन, तेल आणि वायू ऊर्जा, मीडिया आणि धातू क्षेत्राच्या शेअर्समध्ये झाली आहे. केवळ फार्मा आणि एफएनसीजी क्षेत्रातील समभाग वाढीसह बंद झाले आहे. दरम्यान, निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 1071 अंकांच्या घसरणीसह आणि स्मॉल कॅप निर्देशांक 401 अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Stock market update friday turns black friday sensex nifty close sharply lower

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 06:14 PM

Topics:  

  • share market
  • Stock market update

संबंधित बातम्या

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! ‘हे’ स्टॉक्स देऊ शकतात दमदार परतावा, वाचा संपूर्ण यादी
1

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! ‘हे’ स्टॉक्स देऊ शकतात दमदार परतावा, वाचा संपूर्ण यादी

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?
2

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! आज ‘या’ शेअर्समध्ये होऊ शकते मोठी हालचाल; तज्ज्ञांनी दिला हा सल्ला
3

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! आज ‘या’ शेअर्समध्ये होऊ शकते मोठी हालचाल; तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी आजही दबावात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला, ‘हे’ शेअर्स ठरणार गेमचेंजर
4

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी आजही दबावात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला, ‘हे’ शेअर्स ठरणार गेमचेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.