Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story : कधी भंगार विकायचे; आज 43000 कोटींचे मालक! महिला – मुलांच्या कल्याणासाठी दान करणार 75% संपत्ती

Success Story : भंगाराच्या व्यवसायातून तब्बल ४३,५०० कोटी रुपयांचे साम्राज्य उभे करणारे हे अब्जाधीश उद्योगपती. आपल्या व्यवसायाच्या बळावर जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर, आता त्यांनी आपल्या एकूण संपत्तीतील ७५% हिस्सा महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी दान करण्याची मोठी घोषणा केली आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 06, 2026 | 05:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कधी भंगार विकायचे
  • आज 43000 कोटींचे मालक!
  • महिला-मुलांच्या कल्याणासाठी 75% संपत्ती दान करणार
Success Story : तुम्ही श्रीमंत झालात तर मग तुम्ही काय कराल? लोकांना अनेकदा आपली संपत्ती दुप्पट तिप्पट करायची असते वाढवत राहायची असते. ती भावी पिढ्यांसाठी जतन करण्याची योजना आखतात. पण काही जण असे असतात जे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन विचार करतात. यामध्ये वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या संपत्तीतील 75% हिस्सा महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी देण्याची घोषणा केली आहे. हा विचार सोप्पा नाही आणि त्यांचा प्रवासही सोप्पा नाही.  ( Success Story ) 

Cheap Onion Price : सर्वसामान्यांना स्वस्त कांदा मिळणार! केंद्र सरकारने बाजारात आणला 4000 टन कांदा

एक भंगार विक्रेता म्हणून सुरुवात करून अब्जावधी डॉलर्सचे व्यावसायिक साम्राज्य उभे करणाऱ्या अग्रवाल यांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा दान करणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या संपत्तीपैकी ७५ टक्के संपत्ती सामाजिक कार्यासाठी आणि लोककल्याणासाठी दान करण्याचा शब्द दिला आहे. हे विधान या वर्षाच्या सुरुवातीला केले होते.

त्यांच्या विचाराने बदललं जीवन

अनिल अग्रवाल यांचा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की, व्यवसायातून कमावलेली संपत्ती ही केवळ कुटुंबाची मालमत्ता नसावी, तर त्यातील एक मोठा भाग समाजात गुंतवला गेला पाहिजे. म्हणूनच, त्यांनी आपली ७५% संपत्ती सामाजिक कार्यांसाठी दान करण्याचं वचन दिलं. यामुळे गरीब आणि गरजूंच्या जीवनात बदल घडून येईल.

कोणत्या उद्देशांसाठी वापरण्यात येणार निधी?

जानेवारी २०२६ मध्ये त्यांचा मुलगा, अग्निवेश अग्रवाल, यांच्या निधनानंतर अनिल अग्रवाल यांनी या पुन्हा त्यांनी दिलेल्या शब्दाचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, देशातील कोणतेही मूल उपाशी झोपू नये, आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही मुलाचे शिक्षण थांबू नये, महिलांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळावी आणि तरुणांना सन्मानजनक रोजगार मिळावा, हे त्यांच्या कुटुंबाचे स्वप्न आहे. पुढे अग्रवाल यांनी सूचित केले की, त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग आता ही सामाजिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी गुंतवला जाईल.

या घटकांना केंद्रस्थानी

अनिल अग्रवाल यांचे परोपकारी कार्य शिक्षण, पोषण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यावर केंद्रित आहे. त्यांचा प्रमुख प्रकल्प, ‘नंद घर’, हा देशभरातील अंगणवाडी केंद्रांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याचा एक उपक्रम आहे. या केंद्रांचा उद्देश मुलांना उत्तम पोषण आणि प्राथमिक शिक्षण देणे, तसेच महिलांना कौशल्य प्रशिक्षण आणि आत्मनिर्भरतेच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. भारताचे भविष्य मजबूत करण्यासाठी मुले आणि महिलांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे, असा त्यांचा विश्वास आहे.

अनिल अग्रवाल यांची संघर्ष

अनिल अग्रवाल यांची कहाणी म्हणजे संघर्ष, यश आणि आता समाजसेवेचं जिवंत उदाहरण आहे. बिहारमधील पाटणा येथून पुढे येऊन, त्यांनी भंगाराचा एक छोटा व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू वेदांतासारखा एक जागतिक व्यावसायिक समूह उभा केला. आज, ते आपल्या संपत्तीला वैयक्तिक यशापेक्षा एक सामाजिक जबाबदारी अधिक मानतात. आपल्या संपत्तीपैकी ७५% संपत्ती दान करण्याचा त्यांचा निर्णय भारतीय उद्योगविश्वाला एक शक्तिशाली संदेशही देतो: खरा वारसा केवळ कंपन्या आणि मालमत्तेपुरता मर्यादित नसतो, तर तो व्यक्तींनी आपल्या साधनांद्वारे समाजात घडवलेल्या बदलातून निर्माण होतो.

Gen Z शी पंगा म्हणजे थेट सिस्टीम हॅक! McDonald च्या इंटर्नने थेट बॉसला केलं एक्सपोज; नेमकं प्रकरण काय?

Web Title: Success story man built 43500 crore empire from scrap business donates 75

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • special story
  • success tips
  • Vedant Agarwal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.