Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जोडप्याची अनोखी प्रेम कहाणी! मिळून सुरु केला व्यवसाय; आता अमेरिकेलाही यांच्या हातच्या चवीचे वेड

फक्त २ हजार रुपयांत चेन्नईच्या नलिनी आणि आनंद या नवरा-बायकोने 'Sweet Karam Coffee' हा घरगुती स्नॅक्स ब्रँड सुरू केला आणि आज त्यांनी ३०+ देशांमध्ये ३ लाख ऑर्डर्स पार केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 12, 2025 | 08:04 PM
फोटो सौैजन्य - Social Media

फोटो सौैजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

चेन्नईच्या एका साध्याशा नवरा-बायकोच्या जोडीनं एक भन्नाट व्यवसाय सुरू केला, आणि आज ते कोट्यवधींचा टर्नओव्हर गाठत आहेत. या व्यवसायाचं नाव आहे ‘Sweet Karam Coffee’. नलिनी पार्थिबन आणि आनंद भारद्वाज या दोघांनी मिळून फक्त 2,000 रुपयांत हा व्यवसाय सुरू केला होता, घरच्या घरी पारंपरिक स्नॅक्स तयार करून.

8th Pay Commission: जानेवारी 2026 ची डेडलाईनदेखील चुकणार? या संकेतावरून जाणून घ्या आता वाटच पहावी लागणार

एकदा पावसाळ्यात बाहेर काही चविष्ट खायला मिळत नव्हतं, आणि त्याच वेळी त्यांनी विचार केला की घरगुती चव असलेले, आजी-आजोबांच्या स्टाईलचे खायचे पदार्थ लोकांना हवे असतात. इथूनच या आयडियाचा जन्म झाला. मग काय 2015 मध्ये दिवाळीच्या आधी त्यांनी काही खास दक्षिण भारतीय स्नॅक्स बनवले जसं की मद्रास मिक्सचर, अथिरासम, स्वीट मुरुकू असे जवळपास 10 प्रकार.

सुरुवातीला ऑर्डर घेणं, डिलिव्हरी करणं, सगळं ते दोघंच करत होते. लोकांना पर्चे वाटून प्रचार करायचा, फोनवर ऑर्डर घ्यायच्या, अगदी झिरो बजेट मार्केटिंग! आणि तरीही लोकांनी छान प्रतिसाद दिला. नंतर त्यांनी हळूहळू आपल्या कुटुंबातल्या महिलांना कामात सहभागी केलं, आणि मग स्थानिक महिलांनाही काम दिलं, घरबसल्या कमावता यावं म्हणून. यामुळे एक वेगळीच कम्युनिटी तयार झाली.

2020 च्या लॉकडाऊनमध्ये तर त्यांच्या बिझनेसला जबरदस्त उधाण आलं, घरगुती खाण्याला मागणी वाढली होती ना! पण नंतर सगळं नॉर्मल झाल्यावर विक्री कमी झाली. मग त्यांनी आपला ब्रँड ऑनलाइन आणायचं ठरवलं. 2022 मध्ये वेबसाइट सुरू केली आणि भारताबाहेरही ऑर्डर्स मिळवायला सुरुवात केली. आज त्यांच्या वेबसाइटवर 60 हून अधिक प्रोडक्ट्स आहेत. 99 रुपयांपासून ते 899 रुपयांपर्यंतचे विविध स्नॅक्स. ‘Sweet Karam Coffee’ चे प्रॉडक्ट्स आज अमेरिका, मिडल ईस्ट, ब्रिटन अशा 30 हून अधिक देशांमध्ये पोहोचत आहेत. आतापर्यंत त्यांनी 3 लाख ऑर्डर्स पार केल्या आहेत आणि 1 लाखांहून अधिक ग्राहक जोडले आहेत.

Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीला पुन्हा ‘आग’, कडाडला भाव; चांदीही महागली, जाणून घ्या कारण

या सगळ्या प्रवासात नलिनी आणि आनंद दोघांनीही नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ या व्यवसायात उतरले. अगदी साध्या स्वप्नातून सुरू झालेली ही गोष्ट आज एक मोठा ब्रँड बनली आहे आणि सगळ्यात खास म्हणजे, आपल्याच चवीनं जग जिंकलंय!

Web Title: Success story of sweet karam coffee in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 08:04 PM

Topics:  

  • Agriculture Success Story
  • Business Idea
  • coffee
  • Small Business

संबंधित बातम्या

५० हजारांचे केले ७ कोटी! “रिद्धी शर्मा: एक यशवी उद्योजिका”
1

५० हजारांचे केले ७ कोटी! “रिद्धी शर्मा: एक यशवी उद्योजिका”

कंबरेवर वाढलेले फॅट कमी करण्यासाठी कॉफीमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, महिनाभरात दिसून येईल शरीरात बदल
2

कंबरेवर वाढलेले फॅट कमी करण्यासाठी कॉफीमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, महिनाभरात दिसून येईल शरीरात बदल

‘या’ वेळेत पित असाल कॉफी तर व्हा सावध! मेंदूत तयार होतेय विष; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा
3

‘या’ वेळेत पित असाल कॉफी तर व्हा सावध! मेंदूत तयार होतेय विष; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

रात्री कॅफीन पिण्याचा पुरुषांचा आणि महिलांवर होतो वेगवेगळा परिणाम, Fruit Fries वरील अभ्यासात खुलासा
4

रात्री कॅफीन पिण्याचा पुरुषांचा आणि महिलांवर होतो वेगवेगळा परिणाम, Fruit Fries वरील अभ्यासात खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.