Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swiggy-HDFC Partnership: Swiggy आणि HDFC बँकेची भागीदारी! रोजच्या खर्चावर मिळणार भरघोस रिवॉर्ड्स; ‘या’ कार्डसबद्दल जाणूया सविस्तर

स्विगीने HDFC बँकेसोबत भागीदारी करत BLCK आणि Ornge क्रेडिट कार्ड खास करून फूड, क्विक कॉमर्स, जीवनशैली आणि प्रवासावर जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी लॉंच केले आहे. यामुळे ग्राहकांना भरघोस रिवॉर्ड्स मिळणार आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 09, 2026 | 02:22 PM
Swiggy-HDFC Partnership: Swiggy आणि HDFC बँकेची भागीदारी! रोजच्या खर्चावर मिळणार भरघोस रिवॉर्ड्स; 'या' कार्डसबद्दल जाणूया सविस्तर (फोटो-सोशल मीडिया)

Swiggy-HDFC Partnership: Swiggy आणि HDFC बँकेची भागीदारी! रोजच्या खर्चावर मिळणार भरघोस रिवॉर्ड्स; 'या' कार्डसबद्दल जाणूया सविस्तर (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • स्विगी आणि HDFC बँकेची खास भागीदारी
  • BLCK आणि Ornge क्रेडिट कार्ड केले लॉंच
  • फूड, क्विक कॉमर्स, आणि प्रवासावर जास्तीत जास्त फायदा मिळणार
 

Swiggy-HDFC Card Launch: स्विगी, जी भारतातील एक अग्रेसर डिलीव्हरी सेवा आहे, आणि HDFC बँक, जी भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे, यांनी आज त्यांच्या एकत्रित क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओच्या विस्ताराची घोषणा केली आहे, ज्यात स्विगी BLCK एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि स्वॅगी Ornge HDFC बँक क्रेडिट कार्ड असे २ प्रकार आहेत. कार्ड धारकांना स्विगी आणि त्यांच्या प्रमुख भागीदार प्लॅटफॉर्मवर श्रेणीतील सर्वोत्तम कॅशबॅक मिळेल, तसेच क्लिअरट्रिप आणि नायका वर खास त्वरित सवलतींचा आनंद घेता येईल. या विस्तारलेल्या पोर्टफोलिओमुळे वार्षिक ४८ हजारांपर्यंत बचत होऊ शकते, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या रोजच्या खर्चात अधिक फायदे मिळतील.

ग्राहकांच्या रोजच्या वारंवार होणाऱ्या खर्चावर हे कार्ड उत्तम आणि जास्तीत जास्त रीवार्ड्स मिळवून देणारे कार्ड होईल. स्विगी HDFC बँक क्रेडिट कार्डचे सध्याचे वापरकर्ते स्विगी आणि क्लिअरट्रिप, नायका, पेटीएम ट्रॅव्हल, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिंत्रा यांसारख्या ३० हून अधिक जास्त आघाडीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर भरघोस कॅशबॅकचे फायदे घेत राहतील. २०२३ मधील पहिल्या यशस्वी प्रस्तुतीचा पाया पुढे नेत, आता नवीन आणि जुन्या अशा दोन्ही कार्ड धारकांना अधिक प्रगत जीवनशैली फायद्यांचा लाभ घेता येईल.

यामध्ये आघाडीच्या भागीदार प्लॅटफॉर्मवर तात्काळ सवलत आणि अतिरिक्त कॅशबॅकचा समावेश आहे. जसे की, क्लिअरट्रिप या प्लॅटफॉर्मवर हॉटेल बुकिंगसाठी फ्लॅट १९ % सूट + ५ % कॅशबॅक, विमान तिकिटांसाठी सरळ ६ % सूट + ५ % कॅशबॅक, आणि सर्व नायका ॲप्सवर सरळ ५ % सूट + ५ % कॅशबॅक असं मिळेल. तसेच, स्विगी BLCK HDFC बँक क्रेडिट कार्ड हे स्विगी वर १० % कॅशबॅक, मनोरंजन, प्रवास आणि e-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ५ % पर्यंत कॅशबॅक, इतर व्यवहारांवर १ % कॅशबॅक आणि ३ महिन्यांची मोफत स्विगी वन BLCK मेंबरशिप मिळते.

तर स्विगी Ornge HDFC बँक क्रेडिट कार्ड हे प्रवासापासून ते स्थानिक कॅबपर्यंतच्या विविध आवश्यक ऑनलाइन कॅटेगरीवर ५ % कॅशबॅक देते. तसेच इतर व्यवहारांवर १ % कॅशबॅक आणि १२ महिन्यांची स्विगी वन मेंबरशिप मिळते. जर ग्राहकांना स्विगी BLCK आणि Ornge क्रेडिट कार्डे हवी असतील तर HDFC बँक क्रेडिट कार्डे टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देतील. इच्छुक ग्राहक स्विगी ॲपवरून किंवा HDFC बँकेच्या डिजीटल चॅनेलवरून सहजपणे अर्ज करू शकतात. ग्राहकाच्या पात्रतेनुसार योग्य ते कार्ड दिले जाईल.

स्विगीचे मुख्य विकास अधिकारी आणि सह-संस्थापक, फनी किशन अडेपल्ली म्हणाले, “स्विगी HDFC बँक क्रेडिट कार्ड २ वर्षांपूर्वी प्रस्तुत करण्यात आले होते, जेणेकरून रोजचा खर्च अधिक फायदेशीर आणि सोयीस्कर व्हावा. ग्राहक आता जीवनशैलीच्या विविध श्रेणींमध्ये अधिक खर्च करत असल्याने, त्यांना अशा पेमेंट पर्यायांची गरज आहे. व्यवहार अधिक सुलभ आणि सहज बनवण्यासाठी हे कार्ड योग्य आहेत. तसेच, वापरकर्त्यांना स्विगी इकोसिस्टम, शॉपिंग, प्रवास आणि त्यापलीकडेही मोठे रिवार्ड्स मिळवण्यास मदत करेल.”

तसेच, HDFC बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स प्रॉडक्ट अँड पोर्टफोलियोचे हेड, विद्या प्रदीप म्हणाल्या, “स्विगी सोबतची ही विस्तारित भागीदारी आमचा वेगळ्या आणि श्रेणी-आधारित प्रस्तावांवर भर असतो हे दर्शवते. दोन वेगळे प्रकार सादर करून, आम्ही ग्राहकांना अधिक सुविधा, सखोल रिवार्ड्स आणि वारंवार होणाऱ्या तसेच प्रीमियम खर्चाच्या श्रेणींमध्ये मोलाचा फायदा मिळवून देत आहोत.”

टीप: नियम आणि अटी लागू, कार्ड देण्याचा निर्णय HDFC बँकेच्या अंतर्गत क्रेडिट आणि पात्रतेच्या नियमांवर आधारित असेल.

Web Title: Swiggy launches blck and ornge credit cards in partnership with hdfc bank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Credit Card Rules
  • HDFC Bank
  • Swiggy

संबंधित बातम्या

Food Safety Feature : आता लगेच होणार कारवाई! खराब जेवणाची तक्रार करणं झालं सोपं; Swiggy कडून 24×7 Helpline नंबर लाँच
1

Food Safety Feature : आता लगेच होणार कारवाई! खराब जेवणाची तक्रार करणं झालं सोपं; Swiggy कडून 24×7 Helpline नंबर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.