Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता एकाच वेळी ५ वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून मागवा आवडतं जेवण; Swiggy ने लाँच केले ‘Multi Restaurant Ordering’ फीचर!

Swiggy Multi Restaurant Ordering Feature : स्विगीने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत नाविन्यपूर्ण आणि सोयीचे 'मल्टी-रेस्टॉरंट ऑर्डरिंग' फीचर लाँच केले आहे. या फीचरमुळे आता युझर्सना ५ वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समधून त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ निवडून एकाच कार्टमध्ये जोडता येणार असून एकाच पेमेंटद्वारे ऑर्डर पूर्ण करता येणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 23, 2026 | 12:24 PM
Swiggy ने लाँच केले 'Multi Restaurant Ordering' फीचर! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Swiggy ने लाँच केले 'Multi Restaurant Ordering' फीचर! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • जेवणाच्या मेनूवरून घरात होणारे वाद मिटणार!
  • स्विगीने सुरू केली जबरदस्त सुविधा
  • वेगवेगळ्या हॉटेलमधून करा एकाच वेळी ऑर्डर
Swiggy Multi Restaurant Ordering Feature : भारतातील अग्रगण्य ऑन-डिमांड सोयीस्कर प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगीने त्यांच्या ॲपवर मल्टी रेस्टॉरेन्ट ऑर्डरिंग फिचर सुरू करण्याची घोषणा केली. अन्नपदार्थ ही एक वैयक्तिक पसंती आहे आणि एका विशिष्ट कुटुंबात किंवा गटात आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात. ( Swiggy Multi Restaurant Ordering Feature ) 

CNG Price Hike : पेट्रोलनंतर आता CNG चा नंबर… दिवाळीच्या तोंडावर किमती भडकल्या! जाणून घ्या नवे दर

मल्टी रेस्टॉरंट ऑर्डरिंग नेमकं काय?

युझर्सना कोणत्याही तडजोडीशिवाय त्यांना जे खायला आवडते ते ऑर्डर करता यावे हे सुनिश्चित करण्यासाठी मल्टी रेस्टॉरंट ऑर्डरिंग डिझाइन केले आहे. हे फीचर युझर्सना 5 रेस्टॉरंटमधून वेगवेगळे पदार्थ, डिशेस आणि आवडीचे अन्नपदार्थ एकत्र करण्याची आणि एकाच वेळी ऑर्डर देण्याची सुविधा देते. अधिक सोप्या अनुभवाव्यतिरिक्त, मल्टी रेस्टॉरंट ऑर्डरिंग फीचर युझर्ससाठी अधिक बचतीचे आश्वासन देखील देते कारण ते अनेक प्लॅटफॉर्म शुल्कांसह स्वतंत्र कार्ट्स आणि चेकआउट्सची गरज दूर करते.

वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून एकत्र ऑर्डर

कुटुंबातील स्नेहमिलन असो, दिवाळीच्या पार्ट्या असो किंवा लांब विकेंड असो, टेबलवर बसलेल्या प्रत्येकाची अन्नासाठी वेगवेगळी पसंती आणि आवडीनिवडी असतात. मल्टी रेस्टॉरंट ऑर्डरिंग फीचरमुळे, ग्राहक त्यांच्या आवडत्या स्टार्टर्स, मेन कोर्स आणि डेझर्ट्ससाठी वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून एकत्र ऑर्डर देऊ शकतात.

हे फीचर तुमच्या घरच्या आरामात फूड कोर्टचा अनुभव देते, जिथे ग्राहक अनेक कार्ट्स तयार करू शकतात आणि ठेवू शकतात, त्यांची शेजारी-शेजारी तुलना करू शकतात, आणि रिपीट चेकआउट्स, OTPs किंवा पेमेंट फ्लोशिवाय एकाच पेमेंटद्वारे 5 रेस्टॉरंटमधून ऑर्डर करू शकतात. प्रत्येक रेस्टॉरंटची ऑर्डर स्वतंत्रपणे तयार केली जाते आणि पोहोचवली जाते आणि एका सामायिक ट्रॅकिंग स्क्रीनवर तिच्या स्वतःच्या टॅबमध्ये दिसते.

खऱ्या अर्थाने फूड कोर्टची संकल्पना

या प्रस्तुतीबाबत बोलताना, स्विगी फूड मार्केटप्लेसचे चीफ बिझनेस ऑफिसर सिद्धार्थ भाकू म्हणाले, “अन्न हे कोणत्याही सणाचे मुख्य केंद्र असते, पण मेनूवर सर्वांचे एकमत होणे हा नेहमीच सर्वात कठीण भाग असतो. आम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या घरी फूड कोर्टची संकल्पना घेऊन येत आहोत. मल्टी-रेस्टॉरंट ऑर्डरिंग हा जेवणाच्या मोठ्या समस्येवर आमचा उपाय आहे. आम्ही युझर्सना त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमधून किंवा विविध प्रकारच्या पदार्थांमधून एकत्र निवड करण्याचे स्वातंत्र्य देत आहोत, मग ते बिर्याणीसोबत पिझ्झा जोडणे असो किंवा लोकल स्ट्रीट फूडसोबत सुशी एकत्र करणे असो, हे सर्व एकाच चेकआउट पर्यायाद्वारे शक्य आहे.

यामध्ये अधिक पर्याय देणे, अधिक सोय उपलब्ध करून देणे, कोणतीही तडजोड न होणे आणि टेबलवरील प्रत्येकाने त्यांना जे मनापासून आवडते आणि हवे असते तेच खाण्याचा आनंद मिळणे यांचा समावेष आहे.”

फीचर 720 हून अधिक शहरांमध्ये लाईव्ह

प्रियजनांसोबत एकत्रित जेवणाचा आनंद घेणे म्हणजे बऱ्याचदा वेगवेगळ्या स्वादांचा समतोल साधणे आणि प्रत्येकाची सहमती मिळेल असा एखादा पर्याय शोधण्यासाठी वैयक्तिक आवडी सोडणे होय. स्विगीने केलेल्या ग्राहक संशोधनातून असे दिसून आले आहे की 55% युझर्स एकाच सत्रात दोन कार्ट तयार करतात आणि 1 पैकी 5 युझर्स त्यांच्या पहिल्या ऑर्डरनंतर 30 मिनिटांच्या आत दुसरी ऑर्डर देतात. यामुळे कार्ट सोडून दिल्या जाऊ शकतात किंवा ग्राहक वेगवेगळ्या वेळी अनेक ऑर्डर देऊ शकतात.

मल्टी रेस्टॉरंट ऑर्डरिंग फीचर या आव्हानांना दूर करते, एकाधिक क्रेव्हिंग्जसाठी एक परिपूर्ण उपाय म्हणून काम करते. हे फीचर 720 हून अधिक शहरांमध्ये लाईव्ह असल्याने, स्विगी अशा उपायांचे नेतृत्व करणे सुरू ठेवत आहे जे प्रत्येक जेवणाच्या वेळेला वैयक्तिक स्वादांच्या सहज उत्सवात बदलतात आणि ग्राहकांना अधिक सोय देतात.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीचे दर घसरले! नागपूर, पुणे, नाशिकमध्ये काय आहे 24 कॅरेटचा भाव? जाणून घ्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्विगीच्या 'मल्टी-रेस्टॉरंट ऑर्डरिंग'फीचरमध्ये नक्की काय सुविधा मिळते?

    Ans: फीचरअंतर्गत ग्राहक एकाच वेळी ५ वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समधून निवडून एकाच चेकआउट आणि पेमेंटद्वारे ऑर्डर करू शकतात.

  • Que: या नवीन फीचरमुळे ग्राहकांची कशी बचत आणि सोय होणार आहे?

    Ans: ग्राहकांना प्रत्येक रेस्टॉरंटसाठी स्वतंत्रपणे डिलिव्हरी/प्लॅटफॉर्म फी द्यावी लागणार नाही, रिपीट चेकआउट किंवा वेगळे ओटीपी टाकावे लागणार नाहीत आणि सर्व ऑर्डर्स एकाच ट्रॅकिंग स्क्रीनवर टॅब स्वरूपात पाहता येतील.

  • Que: नवीन फीचर किती शहरांमध्ये आणि कधीपासून उपलब्ध आहे?

    Ans: हे फीचर देशभरातील ७२० हून अधिक शहरांमध्ये स्विगी ॲपवर लाईव्ह करण्यात आले आहे.

Web Title: Swiggy launches multi restaurant ordering feature order from 5 restaurants ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Restaurants
  • Swiggy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.