Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swiggy Platform Fee: खवय्यांना झटका! Swiggy ने तिसऱ्यांदा वाढवली प्लॅटफॉर्म फी; आधी 14, नंतर 12 अन् आता….

स्विगीने 3 आठवड्यांत तिसऱ्यांदा आपली प्लॅटफॉर्म फी वाढवून 15 रुपये केली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. जाणून घ्या कंपनीने हा निर्णय का घेतला....

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 03, 2025 | 09:54 PM
Swiggy Platform Fee: खवय्यांना झटका! Swiggy ने तिसऱ्यांदा वाढवली प्लॅटफॉर्म फी; आधी 14, नंतर 12 अन् आता….
Follow Us
Close
Follow Us:

Swiggy Platform Fee: फूड डिलिव्हरी ॲप स्विगीवरून (Swiggy) जेवण ऑर्डर करणे आता महाग झाले आहे. कंपनीने सलग तीन आठवड्यांमध्ये तिसऱ्यांदा आपली प्लॅटफॉर्म फी वाढवली आहे. आता प्रत्येक ऑर्डरवर ग्राहकांना 15 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी आणि कंपनीचा तोटा कमी करण्यासाठी स्विगीने हे पाऊल उचलले आहे.

यापूर्वी 15 ऑगस्टला स्विगीने ही फी 14 रुपयांपर्यंत वाढवली होती, परंतु नंतर ती 12 रुपये केली. आता पुन्हा एकदा ऑर्डरची संख्या वाढल्यामुळे कंपनीने ही फी 15 रुपये केली आहे. ही फी डिलिव्हरी चार्ज, जीएसटी आणि रेस्टॉरंट फी व्यतिरिक्त वेगळी घेतली जाते. विशेष म्हणजे, ही फी प्रत्येक शहरात आणि प्रत्येक दिवशी सारखी नसते, तर मागणीनुसार ती बदलत राहते.

झोमॅटोनेही वाढवली प्लॅटफॉर्म फी

झोमॅटोनेही सणासुदीच्या काळात आपली प्लॅटफॉर्म फी वाढवून 12 रुपये केली आहे. दोन्ही कंपन्या सुरुवातीला फक्त जास्त मागणी असलेल्या दिवसांमध्ये याची चाचणी करतात आणि जर ग्राहकांवर कोणताही मोठा परिणाम झाला नाही, तर ही फी कायम करतात.

#JustIn | #Swiggy hikes platform fees to ₹15, third hike in three weeks pic.twitter.com/s3PGdESXA3

— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) September 3, 2025


हे देखील वाचा: Zomato Share Price: उत्सवात नफा वाढवण्यासाठी झोमॅटोने उचलले ‘हे’ पाऊल, ग्राहकांना महागात पडणार

स्विगीला रोज 3 कोटींचा अतिरिक्त फायदा

स्विगीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दररोज सुमारे 20 लाखांहून अधिक ऑर्डर येतात. जर प्रत्येक ऑर्डरवर 15 रुपये फी घेतली, तर कंपनीला दररोज सुमारे 3 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल. तिमाहीमध्ये हे सुमारे 54 कोटी आणि वार्षिक 216 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न असेल.

तोट्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती नाजूक

सध्या स्विगीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY26) कंपनीचा तोटा सुमारे 96 टक्क्यांनी वाढून 1,197 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर उत्पन्न 54 टक्क्यांनी वाढून 4,961 कोटी रुपये झाले आहे. दुसरीकडे, झोमॅटोचा नफा 25 कोटी रुपयांवर घसरला असला, तरी त्याचे उत्पन्न 70 टक्क्यांनी वाढून 7,167 कोटी रुपये झाले आहे.

Web Title: Swiggy platform fee hike third time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 09:54 PM

Topics:  

  • Business News
  • Swiggy

संबंधित बातम्या

CEAT ऑफ-हायवेचा मोठा टप्पा, कॅम्सो ब्रँड कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसाय आता ‘या’ प्रवासात सहभागी
1

CEAT ऑफ-हायवेचा मोठा टप्पा, कॅम्सो ब्रँड कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसाय आता ‘या’ प्रवासात सहभागी

GST Council: जीएसटीमध्ये सूट देण्याचा निर्णय कोण घेतं, केंद्र सरकार की राज्य? जाणून घ्या जीएसटी कौन्सिलची संपूर्ण निर्णय प्रणाली
2

GST Council: जीएसटीमध्ये सूट देण्याचा निर्णय कोण घेतं, केंद्र सरकार की राज्य? जाणून घ्या जीएसटी कौन्सिलची संपूर्ण निर्णय प्रणाली

पंडित नेहरूंच्या दिल्लीतील पहिल्या बंगल्याची विक्री, 1,100 कोटी मध्ये झाला सौदा; कोण आहे नवा मालक?
3

पंडित नेहरूंच्या दिल्लीतील पहिल्या बंगल्याची विक्री, 1,100 कोटी मध्ये झाला सौदा; कोण आहे नवा मालक?

GST Council 56th Meeting: टूथपेस्ट, शँपू, कार, सिमेंट? काय होणार स्वस्त, GST कौन्सिलचा निर्णय लवकरच
4

GST Council 56th Meeting: टूथपेस्ट, शँपू, कार, सिमेंट? काय होणार स्वस्त, GST कौन्सिलचा निर्णय लवकरच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.