Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PFRDA ने आणला ‘पेन्शन सहायक’ डिजिटल प्लॅटफॉर्म; जाणून घ्या कसं काम करतो?

निवृत्तीवेतनधारकांसाठी NPS नियामक PFRDAने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. पेन्शनधारकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी PFRDA ने 'पेन्शन सहायक' नावाचा एक अत्याधुनिक AI Chatbot लाँच केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 23, 2026 | 03:20 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

PFRDA Pension Sahayak: निवृत्तीवेतनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS नियामक पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने एक अत्यंक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेन्शनधारकांसाठी सोयीचं व्हावं यासाठी ‘PFRDA पेन्शन सहाय्यक’ नावाचे एक AI-आधारित तक्रार निवारण व्यासपीठ सुरू केलं आहे. हे पूर्वीच्या केंद्रीय तक्रार व्यवस्थापन प्रणालीची CGMS च्या जागी येत आहे. पेन्शनधारकांना तक्रारी नोंदवणे, त्यांच्या स्थितीचा मागोवा घेणे आणि वेळेवर निराकरण मिळवणे सोपे करणे, हा याचा उद्देश आहे. नेमकं कसं काम करतं हे व्यासपीठ समजून घेऊयात.

रेल्वे वर्तुळात खळबळ! IRCTC चे CMD संजय कुमार जैन यांचा राजीनामा; सरकारकडून मंजूर, काय आहे कारण?

व्यासपीठ पेन्शन-संबंधित विविध सेवा वैशिष्ट्ये एकाच डिजिटल प्रणालीमध्ये एकत्र आणते. हे पोर्टल वेब, मोबाईल आणि व्हॉट्सॲप-आधारित सेवांना एकीकृत करेल. ही नवीन तक्रार निवारण प्रणाली २२ भाषांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे वापरकर्त्यांना यापैकी कोणत्याही भाषेत बोलून व्हॉइस कमांडद्वारे तक्रारी नोंदवता येतील.

‘पेन्शन सहाय्यक’ची ५ प्रमुख वैशिष्ट्ये

आता तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला तुमचा कायमस्वरूपी सेवानिवृत्ती खाते क्रमांक (PRAN) किंवा पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ओटीपी वापरून त्वरित लॉगिन करू शकता.

1 जर एकाच मोबाईल नंबरशी अनेक PRAN जोडलेले असतील, तर लॉगिन केल्यावर सर्व खाती एकाच स्क्रीनवर दिसतील. अटल पेन्शन योजनेचे जे सदस्य आपला PRAN विसरले आहेत, ते देखील याच्या माध्यमातून आपला नंबर सहजपणे शोधू शकतात.

2 ‘भाषिनी’ AI इंटिग्रेशनच्या मदतीने, हे पोर्टल २२ भारतीय भाषांना सपोर्ट करते. तुम्ही तुमच्या स्थानिक भाषेत बोलून तुमची तक्रार नोंदवू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच भाषेत प्रतिसाद मिळेल आणि तो ऑडिओ स्वरूपातही मिळू शकेल.

3 जर तुमच्या तक्रारीचे विहित वेळेत निराकरण झाले नाही, तर सिस्टम ती आपोआप वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवेल.

4 जर तुम्ही सुरुवातीच्या निराकरणाने समाधानी नसाल, तर तुम्ही फक्त एका क्लिकने हे प्रकरण लोकपाल किंवा NPS ट्रस्टकडे हस्तांतरित करू शकता. तुम्ही निराकरणाच्या गुणवत्तेला रेटिंग देखील देऊ शकता.

जुन्या प्रणालीपेक्षा किती वेगळं?

जुनी प्रणाली बरीच पारंपरिक होती, ज्यासाठी वापरकर्त्यांना पेन्शन प्रणालीचे तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक होते. नवीन “पेन्शन सहाय्यक” ही एक पूर्णपणे वापरकर्ता-अनुकूल, एआय-शक्तीवर चालणारी आणि आधुनिक प्रणाली आहे, जी आवाजाद्वारे कार्य करते. येथे, तुम्हाला फक्त तुमची समस्या समजावून सांगायची आहे आणि बाकीचे काम प्रणाली सांभाळेल.

अरे देवा, हे काय? SpaceX च्या शेअर्सना कोणाची लागली नजर? 3 दिवसांत तब्बल 600 अब्ज डॉलर्सचा दणका

Web Title: Pfrda launches pension sahayak ai chatbot for nps complaints see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • ai
  • Artificial intelligence
  • Atal Bihari Vajpayee
  • Business News
  • EPFO Pension
  • Marathi News
  • old pension scheme
  • Pension

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.