Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टॅफेची 2.14 लाखांहून अधिक ट्रॅक्टर्स विक्री; FY26 मध्ये स्थानिक बाजारपेक्षाही जलद वाढ

टॅफ़ेने 2,14,000 पेक्षा अधिक ट्रॅक्टर्सची विक्री केली असून आर्थिक वर्ष 26(FY26) मध्ये हा विकास आर्थिक वर्ष 26(FY26) चा स्थानिक विकासापेक्षा जलदगतीने करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 03, 2026 | 06:31 PM
टॅफेची 2.14 लाखांहून अधिक ट्रॅक्टर्स विक्री; FY26 मध्ये स्थानिक बाजारपेक्षाही जलद वाढ

टॅफेची 2.14 लाखांहून अधिक ट्रॅक्टर्स विक्री; FY26 मध्ये स्थानिक बाजारपेक्षाही जलद वाढ

Follow Us
Follow Us:

मुंबई : ट्रॅक्टर्स ॲन्ड फ़ार्म इक्विप्मेंट (TAFE),जगातील अग्रगण्य ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असून भारतातील दुसरी सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. कंपनीद्वारे आपला आर्थिक वर्ष 26(FY26) करीताचा प्रगती अहवाल जाहिर करण्यात आला, ज्यानुसार कंपनीचा इतिहासातील सर्वात अधिक विक्रीचा टप्पा कंपनीने गाठला असून साधारण 2,14,951 युनिट्सची विक्रमी विक्री झाली आहे.

टॅफेने आपल्या आर्थिक वर्षाचे समापन भक्कम पद्धतीने केले आहे. मार्च2026 मध्ये विकासाचा दर हा 37.4% एवढा होता हा विकास या महिन्यात झालेल्या 29% स्थानिक विकासा पेक्षा देखील जास्त होता. औद्योगिक विकासाचा तुलनेत जलदगतीने विकास होणे टॅफ़ेचा मजबूत उत्पादन श्रेणी, शेतकऱ्यांशी असलेले भक्कम नाते आणि शेतीय विभागांमध्ये सातत्याने होणारी मागणी दर्शविते.

FedEx चा ‘Chennai Super Kings’सोबत भागीदारीचा दुसरा टप्पा सुरू; तीन खास डिजिटल फिल्म्स लाँच

कंपनीद्वारे स्थानिक विक्री ही आत्ता पर्यंतची सर्वाधिक विक्री होती, कंपनीचे दोन्ही ब्रॅन्ड्स मॅसे फ़र्ग्युसन आणि आयशर ट्रॅक्टर्स यांनी विक्रमी विक्री ची नोंद केली. टॅफ़ेची निर्यात ही देखील चांगली झाली, आंतरराष्ट्रीय बाजार पेठेमध्ये 12,584 ट्रॅक्टर ची विक्री झाली ज्यामुळे कंपनीचे जागतिक अस्तित्व आणि वैविध्यपूर्ण विकासाचे धोरण अधोरेखीत होते. स्थानिक बाजारपेठेची आणि निर्यातीची मागणी पूर्ण करण्याकरीता, वर्षभरात टॅफ़ेचे उत्पादन प्लान्ट संपूर्णपणे कार्यरत होते. कंपनीद्वारे क्षमता वाढविण्याकरीता मूल्यांकन केले जात असून, भविष्यातील वाढती मागणी आणि जागतिक ट्रॅक्टर उद्योगामध्ये आपले नेतृत्व राखण्याकरीता योग्य ती पाऊले कंपनीद्वारे उचलली जातील.

या प्रगतीवरती बोलताना, टॅफेचे , वाईस चेअरमन, डॉ. लक्ष्मी वेणू यांनी सांगितले की, “ हे वर्ष, ट्रॅक्टर उद्योग तसेच देशातील शतकऱ्यांकरीता अतीशय सकारात्म होते. त्याच बरोबर हवामान चांगले असणे, सरकार द्वारे जीएसटी कमी केल्याने देखील शेतीय क्षेत्राला दिलासा मिळालेला आहे.

सध्या एक चांगला ट्रेन्ड बघायला मिळतो आहे. ज्यामुळे तंत्रज्ञान हे ग्रामीण भागात झपाट्याने रूजताना दिसते आहे. यावर्षी एक चांगला बदल झालेला आढळून आला ज्यानुसार लहान शेतकऱ्यांना तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने पहिल्यांदा यंत्रणेचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचा संख्ये मध्ये वाढ दिसून आली. यामुळे शेतीय उत्पादकता तर वाढलीच पण देशभरातील शेतकऱ्यांचा मिळकतीला सुद्धा बळ मिळाले. टॅफ़ेमध्ये आमचे ध्येय हे आमचा या क्षेत्रातल्या ग्राहकांना आधुनिक पर्याय लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आहे आणि या ध्येयामुळेच आम्हाला यावर्षी बाजारात उत्तम कामगिरी करता आली आहे. “

सध्याचा भू-राजकारण आणि युद्धा मुळे पुरवठा साखळीवर आलेल्या अस्थिरतेमुळे जागतिक अनिश्चितता आणि महागईचा ताण वाढतो आहे आणि या सगळ्याचा परिणाम हा इन्पुट कॉस्टवर होत असताना, भारतीय शेती क्षेत्र हे मुलभूत पद्धतीने लवचिक राहिले आहे. पुढचा विचार केला तर, यांत्रिकीकरणाचा सतत स्वीकार, बदलाची मागणी, ट्रॅक्टर्स आणि साधनांचा विस्तार आणि निर्यात बाजारपेठांमधून हळूवार होणाऱ्या सुधारांचा आधारावर टॅफ़े मध्यम-मुदतीचा दृष्टीकोनाबद्दल आशावादी आहे. आपल्या विकासाची गती कायम ठेवण्याचा विश्वास टॅफ़ेला आहे.

काय आहे टॅफे?

TAFE – ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड, ही १९६० मध्ये चेन्नई, भारत येथे स्थापन झालेली एक प्रमुख भारतीय ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादकांपैकी एक आणि उत्पादनाच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी म्हणून, TAFE वार्षिक 200,000 पेक्षा जास्त ट्रॅक्टर्सची विक्री करते. उच्च गुणवत्ता आणि कमी परिचालन खर्च यासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या उत्पादनांच्या श्रेणीद्वारे TAFE ने जगभरातील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. १,६०० हून अधिक डीलर्सचे मजबूत वितरण जाळे TAFE च्या चार आयकॉनिक ट्रॅक्टर ब्रँड्सना – मॅसी फर्ग्युसन इंडिया, टॅफे ट्रॅक्टर्स, आयशर ट्रॅक्टर्स आणि आयएमटी (IMT) – प्रभावीपणे पाठबळ देते. आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका आणि रशिया अशा ८० हून अधिक देशांमध्ये TAFE आपले ट्रॅक्टर्स निर्यात करते, ज्यामुळे तेथील शेती क्षेत्राला मोठी मदत होत आहे.

भारतीय रिटस् मार्केटची दमदार घोडदौड; परतावा आणि विकासाच्या बाबतीत आशियाई देशांना टाकले मागे, अनॅरॉक अहवाल

Web Title: Tafe tractor sales fy26 214 lakh units growth faster than domestic market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • Business News
  • india

संबंधित बातम्या

Dexogrowचा नवा फ्लेवर धमाका! मुलांच्या पोषणासाठी नवा पर्याय; व्हॅनिला अन् चॉकलेट सॅशे भारतात लाँच
1

Dexogrowचा नवा फ्लेवर धमाका! मुलांच्या पोषणासाठी नवा पर्याय; व्हॅनिला अन् चॉकलेट सॅशे भारतात लाँच

गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड! CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय; 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य
2

गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड! CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय; 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू
3

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू

‘देश का नमक’ मागचा चेहरा कोण? टाटांच्या १४ कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या ‘या’ व्यक्तीची कहाणी थक्क करणारी
4

‘देश का नमक’ मागचा चेहरा कोण? टाटांच्या १४ कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या ‘या’ व्यक्तीची कहाणी थक्क करणारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.