Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GSK Blenrep Launch: मल्टिपल मायलोमाच्या उपचारांसाठी नवी आशा; जीएसकेचे ब्लेनरेप भारतात लाँच; CDSCO ची मंजुरी

GSK India Launch Blenrep Multiple Myeloma Treatment: जीएसके इंडियाने मल्टिपल मायलोमाच्या उपचारांसाठी ब्लेनरेप (बेलांटामॅब मॅफोडोटिन) हे औषध भारतात लाँच केले असून, याला सीडीएससीओची मंजुरी मिळाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 19, 2026 | 08:48 PM
GSK India Launch Blenrep Multiple Myeloma Treatment

GSK India Launch Blenrep Multiple Myeloma Treatment

Follow Us
Follow Us:
  • रक्ताच्या कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवे बळ
  • मल्टिपल मायलोमासाठी भारतात ब्लेनरेप औषध लाँच
  • CDSCO मंजुरीनंतर ब्लेनरेप भारतात दाखल
मुंबई : ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (जीएसके इंडिया) आज भारतात ब्लेनरेप (बेलांटामॅब मॅफोडोटिन)च्या लाँचची घोषणा केली. यापूर्वी किमान एक उपचार पद्धती घेतलेल्या आणि पुन्हा उद्भवलेल्या (रिलॅप्स्ड) किंवा उपचारांना दाद न देणाऱ्या (रिफ्रॅक्टरी) मल्टिपल मायलोमाच्या प्रौढ रुग्णांसाठी कॉम्बिनेशन थेरपी म्हणून हे औषध सादर करण्यात आले आहे.

मल्टिपल मायलोमासाठी बी-सेल मॅच्युरेशन अँटीजेनला (बीसीएमए) लक्ष्य करणारे जगातील पहिले मंजूर अँटीबॉडी-ड्रग कॉन्ज्युगेट (एडीसी) म्हणून ब्लेनरेप भारतातील रुग्णांसाठी नवीन उपचार पद्धती आणते आणि महत्त्वाच्या ड्रीम (DREAMM) क्लिनिकल प्रोग्रॅममधील प्रबळ पुराव्यांवर आधारित नाविन्यपूर्ण थेरपीची उपलब्धता विस्तारते. (GSK India Launch Blenrep Multiple Myeloma Treatment)

Health Tips: दोन आठवड्यांपासून खोकला थांबत नाहीये? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा धोका

मल्टिपल मायलोमा हे गंभीर जागतिक आरोग्य आव्हान आहे. ग्लोबोकॅनच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये जगभरात या आजाराच्या १,९६,००० हून अधिक नवीन केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. भारतात सर्व नवीन कर्करोगाच्या केसेसमध्ये मल्टिपल मायलोमाचे प्रमाण १.१ टक्‍के आहे. पण वाढते आयुर्मान, सुधारित आरोग्यसेवा आणि वेगाने होणारे शहरीकरण यांमुळे भविष्यात मल्टिपल मायलोमाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

भारतातील मल्टिपल मायलोमा उपचारांच्या विशिष्ट परिस्थितीमुळे हे आव्हान अधिकच गुंतागुंतीचे बनते. पाश्चात्य देशांतील लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील रुग्णांमध्ये या आजाराचे निदान एक दशक लवकर होते आणि हा आजार वारंवार पुन्हा उद्भवणारा असल्यामुळे आजारावर दीर्घकाळ नियंत्रण ठेवू शकणाऱ्या उपचारांची येथे नितांत गरज आहे. तसेच, भारतातील शहरे आणि विभागांनुसार विशेष वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेमध्ये मोठी तफावत असू शकते, ज्यामुळे विविध ऑन्कोलॉजी उपचार केंद्रांमध्ये दिल्या जाऊ शकतील अशा उपचार पर्यायांची आवश्यकता असते. ब्लेनरेप-आधारित उपचार पद्धती पुन्हा उद्भवलेल्या किंवा उपचारांना दाद न देणाऱ्या मल्टिपल मायलोमाच्या व्यापक रुग्णगटामध्ये लक्षणीय आणि दीर्घकालीन आजार नियंत्रण दर्शवून या गरजा पूर्ण करतात.

ब्लेनरेपला ड्रीम (ड्रायव्हिंग एक्सलन्स इन अॅप्रोचेस टू मल्टिपल मायलोमा) क्लिनिकल प्रोग्रॅममधील व्यापक पुराव्यांचे पाठबळ आहे, ज्यामध्ये ड्रीम-७ आणि ड्रीम-८ या महत्त्वाच्या फेज III अभ्यासांचा समावेश आहे. या दोन्ही चाचण्यांमध्ये, पुन्हा उद्भवलेल्या किंवा उपचारांना दाद न देणाऱ्या मल्टिपल मायलोमाच्या द्वितीय-स्तरीय आणि त्यानंतरच्या उपचारांमध्ये ब्लेनरेप-आधारित उपचार पद्धतींनी आजार न वाढता जगण्याच्या कालावधीत वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण सुधारणा आणि एकूण जगण्याच्या कालावधीत उत्साहवर्धक परिणाम दर्शवले आहेत.

ड्रीम-७ चाचणीमध्ये, ब्लेनरेप-आधारित उपचार पद्धतीने [ब्लेनरेपसोबत बोर्टेझोमिब आणि डेक्सामेथासोन (BorDex)] ३६.६ महिन्यांचा सरासरी प्रोग्रेशन-फ्री सर्व्हायव्हल (पीएफएस) साध्य केला, जो दारातुमुमॅब-आधारित तुलनात्मक उपचार पद्धतीच्या [दारातुमुमॅब आणि BorDex] १३.४ महिन्यांच्या तुलनेत खूप अधिक आहे. तसेच तुलनात्मक पद्धतीच्या तुलनेत आजार वाढण्याचा किंवा मृत्यूचा धोका ५९ टक्‍के कमी झाल्याचे दिसून आले.

ड्रीम-८ चाचणीमध्ये, ब्लेनरेप-आधारित उपचार पद्धतीने [ब्लेनरेप (बेलांटामॅब मॅफोडोटिन) सोबत पोमालिडोमाइड आणि डेक्सामेथासोन (PomDex)] ३२.६ महिन्यांचा सरासरी पीएफएस साध्य केला, जो पोमालिडोमाइड-आधारित तुलनात्मक पद्धतीच्या [बोर्टेझोमिब आणि PomDex] १२.५ महिन्यांच्या तुलनेत खूप अधिक आहे, तसेच यामध्ये आजार वाढण्याचा किंवा मृत्यूचा धोका ५१ टक्‍के कमी झाल्याचे दिसून आले.

जीएसके इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण अक्षिकर म्हणाले, “भारतातील कर्करोगाचा वाढता भार रुग्ण, कुटुंबे आणि देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर वाढता ताण निर्माण करत आहे, ज्यामुळे सातत्यपूर्ण नाविन्यता आणि प्रगत उपचार पर्यायांची व्यापक उपलब्धता यांवर अधिक भर देण्याची गरज अधोरेखित होते. जीएसकेमध्ये, आमची अत्यंत महत्त्वाच्या आणि अपूर्ण वैद्यकीय गरजा असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून वैविध्यपूर्ण विज्ञानाच्या माध्यमातून कर्करोग उपचारांची दिशा बदलण्याची महत्त्वाकांक्षा आहे.”

ते पुढे म्हणाले, “गेल्या वर्षी आम्ही घन गाठींच्या (सॉलिड ट्यूमर्स) उपचारांसाठी जेम्पर्ली आणि झेजुलाद्वारे देशात आमचा ऑन्कोलॉजी प्रवास सुरू केला. ब्लेनरेपच्या लाँचसह आम्ही हेमॅटो-ऑन्कोलॉजी (रक्ताचा कर्करोग) क्षेत्रात विस्तार करत आहोत आणि प्रगत कर्करोग असलेल्या अधिकाधिक रुग्णांप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करत आहोत. मल्टिपल मायलोमासह जगणाऱ्या व्यक्तींसाठी आजार पुन्हा उद्भवणे हा उपचार प्रवासाचा वारंवार येणारा भाग असू शकतो8, आणि आम्ही त्यांच्या उपचारांच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

वैद्यकीय वैशिष्ट्यांच्या पलीकडे जाऊन ब्लेनरेप सोयीस्कर आणि लवचिक उपचारांचा अनुभव देते. ही थेरपी बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) अवघ्या ३० मिनिटांच्या इन्फ्युजनद्वारे दिली जाते1 आणि यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज भासत नाही, ज्यामुळे नियमित वैद्यकीय प्रक्रियेत रुग्णांना ही प्रगत थेरपी सहज उपलब्ध होऊ शकते.

जीएसके इंडियाच्या मेडिकल अफेअर्सच्या ईव्हीपी डॉ. शालिनी मेनन म्हणाल्या, “गेल्या दशकातील ऑन्कोलॉजीमधील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींपैकी एक म्हणजे आजाराच्या जीवशास्त्रावर आधारित तयार केलेल्या थेरपींचा उदय होय. ब्लेनरेपची वेगळी कार्यपद्धती या थेरपीला विशेष बनवते. ही पद्धती थेट अँटी-मायलोमा क्रियेसोबत रोगप्रतिकारशक्तीचा प्रभावी वापर करते, ज्यामुळे सखोल आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम साध्य होण्यास मदत होते. भारतातील रुग्णांसाठी कर्करोग उपचारांमधील ही अत्यंत महत्त्वाची प्रगती आहे.”

ब्लेनरेपची सुरक्षितता आणि सहनशीलता सुस्पष्ट आहे, तसेच यामध्ये डोळ्यांशी संबंधित अंदाज बांधता येण्याजोगे आणि पूर्ववत होऊ शकणारे दुष्परिणाम दिसू शकतात, ज्यांचे व्यवस्थापन सुरुवातीपासून उपचार प्रक्रियेत समाविष्ट केलेल्या प्रस्थापित डोस मॉडिफिकेशन नियमांद्वारे केले जाऊ शकते. पात्र रुग्ण उपचारांची परवडणारी क्षमता आणि उपलब्धता सुधारण्यासाठी डिझाइन केलेल्या जीएसकेच्या फिनिक्स पेशंट सपोर्ट प्रोग्रॅमचा लाभ घेऊ शकतात.

Epilepsy: एपिलेप्सीवर मात करणे शक्य! फक्त फिट्स थांबवण्याच्या पलीकडे जाऊन आधुनिक उपचार देत आहेत रुग्णांना नवे आयुष्य

Web Title: Gsk blenrep launch india multiple myeloma treatment cdsco approval pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Business News
  • Cancer Awareness
  • Health News
  • Healthcare

संबंधित बातम्या

health care: तुपाच्या अति सेवनामुळे वाढतं का वजन ?ते  मर्यादित वापरण्याची योग्य पद्धत काय?
1

health care: तुपाच्या अति सेवनामुळे वाढतं का वजन ?ते मर्यादित वापरण्याची योग्य पद्धत काय?

Bank Employees Salary Hike: बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारवाढीचा मार्ग मोकळा, किती वाढणार मासिक वेतन?
2

Bank Employees Salary Hike: बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारवाढीचा मार्ग मोकळा, किती वाढणार मासिक वेतन?

UPI Transaction Charges: UPI वापरणाऱ्यांना मोठा झटका? केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाकडे देशाचे लक्ष
3

UPI Transaction Charges: UPI वापरणाऱ्यांना मोठा झटका? केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाकडे देशाचे लक्ष

LPG Rate Hike: महागाईने त्रस्त जनतेला आणखी झटका? LPG सिलिंडरमागे 150 रुपये कमिशनची मागणी; पेट्रोल-डिझेलबाबतही मोठी मागणी
4

LPG Rate Hike: महागाईने त्रस्त जनतेला आणखी झटका? LPG सिलिंडरमागे 150 रुपये कमिशनची मागणी; पेट्रोल-डिझेलबाबतही मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.