Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Layoffs News : बातमीमुळे खळबळ… Tata Group च्या कर्मचाऱ्यांना धक्का! तब्बल ‘इतक्या’ कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात

Tata Group Layoffs News : देशातील अग्रगण्य आणि विश्वासू टाटा ग्रुपच्या एका कंपनीत मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीची तयारी सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. तब्बल ४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. नेमका यामुळे कर्चचाऱ्यांवर आणि कंपनीवर काय परिणाम होणार आहे?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 06, 2026 | 01:22 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बातमीमुळे खळबळ…
  • Tata Group च्या कर्मचाऱ्यांना धक्का!
  • ‘इतक्या’ कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात
Tata Group Layoffs News : देशातील अग्रगण्य आणि विश्वासू कंपनींपैकी टाटा अशी एक कंपनी आहे. नुकतीच टाटा ग्रुपबाबत मोठी बातमी समोर येत आहे. ग्रुपच्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर नोकरकपात होणार आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, कंपनी पुढील दोन वर्षांत यूकेमधील अंदाजे ४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कर्मचारी कपात प्रामुख्याने व्यवस्थापन आणि पगारदार कर्मचारी स्तरावर असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना या बातमीमुळे मोठा धक्का बसणार आहे. नेमकी कोणत्या कंपनीत होणार आहे कर्मचारी कपात? कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार आहे सविस्तर जाणून घेऊयात. ( Tata Group Layoffs News ) 

शत्रूची झोप उडवणार… सैन्याची ताकद वाढणार! भारतातच बनणार AK-203 रायफलच्या गोळ्या; Adani Group चे Defence क्षेत्रात मोठं पाऊल!

टाटा मोटर्सच्या मालकीची लक्झरी कार कंपनी जग्वार लँड रोव्हर JLR ऐच्छिक नोकरकपात सुरू करत आहे. याचा परिणाम सुमारे ४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कमी होऊ शकतात, असे वृत्त ब्रिटिश माध्यमांनी शनिवारी सांगितलं. ‘द टाइम्स’च्या वृत्तानुसार, ही लक्झरी कार कंपनी सोमवारी याबाबत औपचारिक घोषणा करण्याची शक्यता आहे.

कंपनीचा नेमका  काय उद्देश?

युकेमधील ‘द टाइम्स’ या वृत्तपत्रातील एका अहवालानुसार, कर्मचारी कपातीची ही योजना JLR च्या अंदाजे १.७ अब्ज युरो म्हणजेच २१,७०० कोटी रुपये वाचवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. कंपनीचा उद्देश आपले व्यवसाय मॉडेल सोपं करणे आणि आपला ब्रेक-इव्हन पॉइंट म्हणजे ज्या टप्प्यावर खर्च आणि महसूल समान होतात अशा परिस्थितीत वार्षिक ३,००,००० वाहनांपर्यंत कमी करणे हा देखील उद्देश आहे. याचा अर्थ असा की, कंपनी आता कमी वाहने विकूनही नफा मिळवण्याची योजना आखत आहे.

कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार?

JLR चे यूकेमध्ये ३३,००० हून अधिक प्रत्यक्ष कर्मचारी आहेत आणि सप्लाई चेनद्वारे आणखी १,२०,००० लोकांना रोजगार दिला जातो. कंपनीने स्पष्ट केले आहे की, या कर्मचारी कपातीचा कारखान्यांमधील तासावर काम करणाऱ्या असेंब्ली लाईन कामगारांवर परिणाम होणार नाही. अधिक सुटसुटीत आणि लवचिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणं हा कंपनीचा फोकस आहे. यामुळे पगार आणि कार्यालयीन देखभाल यांसारखे वार्षिक खर्च देखील कमी होणार आहे. त्यामुळे, जागतिक मंदी किंवा अमेरिकेच्या टॅरिफमुळे त्यांच्या वाहनांची मागणी कमी झाली तरी, कंपनी वर्षाला कमी वाहने विकून आपला खर्च वसूल करेल.

अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम

२९% बाजारपेठेतील हिस्सेदारीसह अमेरिका ही JLR ची सर्वात मोठी जागतिक बाजारपेठ आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटिश बनावटीच्या प्रवासी वाहनांच्या आयातीवर १०% नवीन आयात शुल्काची घोषणा केल्याने JLR च्या नफ्यावर आणि विक्रीवर थेट परिणाम झाला आहे. अमेरिका आणि यूके यांच्यातील करारानुसार, दरवर्षी पहिल्या १,००,००० वाहनांवर १०% सवलतीचे शुल्क लागू आहे. मात्र, एकदा हा कोटा ओलांडला की, ब्रिटिश गाड्यांवर २७.५% चा मोठा कर लादला जातो, ज्यामुळे निर्यात आव्हानात्मक बनते.

शिवाय, JLR च्या सर्वात लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक, डिफेंडर, स्लोव्हाकियामध्ये म्हणजेच युरोपमध्ये तयार केली जाते. मात्र, तो देश युरोपियन युनियनचा भाग नसल्यामुळे, या मॉडेलला अमेरिका-यूके कराराच्या १०% सवलतीच्या कोट्याचा लाभ मिळत नाही, ज्यामुळे कंपनीसमोरील आव्हाने आणखी वाढतात.

RBI चा थेट निशाणा! ‘या’ 5 Financial Companies वर झाली मोठी कारवाई; थेट 27 लाखांचा Penalty भरण्याचे आदेश

Web Title: Tata group job cuts update 4000 employees layoff news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • layoffs
  • Tata Group
  • Tata Moters

संबंधित बातम्या

दणका… 50000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, Auto Industry मध्ये मोठी खळबळ! प्लांटही होणार बंद; नेमके कारण काय?
1

दणका… 50000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, Auto Industry मध्ये मोठी खळबळ! प्लांटही होणार बंद; नेमके कारण काय?

PayPal Layoffs in India: PayPalचा भारताला मोठा धक्का! तब्बल 25% कर्मचाऱ्यांवर नोकरीवर टांगती तलवार
2

PayPal Layoffs in India: PayPalचा भारताला मोठा धक्का! तब्बल 25% कर्मचाऱ्यांवर नोकरीवर टांगती तलवार

Zomato Layoff : झोमॅटोचा कर्मचाऱ्यांना मोठा दणका! थेट 240 जणांना दाखवला बाहेरचा रस्ता, काय नेमकं कारण?
3

Zomato Layoff : झोमॅटोचा कर्मचाऱ्यांना मोठा दणका! थेट 240 जणांना दाखवला बाहेरचा रस्ता, काय नेमकं कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.