Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Stocks Fall : Chandrasekaran यांच्या राजीनाम्याने शेअर बाजारात खळबळ? टाटाच्या कंपन्यांचे शेअर कोसळले, तब्बल 68000 कोटी स्वाहा

Tata Stocks Fall : एन. चंद्रशेखरन यांनी टाटा संसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या बातमीने भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम टाटा समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर झाला असून एकाच दिवसात टाटा समूहाचे बाजार भांडवल तब्बल 68000 कोटी रुपयांनी घटले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 12, 2026 | 06:51 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याने शेअर बाजारात खळबळ?
  • टाटाच्या कंपन्यांचे शेअर कोसळले
  • तब्बल 68000 कोटी स्वाहा
Tata Stocks Fall : देशातील उद्योग क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी टाटा सन्सचे ( Tata Stocks Fall ) चेअरमन राजीनामा देणार अशा चर्चां सुरु होत्या. एन. चंद्रशेखरन यांनी त्यांच्या सध्याच्या कार्यकाळानंतर पुन्हा चेअरमन पदासाठी आपले नाव पुढे न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी तात्काळ पद सोडणार नाहीत आणि फेब्रुवारी २०२७ पर्यंत आपला सध्याचा कार्यकाळ पूर्ण करतील असं स्पष्ट केलं. त्यात त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबतचे चित्र सध्या अस्पष्ट आहे. या सगळ्या घडामोडीचा परिणाम थेट शेअर बाजारावर दिसून आला. शेअर बाजारात टाटा कंपन्यांनी कशी कामगिरी केली, नेमका किती दणका बसला सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

Airtel Recharge : एयरटेल ग्राहकांना मोठा धक्का! प्लॅन्सच्या किमतीत थेट वाढ; 299 चा प्लॅन आता ‘इतका’ महागला

चंद्रशेखरन यांनी १९८७ मध्ये टाटा ग्रुपसोबत आपल्या प्रवासाला सुरुवात केली. ते २००९ मध्ये TCSचे सीईओ झाले आणि २०१७ मध्ये त्यांनी टाटा सन्सच्या चेअरमनपदाची धुरा स्विकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली, टाटा ग्रुपने विमान वाहतूक, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर, बॅटरी आणि डिजिटल व्यवसायांसह अनेक नवीन क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक केली. चांगल्या लेव्हलवर कंपनी नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

टाटा कंपन्यांना ६८,००० कोटी रुपयांचा फटका

चंद्रशेखरन यांच्या निर्णयाचा परिणाम आज शेअर बाजारावरही मोठ्या प्रमाणात दिसून आला. टाटा समूहाच्या लिस्टींग कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि समूहाच्या कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅपिटल अंदाजे ६८,००० कोटी रुपयांनी घटले. सर्वाधिक फटका बसलेल्या कंपन्यांमध्ये TCS चा समावेश होता, तिच्या शेअरमध्ये अंदाजे ४.८% इतकी घसरण झाली. टायटन, टाटा स्टील, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, टाटा पॉवर आणि इंडियन हॉटेल्ससह इतर अनेक कंपन्यांच्या शेअर्सवरही दबाव आला. पण काही टाटा कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढही दिसून आली.

टाटा समूहातील अंतर्गत मतभेद

चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवरून टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्स यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या काही काळापासून बऱ्याच पसरत आहेत. बाजारातील सूत्रांनुसार, टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी टाटा सन्सच्या संभाव्य भविष्यातील सूचीकरणासह काही अटींवर चर्चा केली. संचालक मंडळातील प्रतिनिधित्व आणि समूहाच्या भविष्यातील धोरणाबाबतही मतभेद असल्याचे वृत्त आहे. पण या मुद्द्यांवर टाटा समूहाकडून कोणतीही सविस्तर अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
टाटा सन्स ही टाटा समूहाची प्रमुख होल्डिंग कंपनी असून, यामध्ये टीसीएस, टाटा मोटर्स आणि एअर इंडियासह ३० हून अधिक कंपन्यांचा समावेश आहे. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्ट्सची अंदाजे ६६% हिस्सेदारी आहे.

टाटा समूहापुढे मोठी आव्हानं!

चंद्रशेखरन यांचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा एअर इंडिया, टीसीएस आणि जॅग्वार लँड रोव्हरसह समूहातील अनेक कंपन्या विविध व्यावसायिक आव्हानांना तोंड देत आहेत. आता बाजाराचे लक्ष १८ ऑगस्टच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवर आणि नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीवर असेल. तज्ज्ञांच्या मते, सध्याची घसरण ही व्यवसायातील अचानक आलेल्या कमकुवतपणामुळे नसून, नेतृत्वाच्या अनिश्चिततेवर बाजाराने दिलेली प्रतिक्रिया म्हणून पाहिली जात आहे.

Magicbricks Housing Sentiment : भाड्याच्या घराला रामराम! तरुण भारतीयांमध्ये घर खरेदी करण्याचं क्रेझ; 3-4 BHK घरांना मोठी पसंती

Web Title: Tata stocks fall plunge loss 68000 crore after chandrasekaran resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • N Chandrasekaran
  • Noel Tata
  • Stock
  • Stock market
  • Tata
  • Tata Group

संबंधित बातम्या

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
1

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
2

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा
3

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य
4

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.