फोटो सौजन्य - Social Media
भारत गेल्या काही वर्षांपासून बेरोजगारी सारख्या मोठ्या समस्यांना तोंड देत आहे. परंतु, आता कुठेतरी या समस्येला खंड पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये काही कंपन्या परदेशातून भारतात स्थलांतरित होत आहेत. भविष्यामध्ये या गोष्टीचा फायदा नक्कीच भारताला होणार आहे. परदेशातून भारतामध्ये उद्योगासाठी स्थलांतरित होणाऱ्या या कंपन्यांचा देशाला मोठा फायदा होणार आहे. याचे संकेत भारतीय बाजारामध्ये पाह्यला मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे या कंपन्यांचे भारतात येण्याने भारतात बेरोजगारीचा दर कमी होणार असल्याचे संकेत वर्तवण्यात आले आहेत, त्यामुळे भारतीय बाजरपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.
अमेरिका आणि चीन या देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून ट्रेड युद्ध चालू असल्याचे दिसून येत आहे. तसेच भारत आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही वर्षांपासून खूप चांगले आहेत. या गोष्टीचा फायदा भारताला होताना दिसून येत आहे. चीन मध्ये स्थित असलेले १५ अमेरिकी कंपन्या भारतामध्ये स्थलांतरित होण्याच्या वाटचालीत आहेत. या १५ अमेरिकी कंपन्यांचे भारत नवीन हब बनणार आहे. त्यामुळे देशामध्ये भविष्यात रोजगाराची संधी निर्माण होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे.
अमेरिकन कंपन्यांची चीनमधून बाहेर पडण्याची इच्छा वाढत आहे. एकूण 50 कंपन्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे. त्यांनी चीनमध्ये 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापैकी 15 कंपन्यांना त्यांचा व्यवसाय भारतात घेऊन जायचं आहे, अशी त्यांची इच्छा आहे. या अहवालात तब्ब्ल 306 कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता. सुंत्रानुसार, गुंतवणूकदारांना मेक्सिको, अमेरिका तसेच युरोपीय देशांच्या तुलनेमध्ये भारत जास्त आकर्षित वाटत आहे. गुंतवणूकदारांची पसंती कुणाला? या रिपोर्टमध्ये गेल्यावर्षी भारत पाचव्या स्थानी होता. यावर्षी भारताने दुसरे स्थान गाठले आहे.
हे देखील वाटा : OYOचा अमेरिकेतही डंका! ५२५ मिलियन डॉलर कॅशमध्ये विकत घेतेय ‘ही’ कंपनी
भारतामध्ये वाढत चालली परदेशी कंपन्यांची गुंतवणूक भारताला भविष्यात फार फायद्याचे ठरणार आहे. गारमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रांनीही भारतात गुंतवणूक करण्यात रस दाखवला आहे. यूएस चेंबर ऑफ कॉमर्सच्या अहवालात समाविष्ट असलेल्या 306 अमेरिकन कंपन्यांपैकी बहुतेकांचा असा विश्वास आहे की भारतात गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण तयार केले जात आहे. भारताची मोठी बाजारपेठ त्यांना प्रोत्साहन देत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.