फोटो सौजन्य - Social Media
मूळची भारतीय असणाऱ्या ओयो या कंपनीने देशामध्ये आपले तगडे जाळे विणले आहे. लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या ओयोने हॉटेल क्षेत्रामध्ये मोठे नाव केले आहे. परंतु, ओयो हे नाव आता देशाच्या बाहेर ही प्रसिद्ध होत आहे. देशाच्या बाहेर ओयोने लोकांच्या मनावर जादू करण्यास आणि हॉटेल क्षेत्रामध्ये आपले नाव अजून उंचावण्यास पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. ओयो अमेरिकेसारख्या विशाल देशामध्ये आपले विशाल जाळे टाकण्यास तयार आहे. ओयो सध्या IPO आणण्याच्या तयारीमध्ये आहे, यामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे.
हे देखील वाचा : सणासुदीच्या काळात Samsung इंडियाचा एआय-पॉवर्ड ‘बिग टीव्ही फेस्टिवल’, जाणून घ्या ‘या’ खास ऑफर्स
Oyo ची मूळ कंपनी Oravel Stage ने शनिवारी एका कराराविषयी माहिती जाहीर केली आहे. ही माहिती अमेरिकेतील एका मोठ्या उद्द्योगाविषयीची आहे. ओयो लवकरच G6 हॉस्पिटॅलिटी विकत घेण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी अमेरिकेमध्ये Motel6 आणि Studio6 या ब्रँड नावाने व्यवसाय करते. मोटेल 6 आणि स्टुडिओ 6 हे अमेरिकेतील आयकॉनिक बजेट हॉटेल ब्रँड्समध्ये गणले जातात. ही कंपनी Oyo लवकरच आपल्या ताब्यामध्ये घेणार आहे.
कंपनीने या साबणाधित माहिती जाहीर केली आहे. Oyo जवळजवळ ५२५ मिलियन डॉलर चा हा सौदा करणार आहे. या वर्षायाखेरीज हा करार पूर्णत्वास येईल. त्यामुळे व्यवसाय क्षेत्रात फार मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. कंपनीने या वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ पर्यंत हा सौदा पूर्णत्वास येणार असल्याचे सांगितले आहे. मुळात, हा सौदा कॅश मध्ये होणार असल्यामुळे याकडे सगळ्यांचे विशेष लक्ष लागले आहे.
Oyo ने २०१९ पासून अमेरिकेमध्ये आपले प्रथम पाऊल ठेवले. गेल्यावर्षी १०० हॉटेल्सला आपल्यासोबत जोडून आता अमेरिकेच्या २५ राज्यांमध्ये Oyo ची ३२० पेक्षा अधिक हॉटेल्स आहेत. यावर्षी किमान २५० हॉटेल्स सोबत जोडावे असा लक्ष्य कंपनीने व्यक्त केला आहे.