Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील यशस्वी व्यापाऱ्यांमध्ये आढळतात ‘या’ सवयी; आजच करा अंगीकृत, ध्येयप्राप्ती होईल सोपी

जगातील यशस्वी उद्योजकांकडे काही सामान्य सवयी आढळतात ज्या त्यांना यशाच्या शिखरावर नेतात. शिस्त, शिकण्याची तयारी, निर्णयक्षमता आणि वेळ व्यवस्थापन हे त्यापैकी काही महत्त्वाचे गुण आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 22, 2025 | 04:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

यशस्वी व्यापारी हे केवळ नशीबाने यशस्वी होत नाहीत, तर त्यामागे त्यांच्या विशेष सवयी, दृष्टिकोन आणि कष्टांची शिस्तबद्ध पद्धत असते. जगातील अनेक मोठे उद्योजक आणि व्यापारी जसे की एलॉन मस्क, वॉरेन बफेट, मुकेश अंबानी, रतन टाटा यांच्याकडे पाहिलं, तर त्यांच्यात काही समान वैशिष्ट्यं दिसून येतात. ही वैशिष्ट्यं कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

एफआयआयची खरेदी की डॉलरची कमकुवतता? ‘या’ कारणांनी शेअर बाजारात तेजी

वाचन

सर्वप्रथम, नित्य नवीन शिकण्याची तयारी हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हे यशस्वी लोक सतत वाचन करतात, उद्योगातील नवीन ट्रेंड समजून घेतात आणि नविन ज्ञान मिळवण्यासाठी वेळ काढतात. वॉरेन बफेट तर दररोज तासंतास वाचन करतात.

दृढ इच्छाशक्ती

दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दृढ इच्छाशक्ती आणि चिकाटी. कितीही अडचणी आल्या तरी ते हार मानत नाहीत आणि पुढे कार्य करत राहतात. अपयश आल्यास ते शिकण्याची संधी समजतात आणि त्यातून सुधारणा करतात.

वेळेचे व्यवस्थापन

तिसरं म्हणजे उत्तम वेळ व्यवस्थापन. वेळेचा सदुपयोग हे यशाचं मुख्य सूत्र आहे. ते दिवसाची योजना ठरवून, प्राधान्यक्रमानुसार काम करतात. अनेक यशस्वी व्यापारी सकाळी लवकर उठतात आणि दिवसाची सुरुवात स्पष्ट उद्दिष्टांपासून करतात.

निर्णय घेण्याची क्षमता

चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे धाडसाने निर्णय घेण्याची क्षमता. यशस्वी उद्योजक वेळोवेळी मोठे निर्णय घेतात आणि त्यावर ठाम राहतात. बाजारात जोखीम घेतल्याशिवाय प्रगती होत नाही, हे ते जाणतात.

Share Market Closing Bell: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार तेजीत, सेन्सेक्स ८५५ अंकांनी वाढला; निफ्टी २४,१२५ वर झाला बंद

टीम कोऑर्डिनेशन

पाचवं म्हणजे चांगली टीम बांधण्याची कला. एकटे कोणीही मोठं यश मिळवू शकत नाही. त्यामुळे ही मंडळी योग्य लोकांची निवड करतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि टीमला प्रोत्साहन देतात.

शेवटी, त्यांच्याकडे असतो तो स्पष्ट दृष्टीकोन आणि दीर्घकालीन विचार. लहान यशांवर समाधान मानने त्यांना जमत नाही, भविष्यातील मोठ्या योजनेवर काम करणे त्यांची पध्द्त असते. या सवयी आणि गुण जर आपणही आत्मसात केल्या, तर निश्चितच यशाची वाट सुकर होते.

Web Title: These are the habits found among the worlds most successful businessmen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • Business Man
  • Skill Development

संबंधित बातम्या

सरकारची मोठी कर सुधारणा, २०४७ पर्यंत समान कर स्लॅब लागू करण्याची तयारी
1

सरकारची मोठी कर सुधारणा, २०४७ पर्यंत समान कर स्लॅब लागू करण्याची तयारी

Mangal Prabhat Lodha: “महाराष्ट्राला २०४७ पर्यंत…”; कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांचे भाष्य
2

Mangal Prabhat Lodha: “महाराष्ट्राला २०४७ पर्यंत…”; कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांचे भाष्य

Mangal Prabhat Lodha: “…यात महाराष्ट्राचे भरीव योगदान राहणार”; मंत्री मंगल प्रभात लोढांची ग्वाही
3

Mangal Prabhat Lodha: “…यात महाराष्ट्राचे भरीव योगदान राहणार”; मंत्री मंगल प्रभात लोढांची ग्वाही

सीमेन्स लिमिटेड आणि टाटा स्ट्राइव्ह यांनी व्यावसायिक प्रशिक्षणात गाठला महत्त्वाचा टप्पा, १.२ लाखांहून अधिक तरुणांना केले सक्षम
4

सीमेन्स लिमिटेड आणि टाटा स्ट्राइव्ह यांनी व्यावसायिक प्रशिक्षणात गाठला महत्त्वाचा टप्पा, १.२ लाखांहून अधिक तरुणांना केले सक्षम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.