Crypto मार्केटमध्ये खळबळ! ( सौजन्य - सोशल मीडिया )
सोमवारी दुपारी सुमारे २:३० वाजता, बिटकॉइनचा भाव $80,188 होता. सकाळी सुमारे ९:३० वाजेपर्यंत, तो $80,000 च्या खाली घसरून $79,370 वर आला होता. या वर्षी १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान झालेली मोठी वाढ वगळता, बहुतेक वेळ त्यात घसरणच होत असलेली पाहायला मिळाली.
गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला, बिटकॉइनची किंमत सुमारे $125,000 होती. ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी असल्याचं बोललं जातं. यानंतर, त्यात मोठी घसरण झाली आहे. गेल्या एका वर्षात, बिटकॉइनची किंमत सुमारे 30 टक्क्यांनी घसरली आहे. 7 दिवसांत ती सुमारे 3 टक्क्यांनी आणि एका महिन्यात 4 टक्क्यांहून अधिक घसरली आहे. मात्र, गेल्या 3 महिन्यांत त्यात काही वाढ दिसून आलेली आहे. या कालावधीत, त्यात 26 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दरम्यान, या वर्षीच्या 1 जानेवारीपासून आतापर्यंत, बिटकॉइनची किंमत 8 टक्क्यांहून अधिक घसरली आहे.
WazirX चे संस्थापक निश्चल शेट्टी यांच्या मते, बिटकॉइनची किंमत सध्या काही प्रमुख मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आहे. पण RSI सारखे तांत्रिक निर्देशक बाजारात जास्त खरेदी किंवा जास्त विक्री होत असल्याचे दर्शवत नाहीत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि महागाई क्रिप्टोकरन्सीवर दबाव आणत आहेत. त्यामुळे त्याची चाल बिघडली आहे.
निश्चल शेट्टी यांनी स्पष्ट केले की, $७९,००० ते $७९,५०० ही पातळी बिटकॉइनला तात्काळ आधार देऊ शकते. जर किंमत या पातळीच्या खाली घसरली, तर पुढील महत्त्वाची पातळी $७७,५०० ते $७७,७०० असेल. पण, जर किंमत $८०,७०० ते $८१,२०० च्या वर गेली, तर तिच्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वाढू शकते.
( Desclaimer : क्रिप्टोकरन्सीचा व्यापार दिवसाचे २४ तास होतो आणि त्यांच्या किमती वेगाने बदलतात. क्रिप्टोकरन्सीच्या किमती काही मिनिटांत लक्षणीयरीत्या खाली येऊ शकतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. )






