
फोटो सौजन्य - Social Media
दक्षिण आशियात शाश्वत विकास संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी TryfactaEDU Global Foundationची UNESCOच्या MOST BRIDGES Coalitionच्या दक्षिण आशिया प्रादेशिक कार्यक्रम कार्यालयासाठी (South Asia Regional Programme Office) निवड करण्यात आली आहे. गुजरातमधील GIFT City येथे हे कार्यालय स्थापन होणार असून, जुलै ते सप्टेंबर 2026 दरम्यान ते कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2026 पासून विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
Toll : टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! आता मोबाईलवर काही मिनिटांत मिळणार Digital पास
BRIDGES गव्हर्निंग कौन्सिलने 26 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी दिली. शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी क्षेत्रातील फाउंडेशनच्या योगदानाची दखल घेत ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा उपक्रम UNESCOच्या Management of Social Transformations (MOST) कार्यक्रमांतर्गत राबवला जाणार असून, 2026 ते 2028 या धोरणात्मक आराखड्याचा महत्त्वाचा भाग आहे.UNESCOच्या MOST BRIDGES Coalitionच्या दक्षिण आशिया प्रादेशिक कार्यक्रम कार्यालयासाठी (South Asia Regional Programme Office) TryfactaEDU Global Foundationची निवड करण्यात आली आहे.
या प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून दक्षिण आशियातील विद्यापीठे, संशोधन संस्था, धोरणकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक समुदायांना एकत्र आणून शाश्वत विकासासाठी आंतरशाखीय संशोधनाला चालना दिली जाणार आहे. तसेच UNESCOच्या Guidelines for Sustainability Scienceची प्रभावी अंमलबजावणी, ज्ञानाची देवाणघेवाण आणि नव्या प्रादेशिक भागीदारांचा समावेश करण्यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी TryfactaEDU Global Foundationचे अंतरिम अध्यक्ष डॉ. जॉन क्रॉली यांनी सांगितले की, भारतात या प्रादेशिक कार्यालयाची स्थापना होणे हा दक्षिण आशियातील शाश्वत विकास संशोधनासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. शैक्षणिक संस्था, धोरणकर्ते आणि समाज यांना एकत्र आणून स्थानिक समस्यांवर परिणामकारक उपाय शोधण्याचे हे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
UNESCO MOST BRIDGES Coalitionचे कार्यकारी संचालक डॉ. स्टीव्हन हार्टमन यांनीही दक्षिण आशियातील समृद्ध ज्ञानपरंपरा, संशोधन क्षमता आणि विविध समुदायांच्या सहभागामुळे या भागाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. या भागीदारीमुळे जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी स्थानिक पातळीवरील प्रभावी उपाय विकसित करण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
रस्ते सुरक्षिततेबाबत संशोधनाचं म्हणणं काय? 10 पैकी 9 जण सुरक्षित? पण कमी वाहतूक तज्ज्ञ याच्याशी सहमत
GIFT City येथील हे कार्यालय पाणी व्यवस्थापन, शहरी नियोजन, ऊर्जा, जैव-नैतिकता, पर्यावरणीय नैतिकता, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) नैतिकता आणि अन्न प्रणाली यांसारख्या विषयांवर संशोधनाला प्रोत्साहन देणार आहे. शिक्षण, माध्यम, संवाद आणि कला यांचा समावेश असलेल्या बहुआयामी दृष्टिकोनातून दक्षिण आशियात शाश्वत विकासासाठी नवे सहकार्य निर्माण करण्यावर या उपक्रमाचा भर असणार आहे.