Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Price Hike : सणासुदीच्या तोंडावर पुन्हा झटका! वर्षात सलग तिसऱ्यांदा दरवाढ; 1ऑक्टोबरपासून Electronic वस्तू महागणार!

Electronic Items Price Hike : नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात गृहोपयोगी वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. १ ऑक्टोबरपासून टीव्ही, एसी आणि फ्रिज यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती पुन्हा एकदा वाढणार असून, २०२६ या एकाच वर्षातील ही तिसरी दरवाढ ठरणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 27, 2026 | 03:18 PM
1ऑक्टोबरपासून Electronic वस्तू महागणार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

1ऑक्टोबरपासून Electronic वस्तू महागणार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • सणासुदीच्या तोंडावर पुन्हा झटका!
  • वर्षात सलग तिसऱ्यांदा दरवाढ
  • 1ऑक्टोबरपासून Electronic वस्तू महागणार!
Electronic Items Price Hike : सणासुदीच्या काळात महागाईने डोकं वर काढलं आहे. फक्त जीवनावश्यक गोष्टींच नाही तर आता इतर वस्तूंनादेखील महागाईची झळ बसू लागली आहे. येत्या सणासुदीच्या हंगामापूर्वी देशात आता एअर कंडिशनर AC, LED TV, वॉशिंग मशीनसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. किमतीत नेमकी किती वाढ होणार? आणि काय आहे या मागचं कारण? ( Electronic Items Price Hike ) 

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा

कंपन्यांच्या मते, तांबे, ॲल्युमिनियम, स्टील, प्लास्टिक आणि कच्च्या तेलाशी संबंधित उत्पादनांच्या वाढत्या किमती, तसेच मालवाहतुकीचा खर्च आणि परकीय चलनातील चढ-उतार यामुळे ही दरवाढ आवश्यक झाली आहे. यावर्षी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांकडून किमती वाढवण्याची ही तिसरी वेळ असेल. तांबे आणि स्टीलसारख्या कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ लक्षात घेता, प्रमुख ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती पाच ते आठ टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत आहेत.

AC किती महाग होणार?

AC च्या किमती सुमारे पाच ते आठ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असताना, काही कंपन्या वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि एलईडी टीव्हीच्या किमती तीन ते चार टक्क्यांनी वाढवत आहेत. पण काही कंपन्या अजूनही परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अनेक कंपन्यांना वाटते की या दरवाढीचा मागणीवर परिणाम होऊ शकतो. तर काहींच्या मते, दरवाढीचा परिणाम मर्यादित असेल, कारण डीलर्स आणि वितरकांकडे जुन्या किमतीत आधीच मालसाठा उपलब्ध आहे. ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डायकिन आणि सुपर प्लास्ट्रॉनिक्ससह अनेक कंपन्यांनी विविध श्रेणींमध्ये दरवाढीची घोषणा आधीच केली आहे.

दरवाढीचं कारण काय?

एलजी आणि हिताची ब्रँडचे एअर कंडिशनर विकणाऱ्या बॉश होम कम्फर्टनेही एसीच्या दरात सुमारे पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. पॅनासोनिक सध्या दरवाढीबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन म्हणाले की, वाढत्या वस्तूंच्या किमतींमुळे एसी आणि डीप फ्रीझरच्या दरात आधीच पाच ते आठ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ते म्हणाले की, तांबे, स्टील आणि प्लास्टिकसह विविध कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत आणि कंपनीने यावर्षी आतापर्यंत तीन वेळा दरवाढ केली आहे.

वस्तूंच्या किमती 8 ते 10% नी वाढल्या

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले की, मागील दर आढाव्यापासून वस्तूंच्या किमती आठ ते दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिणामी, विविध श्रेणींमध्ये पाच ते सात टक्क्यांची दरवाढ अटळ आहे. पण त्यांनी पुढे सांगितले की, जुन्या किमतीत खरेदी केलेला माल बाजारात सुमारे एक ते दीड महिना उपलब्ध राहू शकतो.

तांब्याच्या किमतीत मोठी वाढ

डायकिन एअर कंडिशनिंग इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कंवलजीत जावा यांनी सांगितले की, कंपनीने १६ सप्टेंबरपासून किमतीत आठ ते दहा टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, तांब्याच्या किमती अंदाजे २५ ते ३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि डॉलरच्या मजबुतीमुळे कंपन्यांवरील खर्चाचा दबाव आणखी वाढला आहे. दरम्यान, सुपर प्लास्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड SPPL ऑक्टोबरनंतर टीव्हीच्या किमतीत अंदाजे सात टक्क्यांनी वाढ करण्याची योजना आखत आहे. कंपनीच्या मते, इतर घरगुती उपकरणांच्या किमती आधीच चार ते पाच टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत.

उद्योगासाठी चिंतेची बाब

या दरवाढीचा सणासुदीच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंताही उद्योगाला वाटत आहे. नवरात्री आणि दिवाळी दरम्यान कंपन्या आकर्षक सवलती आणि ऑफर्स देत असल्याने ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांच्या विक्रीत सामान्यतः मोठी वाढ होते. त्यामुळे, वाढलेल्या किमतींचा ग्राहकांच्या खरेदीच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. मात्र, कंपन्यांचे म्हणणे आहे की, डीलर्स आणि वितरकांकडे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जुन्या दरात खरेदी केलेला पुरेसा साठा आहे. त्यामुळे, काही उत्पादने दिवाळीपर्यंत जुन्या दरात उपलब्ध राहू शकतात.

LPG पुरवठ्यात America ने मारली बाजी! भारताला सर्वाधिक पुरवठा करणारा ठरला देश; अमेरिकन अधिकाऱ्यांचे मोठं विधान

Web Title: Tv ac refrigerator price to increase from 1st october 3rd time this year marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Electric
  • Price Hike

संबंधित बातम्या

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच
1

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.