Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2025: शनिवारीही खुला राहणार शेअर बाजार, NSE ने जाहीर केले का केला बदल

यावेळी १ फेब्रुवारी हा शनिवार आहे आणि या दिवशी देशातील शेअर बाजार खुला राहील. एनएसईने अधिसूचना जारी करून या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बाजार सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० पर्यंत खुला राहील

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 29, 2025 | 09:59 AM
शनिवारीही बाजार राहणार खुला (फोटो सौजन्य - iStock)

शनिवारीही बाजार राहणार खुला (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय शेअर बाजार सहसा शनिवार आणि रविवारी बंद असतो. पण यावेळी देशांतर्गत शेअर बाजार शनिवारी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी खुला राहील. खरंतर, यावेळी शनिवारी अर्थात १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने याबाबत एक माहिती जारी केली आहे. एनएसईने जारी केलेल्या माहितीत असे म्हटले आहे की १ फेब्रुवारी (शनिवार) रोजी शेअर बाजार सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० पर्यंत खुला राहील. बजेट असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

कसा असेल शेअर बाजाराचा दिवस?

सामान्य दिवशी, आठवड्याचे शेवटचे दोन दिवस, शनिवार आणि रविवार शेअर बाजार बंद राहतात. परंतु कधीकधी सामान्य अर्थसंकल्पाच्या दिवसासारख्या खास प्रसंगी बाजार शनिवारी देखील खुला राहतो. त्याचप्रमाणे, १ फेब्रुवारी २०२० आणि २८ फेब्रुवारी २०१५ रोजी शनिवारी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि त्या दिवशी बाजार खुला होता. अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशी बाजार सुरू होण्यापूर्वी ज्यांना व्यवहार करायचा आहे त्यांच्यासाठी बाजार सकाळी ९:०० ते ९:०८ पर्यंत खुला राहील.

Budget 2025: देशातील करोडो लोकांना मिळणार स्वस्त गॅस सिलेंडरचे गिफ्ट? LPG बाबत घोषणा होण्याची आशा

NSE ने दिली माहिती 

एका अधिसूचनेनुसार, बीएसई निर्देशांकाची गणना १ फेब्रुवारी २०२५ (शनिवार) रोजी देखील केली जाईल. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मुळे एक्सचेंजने हा दिवस विशेष व्यापार दिवस म्हणून घोषित केला आहे. नियमित व्यवहार वेळेत बाजार खुला राहील. याबद्दल अधिक माहिती खाली दिली आहेः

  • ब्लॉक डील मीटिंग-१ : सकाळी ०८:४५ ते ०९:००
  • विशेष प्री-ओपन सत्र (आयपीओ आणि सूचीबद्ध सिक्युरिटीजसाठी): सकाळी ०९:०० ते ०९:४५ 
  • कॉल ऑक्शन इलक्विड सेशन (प्रत्येकी १ तासाचे ६ सेशन): सकाळी ०९:३० ते दुपारी ३:३०
  • ब्लॉक डील मीटिंग-२: दुपारी २:०५ ते २:२०
  • समाप्ती सत्रानंतर: दुपारी ३:४० ते ४:०० वाजेपर्यंत
  • व्यापार सुधारणा कट ऑफ वेळ: ४:१५ PM पर्यंत
मंगळवारचा शेअर बाजार

मंगळवारी एक दिवस आधी, शेअर बाजार (सेन्सेक्स आणि निफ्टी) वाढीसह उघडले आणि दिवसभर त्याच पद्धतीने व्यवहार करत राहिले. रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांकडे पैसे वाढवण्याची घोषणा केल्यामुळे शेअर बाजारात वाढ दिसून आली. पण त्याआधी सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती आणि त्या दिवशी गुंतवणूकदारांना सुमारे ९ लाख २८ हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. या घसरणीसह, शेअर बाजार निर्देशांक सात महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला.

Budget 2025: देशाचं बजेट कोण करतंय तयार? निर्मला सीतारमण आणि ‘बजेट टीम’, जाणून घ्या

केंद्रीय बजेट २०२५

अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाच्या आर्थिक स्थितीचा अहवाल सादर करतील, ज्याला आर्थिक सर्वेक्षण म्हणतात. या दिवशी, संसदेच्या दोन्ही सभागृहांची अर्थात लोकसभा आणि राज्यसभा यांची राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर थोड्या वेळासाठी बैठक होईल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चेसाठी लोकसभेने दोन दिवस ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी निश्चित केले आहेत. राज्यसभेने या चर्चेसाठी तीन दिवस राखून ठेवले आहेत.

Web Title: Union budget 2025 indian stock market will be open or closed on saturday 1 february on budget day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • Budget 2025
  • Business News
  • Nirmala Sitharaman
  • Union Budget 2025

संबंधित बातम्या

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य
1

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

भारतीय रिअल इस्टेटचा ‘सुवर्णकाळ’! २०२५ मध्ये विक्रमी वाढ; आता २०२६ मध्ये ‘स्मार्ट’ आणि ‘शाश्वत’ घरांचे पर्व
2

भारतीय रिअल इस्टेटचा ‘सुवर्णकाळ’! २०२५ मध्ये विक्रमी वाढ; आता २०२६ मध्ये ‘स्मार्ट’ आणि ‘शाश्वत’ घरांचे पर्व

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
3

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल
4

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.