
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत . त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात झाली आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक असल्याने या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशावेळी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार असे सांगून त्यांनी शेतकरी वर्गाला सरकारने अर्थसंकल्पात दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली आहे. सर्वसमावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे, हरित विकास, तरुणांचं सामर्थ्य आणि आर्थिक क्षेत्र या सप्तर्षी या आर्थिक बजेट मध्ये प्रमुख असल्याचेही त्यांनी सांगितले .
आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या कि, हा देशाच्या अमृतकाळातला पहिला अर्थसंकल्प आहे . भारताने गेल्या ९ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगभरात दहाव्या क्रमांकापासून पाचव्या क्रमांकापर्यंत विकसित झाली आहे. यूपीआय, कोविन अॅपमुळे जगानं भारताचं महत्त्व मान्य केलं असे त्या म्हणाल्या.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणातील काही मुद्दे
जगातील अनेक देश आर्थिक मंदीतून जात असताना, भारत मात्र पाय घट्ट रोवून उभा आहे
सध्या जगतिक मंदी आहे
स्वातंत्र्याच्या पच्चाहत्तरीत भारताची ताकद जगाने मान्य केली
जागतिक मंचावर भारताचे महत्त्व वाढलेय
जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच महत्त्व वाढलं आहे
यूूपीआय, कोविन अँप, यामुळं भारताची ताकद जगाला समजली आहे
मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था मजबूत झाली
जी-२०चं अध्यक्षपद भारताला मिळणं भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे
केंद्र सरकारने विविध योजना राबविला, त्या योजना शेवटच्या माणसांपर्यत पोहचल्या
सरकारने योजना चांगल्या पद्धतीने राबविल्या
कोविड लसीकरण हा भारताचा मैलाचा दगड ठरणारी मोहीम
पीएम गरीब कल्याण अन्न योजना पुढचे वर्षभर सुरु होणार
२ लाख कोटींची योजना, ८० कोटी जणांना मोफत अन्न धान्य देणार
१०२ कोटी लोकांचे लसीकरण झाले
सर्वागिण विकासाचं स्वप्न भारत पूर्ण करतोय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज त्यांचा सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ चा आर्थिक विकासाचा वेग ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना आज जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात नेमका काय घोषणा केल्या जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.