Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War: अवकाळी पावसाचा एसी विक्रीवर परिणाम; प्लास्टिक महागल्याने उपकरणांच्या किमती वाढणार

देशाच्या अनेक भागांमध्ये नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे एअर कंडिशनर उत्पादक सतर्क झाले आहेत. याचा परिणाम उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात एसीच्या मागणीवर होऊ शकतो, अशी भीती विक्रेत्यांना आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 23, 2026 | 10:56 AM
Iran-Israel War: अवकाळी पावसाचा एसी विक्रीवर परिणाम; प्लास्टिक महागल्याने उपकरणांच्या किमती वाढणार

Iran-Israel War: अवकाळी पावसाचा एसी विक्रीवर परिणाम; प्लास्टिक महागल्याने उपकरणांच्या किमती वाढणार

Follow Us
Follow Us:
  • अवकाळीने एसीच्या मागणीवर परिणाम
  • १०-१२ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
  • होम अप्लायन्सेस महागण्याची शक्यता
 

Iran-Israel War: देशाच्या अनेक भागांमध्ये नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे एअर कंडिशनर उत्पादक सतर्क झाले आहेत. याचा परिणाम उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात एसीच्या मागणीवर होऊ शकतो, अशी भीती विक्रेत्यांना आहे. तो त्यांच्या विक्रीसाठी एक महत्त्वाचा काळ असतो. या उद्योगाची चिंता केवळ हवामानापुरती मर्यादित नाही. पश्चिम आशियातील सध्याच्या तणावामुळे कच्च्या मालाच्या, विशेषतः प्लास्टिकच्या किमती वाढत आहेत. एलपीजीचा पुरवठाही कमी झाल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की, वाढत्या प्लास्टिकच्या किमतींमुळे वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटरसारख्या मोठ्या घरगुती उपकरणांच्या किमतीत १०-१२ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

Share Market Live: शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १,२८० अंकांनी घसरला, तर निफ्टी २२,७१४ वर

साधारणपणे, मार्च महिन्यात उष्णता वाढू लागते, त्यामुळे थंडावा देणाऱ्या उत्पादनांच्या मागणीत वाढ होते. तथापि, यावर्षी हवामानातील बदलामुळे कंपन्या संभ्रमात आहेत. तरीही, त्यांना अपेक्षा आहे की, एप्रिलमध्ये तापमानात वाढ होवून मागणीत वाढ होईल. गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस व्यवसायाचे प्रमुख कमल नंदी म्हणाले की, पुढील आठवड्यानंतर दिल्ली आणि उत्तर भारतात तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी पुढे सांगितले, विक्रीवर होणाऱ्या परिणामाचा अंदाज वर्तविणे घाईचे ठरेल.

ग्राहक स्वस्त उत्पादने खरेदी करण्यावर देणार भर

घरगुती स्वयंपाकाच्या गॅसला प्राधान्य देण्यासाठी सरकारने उद्योगांना होणारा एलपीजी पुरवठा त्यांच्या सरासरी वापराच्या ८० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. याचा परिणाम एसी उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियांवर होत आहे. सतीश म्हणाले, प्लास्टिकच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्यांचा खर्च वाढत आहे आणि याचा परिणाम ग्राहकांवर होईल. वॉशिंग मशीनच्या एकूण खर्चात प्लास्टिकचा वाटा अंदाजे २० टक्के असतो, त्यामुळे दर वाढवणे आवश्यक ठरते. तज्ज्ञांच्या मते, किमती वाढल्यामुळे ग्राहक महागड्या मॉडेल्सऐवजी स्वस्त किंवा कमी क्षमतेची उत्पादने खरेदी करू शकतात.

Lakhpati Didi Scheme 2026: 3 कोटी महिलांना ‘लखपती’ बनवण्याचे लक्ष्य; महिलांच्या सक्षमीकरणाचा गेमचेंजर ‘प्लॅन’

तेलाच्या किमती ठरवतील दिशा

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या किमतींवरून या आठवड्यात स्थानिक शेअर बाजाराची दिशा ठरेल. जागतिक बाजारातील कल, परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका व रुपया-डॉलरच्या दरातील चढ-उतार यांचाही गुंतवणूकदारांवर प्रभाव पडेल, असे तज्ज्ञांनी केले. ‘रामनवमी’ च्या निमित्ताने गुरुवारी शेअर बाजार बंद राहतील. रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडच्या संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले, या आठवड्यात बाजारपेठ आकडेवारीसाठी संवेदनशील राहू शकते. आखाती संघर्ष व कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतार बाह्य घटक राहतील.

Web Title: Unseasonal rains impact ac sales appliance prices set to rise as plastic becomes more expensive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • AC
  • home
  • Iran-Israel War
  • Oil Crisis

संबंधित बातम्या

Good News Regarding Oil Supply: सौदी अरेबियाची पाइपलाइन पुन्हा सुरू, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या
1

Good News Regarding Oil Supply: सौदी अरेबियाची पाइपलाइन पुन्हा सुरू, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
2

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.