
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ( सौजन्य - सोशल मीडिया )
NPCI नुसार, MDR लागू करण्याची नवीन तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल. नेमका हा निर्णय सणासुदीचा काळ लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. MDR अंतर्गत निवडक व्यापारी व्यवहारांसाठी व्यापाऱ्यांकडून शुल्क आकारले जाईल, तर सर्वसामान्य जनतेमधील UPI पेमेंटवर कोणताही परिणाम होणार नाही.
हा नियम मूळतः १५ ऑक्टोबर रोजी लागू होणार होता. NPCI ने UPI व्यवहारांवरील मर्चंट डिस्काउंट रेट MDR शी संबंधित आराखडा प्रसिद्ध केला होता. याअंतर्गत, शेअर बाजार आणि गुंतवणुकीशी संबंधित काही विशिष्ट व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार होते. या व्यवहारांवर ०.०२% MDR दराने शुल्क आकारले जाईल. उदाहरणार्थ, ₹१ लाखांच्या व्यवहारांवर ₹२० आणि ₹१० लाखांच्या व्यवहारांवर ₹२०० शुल्क आकारले जातील. याप्रमाणे रक्कमेंवर शुल्क आकारले जाणार होते. तसंच ₹१५ लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी कमाल ₹३०० शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
नवीन प्रणालीनुसार, म्युच्युअल फंड, स्टॉकब्रोकर, सिक्युरिटीज डीलर आणि गुंतवणुकीशी संबंधित प्लॅटफॉर्मवर केल्या जाणाऱ्या निवडक UPI व्यवहारांवर शुल्क लागू होऊ शकते. याचा अर्थ असा की, जर कोणी UPI वापरून शेअर्स खरेदी केले, म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली किंवा ब्रोकरमार्फत व्यवहार केला, तर त्यांच्यावर एमडीआर लागू होऊ शकतो. हे शुल्क व्यवहाराची रक्कम आणि संबंधित नियमांनुसार निश्चित केले जातील. त्यामुळे नेमकं कोणत्या व्यवहारांवर हे शुल्क थेट प्रभाव पाडणार आहे हे नियमावलीच्या स्पष्टतेनंतर कळेल.